मुख्य मजकुरावर जा

Night बद्दल बायबलमधील वचने: Favourable to the purposes of the wicked

5 वचने · 42 पैलू

Favourable to the purposes of the wicked बद्दल वचने

  1. मी तुमच्याकडे वनपशूंनी फाडलेले प्राणी आणले नाहीत; मी स्वतः नुकसान सहन केले आणि दिवसा किंवा रात्री जे काही चोरीला गेले त्याबद्दल तुम्ही माझ्याकडून भरून घेतले.

  2. दिवस मावळला म्हणजे हत्यारा सज्ज होतो, गरीब आणि गरजवंतांना तो ठार करतो, आणि रात्रीच्या वेळी चोरासारखी चोरी करतो.

  3. व्यभिचार्‍याचा डोळा दिवस मावळण्याची वाट पाहत असतो; तो म्हणतो, ‘मला कोणीही पाहत नाही.’ तो आपला चेहरा झाकून घेतो.

  4. “जरी तुमच्याकडे चोर आले, जरी रात्री लुटारू आले तर पाहा, संकट कसे तुमची वाट पाहत आहे! त्यांना हवे तेवढेच चोरत नाहीत काय? जर द्राक्ष वेचणारे तुमच्याकडे आले, तर ते थोडी द्राक्षे सोडणार नाहीत काय?

  5. कारण तुम्हाला हे पक्के ठाऊक आहे की जसा चोर रात्री येतो तसा प्रभूचा दिवस येईल.