Paul बद्दल बायबलमधील वचने: Visits Lystra; circumcises Timothy
Visits Lystra; circumcises Timothy बद्दल वचने
पौल दर्बे आणि नंतर लुस्त्र येथे आला, तिथे तीमथ्य नावाचा एक शिष्य राहत होता, त्याची आई यहूदी असून विश्वासणारी होती, परंतु त्याचे वडील ग्रीक होते.
लुस्त्र व इकुन्या येथील विश्वासणारे त्याच्याबद्दल चांगली साक्ष देत होते.
त्याला आपल्याबरोबर फेरीत सामील करावयाचे असल्यामुळे पौलाने निघण्यापूर्वी तीमथ्याची सुंता करविली, कारण त्या भागातील सर्व यहूदीयांना त्याचे वडील ग्रीक असल्याचे माहीत होते.
गावागावातून प्रवास करीत असताना, त्यांनी यरुशलेममधील प्रेषित व वडीलजन यांनी जे निर्णय ठरविले होते त्याचे पालन लोकांनी करावे, असे सांगितले.
म्हणून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व त्यांच्या संख्येत दररोज वाढ होत गेली.