Night बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
परमेश्वराने प्रकाशाला “दिवस” आणि अंधाराला “रात्र” असे नाव दिले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस.
त्यानंतर परमेश्वराने म्हटले: “दिवस आणि रात्र वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योती होवोत व त्या ॠतू, दिवस आणि वर्षे दाखविणारी चिन्हे होवोत.
परमेश्वराने दोन मोठ्या ज्योती निर्माण केल्या—दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी प्रखर आणि रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी सौम्य प्रकाश. त्यांनी तारेही निर्माण केले.
परमेश्वराने त्या ज्योती पृथ्वीवर प्रकाश पाडण्यासाठी आकाशमंडळात ठेवल्या,
दिवसावर व रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी आणि प्रकाश व अंधार वेगळे करण्यासाठी या ज्योती त्यांनी निर्माण केल्या. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे.
“पृथ्वी अस्तित्वात आहे, तोपर्यंत वसंतॠतू व हंगामाचा काळ, थंडी व उष्णता, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र ही व्हावयाची थांबणार नाहीत.”
त्या रात्री सूर्य मावळल्यावर तो मुक्कामास एके ठिकाणी थांबला असताना, त्याने एक धोंडा उशासाठी घेतला आणि तो त्या ठिकाणी झोपी गेला.
पण रात्रीच्या स्वप्नात परमेश्वर अरामी लाबानकडे आले आणि म्हणाले, “सावध राहा, तू याकोबाला चांगले किंवा वाईट असे काहीही म्हणू नकोस.”
मी तुमच्याकडे वनपशूंनी फाडलेले प्राणी आणले नाहीत; मी स्वतः नुकसान सहन केले आणि दिवसा किंवा रात्री जे काही चोरीला गेले त्याबद्दल तुम्ही माझ्याकडून भरून घेतले.
माझी परिस्थिती अशी होती: दिवसभर उन्हाचा आणि रात्री थंडीच्या कहराचा त्रास होत असे आणि झोप माझ्या डोळ्यावरून उडून जात असे.
त्या रात्री परमेश्वराने इस्राएलला स्वप्नात दर्शन दिले व त्याला म्हटले, “याकोबा! याकोबा!” याकोब म्हणाला, “काय आज्ञा?”
“कारण त्याच रात्री मी संपूर्ण इजिप्त देशामधून संचार करेन व सर्व मनुष्यांचे व जनावरांचे प्रथमवत्स मारून टाकेन आणि त्यांच्या सर्व दैवतांवर न्याय आणेन; मी याहवेह आहे.
पण पहाटेच्या वेळी अग्निस्तंभामधून व मेघस्तंभामधून याहवेहने इजिप्तच्या सेनेकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडविला.
“ ‘तुम्ही कोणाला फसवू नये किंवा तुमच्या शेजार्याला लुबाडू नये. “ ‘मजुरांची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नये.
रात्री जेव्हा छावणीवर दहिवर जमा होत असे तेव्हा मान्ना सुद्धा पडत असे.
गाढवीने बलामाला म्हटले, “मी तुझी ती गाढवी नाही काय जिच्यावर तू आजपर्यंत बसत आलास? मी तुझ्याशी कधी अशी वागणूक केली काय?” तो म्हणाला, “नाही.”
तर त्याचा मृतदेह रात्रभर तिथे ठेवू नये, तर त्याच दिवशी त्याचे दफन करावे; कारण जो कोणी खांबावर टांगलेला असेल, त्याच्यावर परमेश्वराचा शाप असतो. म्हणून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जो देश वतन म्हणून देत आहे, तो तुम्ही भ्रष्ट करू नये.
आणि अगदी तसेच घडून आले. दुसर्या दिवशी सकाळी गिदोन उठला; त्याने ती लोकर दाबली आणि तिच्यातील दहिवर पिळले—एक वाटीभर पाणी काढले.
त्या रात्री परमेश्वराने तसेच केले. त्या रात्री लोकर कोरडी राहिली, परंतु जमीन दहिवराने आच्छादून गेली.
गिदोन आणि त्याच्या बरोबरची शंभर माणसे मध्य पहाटेच्या सुरुवातीला पहारा बदलल्यानंतर छावणीच्या टोकाला पोहोचले. त्यांनी रणशिंग फुंकले आणि त्यांच्या हातातील मडके फोडले.
दुसर्या दिवशी शौलाने आपल्या लोकांना तीन भागांमध्ये विभागले; रात्रीच्या शेवटच्या प्रहरी ते अम्मोन्यांच्या छावणीत घुसले आणि सूर्य तापेपर्यंत त्यांना मारून टाकले. जे वाचले त्यातील दोन व्यक्तीही एकत्र येणार नाही असे विखरून गेले.
तेव्हा अय्याहची मुलगी रिजपाह हिने गोणपाट घेतले, आणि ते स्वतःसाठी खडकावर पसरविले. हंगामाच्या सुरुवातीपासून त्या शरीरावर आकाशातून पाऊस पडेपर्यंत, तिने दिवसा पक्ष्यांना आणि रात्री जंगली प्राण्यांना त्या शवांना स्पर्श करू दिला नाही.
गिबोन येथे त्या रात्री याहवेहने शलोमोनला स्वप्नात दर्शन दिले आणि परमेश्वर म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.”
त्या रात्री याहवेहच्या दूताने अश्शूर सैनिकांच्या छावणीत एक लक्ष पंचाऐंशी हजार सैनिक ठार केले. दुसर्या दिवशी सकाळी लोक उठून पाहतात—तर त्यांच्या सर्व बाजूला प्रेते पसरलेली होती.
बकबुकियाह व उन्नी यांचे सहकारी उपासनेच्या वेळी त्यांच्यासमोर उभे राहत असत.