Skip to content

Night बद्दल बायबलमधील वचने: Divided into watches

9 वचने · 42 पैलू

Divided into watches बद्दल वचने

  1. पण पहाटेच्या वेळी अग्निस्तंभामधून व मेघस्तंभामधून याहवेहने इजिप्तच्या सेनेकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडविला.

  2. गिदोन आणि त्याच्या बरोबरची शंभर माणसे मध्य पहाटेच्या सुरुवातीला पहारा बदलल्यानंतर छावणीच्या टोकाला पोहोचले. त्यांनी रणशिंग फुंकले आणि त्यांच्या हातातील मडके फोडले.

  3. दुसर्‍या दिवशी शौलाने आपल्या लोकांना तीन भागांमध्ये विभागले; रात्रीच्या शेवटच्या प्रहरी ते अम्मोन्यांच्या छावणीत घुसले आणि सूर्य तापेपर्यंत त्यांना मारून टाकले. जे वाचले त्यातील दोन व्यक्तीही एकत्र येणार नाही असे विखरून गेले.

  4. बकबुकियाह व उन्नी यांचे सहकारी उपासनेच्या वेळी त्यांच्यासमोर उभे राहत असत.

  5. माझ्या बिछान्यावर मी तुमचे स्मरण करतो; रात्रीच्या प्रत्येक प्रहरी मी तुमचे मनन करतो.

  6. मी रात्रभर माझे नेत्र उघडेच ठेवतो, म्हणजे तुमच्या अभिवचनांचे चिंतन करू शकेन.

  7. उठा, रात्री धावा करा, जसा रात्रीचा प्रहर सुरू होतो; त्यांच्यापुढे आपले हात उंचावून, प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर भुकेने व्याकूळ होऊन बेशुद्ध पडणार्‍या तुमच्या मुलांच्या जीवनासाठी विनवण्या करा. प्रभूच्या समक्षतेत आपली अंतःकरणे पाण्यासारखी ओता.

  8. पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले.

  9. तो मध्यरात्री येवो किंवा पहाटे, पण एवढे मात्र निश्चित की तो केव्हाही आला, तरी त्याची वाट पाहत तयारीत असणार्‍या सेवकांना फार मोठा आशीर्वाद प्राप्त होईल.