Skip to content

Night बद्दल बायबलमधील वचने

79 वचने · 42 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याचप्रमाणे मला निष्‍फळतेचे महिने दिले गेलेले आहेत, कष्टाच्या रात्री माझ्यासाठी नेमलेल्या आहेत.

  2. मी झोपी जाण्याच्या वेळी विचार करतो, ‘उठण्यासाठी अजून किती वेळ आहे?’ रात्र काही संपतच नाही, पहाटेपर्यंत मी तळमळत असतो.

  3. दिवस मावळला म्हणजे हत्यारा सज्ज होतो, गरीब आणि गरजवंतांना तो ठार करतो, आणि रात्रीच्या वेळी चोरासारखी चोरी करतो.

  4. व्यभिचार्‍याचा डोळा दिवस मावळण्याची वाट पाहत असतो; तो म्हणतो, ‘मला कोणीही पाहत नाही.’ तो आपला चेहरा झाकून घेतो.

  5. संकटे पुराप्रमाणे त्याला गाठतात; रात्रीचे तुफान त्याच्यापासून सर्वकाही हिसकावून घेते.

  6. माझी मुळे खोल पाण्यापर्यंत पोहचतील, आणि रात्रभर दहिवर माझ्या फांद्यांना भिजवतील.

  7. माझ्या कण्हण्याने मी खंगून गेलो आहे. रात्रभर रडण्याने मी माझे अंथरूण भिजून ओलेचिंब करतो. माझ्या अश्रूंनी माझा बिछाना भिजून जातो.

  8. जरी तुम्ही माझे हृदय पारखले आहे, रात्रीच्या वेळी तुम्ही माझी झडती घेतली आहे, तुम्ही मला पारखून पाहिले, तरी माझ्यात तुम्हाला दोष आढळला नाही; माझ्या मुखाने मी अपराध केले नाही.

  9. दिवसेंदिवस ते वार्तालाप करतात; प्रत्येक रात्री ते ज्ञान प्रगट करते.

  10. माझ्या परमेश्वरा, मी दिवसा तुम्हाला हाक मारतो, परंतु तुम्ही उत्तर देत नाही, रात्री पण मला कोणताही विसावा नाही.

  11. त्यांचा क्रोध क्षणभर टिकतो, पण त्यांची कृपा जन्मभर राहते. विलाप करणे केवळ रात्रभर राहील, परंतु प्रातःकाल उगवताच आनंद होईल.

  12. माझ्या बिछान्यावर मी तुमचे स्मरण करतो; रात्रीच्या प्रत्येक प्रहरी मी तुमचे मनन करतो.

  13. दिवस तुमचा आहे, रात्रही तुमचीच आहे; सूर्य आणि चंद्र तुम्हीच निर्माण केले आहे.

  14. रात्रीच्या वेळी मी माझी गाणी आठवीत असे; माझे हृदय विचारमग्न होई आणि माझ्या आत्म्याने विचारले:

  15. ते अंधार पाठवितात आणि रात्र होते, तेव्हा वनचर भक्ष्यार्थ बाहेर पडतात.

  16. सिंह भक्ष्यासाठी गर्जना करतात, आणि त्यांचे अन्न परमेश्वराकडून अपेक्षितात.

  17. सूर्योदयाच्या वेळी ते आपल्या गुहांमध्ये परत येऊन लपतात, व शांतपणे झोपतात.

  18. मग लोक त्यांच्या कामासाठी घराबाहेर पडतात, व सायंकाळपर्यंत परिश्रम करतात.

  19. मी रात्रभर माझे नेत्र उघडेच ठेवतो, म्हणजे तुमच्या अभिवचनांचे चिंतन करू शकेन.

  20. प्रवाशांचे आराधना गीत. अहो याहवेहचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा. तुम्ही जे रोज रात्री मंदिरात सेवारत असता.

  21. मी म्हणालो, “अंधार मला लपवून टाकेल, आणि माझ्या सभोवतीचा प्रकाश रात्रीत बदलून जाईल,”

  22. दिवसाच्या संधिप्रकाशात, संध्याकाळच्या अंधारात होता.

  23. तिचा व्यापार लाभदायक व्हावा यासाठी ती सतर्क असते, आणि तिचा दिवा रात्रीही मालवत नाही.

  24. रात्रभर माझ्या अंथरुणावर मी त्याला शोधत होते ज्याच्यावर माझे हृदय प्रेम करते; मी त्याला शोधले परंतु तो सापडला नाही.

  25. मी झोपले होते परंतु माझे हृदय जागेच होते. ऐका! माझा प्रियकर दरवाजा ठोकीत आहे: “माझ्यासाठी उघड, माझ्या भगिनी, माझ्या प्रिये, माझी कबुतरी, माझ्या सर्वांग सुंदरी. माझे डोके दवबिंदूने चिंब भिजले आहे, माझे केस रात्रीमुळे ओलसर झाले आहे.”