मुख्य मजकुरावर जा

Kings बद्दल बायबलमधील वचने

580 वचने · 175 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा अजर्‍याह मुख्य याजक आणि इतर सर्व याजक यांनी त्याच्याकडे पाहिले, तेव्हा त्यांना त्याच्या कपाळावर कुष्ठरोग झाल्याचे दिसले, म्हणून त्यांनी त्याला त्वरित बाहेर काढले. निश्चितच, तो स्वतःहून तिथून निघून जाण्यास तयार झाला होता, कारण याहवेहनी त्याला पीडले होते.

  2. उज्जीयाह राजाला त्याच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत कुष्ठरोग होता. एका वेगळ्या घरात तो राहत होता—कुष्ठरोगी असल्याने याहवेहच्या मंदिरात येण्यास त्याला बंदी होती. त्याचा पुत्र योथामकडे राजवाड्याचा कारभार होता आणि देशातील लोकांवर त्याने राज्य केले.

  3. उज्जीयाहच्या कारकिर्दीतील इतर घटना सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याद्वारे लिहून ठेवल्या आहेत.

  4. उज्जीयाह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि राजांच्या मालकीच्या स्मशानभूमीत त्याला पुरण्यात आले, कारण लोक म्हणाले, “त्याला कुष्ठरोग झाला होता.” आणि त्याचा वारस त्याचा पुत्र योथाम राजा झाला.

  5. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी योथाम राजा झाला आणि त्याने यरुशलेमात सोळा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा, ती सादोकची कन्या होती.

  6. त्याचे पिता उज्जीयाहने जसे केले तसे त्यानेही याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले; परंतु त्याने याहवेहच्या मंदिरात प्रवेश केला नाही. तथापि लोकांनी त्यांचे भ्रष्ट व्यवहार सुरूच ठेवले.

  7. योथामाने याहवेहच्या मंदिराचा वरील दरवाजा पुन्हा बांधला आणि ओफेलच्या डोंगरावरील भिंतीवर बरेच काम केले.

  8. त्याने यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे बांधली आणि जंगली भागात किल्ले आणि बुरूज बांधले.

  9. योथामाने अम्मोन्यांच्या राजाशी युद्ध करून त्यांना जिंकले. त्या वर्षी अम्मोनी लोकांनी त्याला शंभर तालांत चांदी, दहा हजार कोर गहू आणि दहा हजार कोर जव दिले. अम्मोनी लोकांनी दुसऱ्या आणि तिसर्‍या वर्षी देखील त्याच प्रमाणात वस्तू आणल्या.

  10. योथाम सामर्थ्याने वाढत गेला, कारण तो त्याचे परमेश्वर याहवेहसमोर स्थैर्याने चालला.

  11. योथामच्या राज्यकाळातील इतर घटना, त्याने केलेली सर्व युद्धे आणि इतर गोष्टी इस्राएलचे राजे आणि यहूदीयाचे राजे यांच्या इतिहासात लिहिलेल्या आहेत.

  12. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी योथाम राजा झाला आणि त्याने यरुशलेमात सोळा वर्षे राज्य केले.

  13. योथाम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. आणि त्याचा पुत्र आहाज त्याचा वारस म्हणून राजा झाला.

  14. वयाच्या वीसाव्या वर्षी आहाज राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. त्याचे पिता दावीदाने केले त्याप्रमाणे, याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले नाही.

  15. त्याने इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले आणि पूजा करण्यासाठी बआल दैवतांच्या मूर्तीसुद्धा बनविल्या.

  16. त्याने बेन हिन्नोमच्या खोऱ्यात बलिदानांचे यज्ञ केले आणि त्याच्या लेकरांचे अग्नीत अर्पण केले, राष्ट्रांच्या ज्या अमंगळ प्रथा याहवेहने इस्राएल लोकांतून काढून टाकल्या होत्या त्यात तो गुंतला.

  17. त्याने डोंगरावर, टेकड्यांवर आणि प्रत्येक घनदाट वृक्षाखाली यज्ञार्पणे केली आणि धूप जाळला.

  18. त्यामुळेच त्याचे परमेश्वर याहवेहनी त्याला अरामच्या राजाच्या हाती सोपविले. अरामी लोकांनी त्याचा पराभव केला आणि त्याच्या अनेक लोकांना कैद करून दिमिष्क येथे आणले. त्याला इस्राएलच्या राजाच्या हातीही सोपविले, ज्याने त्याला भारी हानी पोहोचविली.

  19. रमाल्याह याचा पुत्र पेकहने एका दिवसात यहूदीयामधील एक लाख वीस हजार सैनिकांना ठार केले—कारण यहूदीयाच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहचा त्याग केला होता.

  20. एफ्राईम येथील योद्धा जिक्रीने राजाचा पुत्र मासेयाह, राजवाड्याचा प्रभारी अधिकारी अज्रीकाम आणि राजाच्या नंतरचा सर्वात उच्चाधिकारी एलकानाह यांना ठार मारले.

  21. इस्राएली लोकांनी यहूदीया येथून आलेल्या त्यांच्या बंधूइस्राएली लोकांमधून दोन लाख स्त्रिया, पुत्र आणि कन्यांना कैद केले. त्यांनी पुष्कळ लूट घेतली व ती शोमरोनला नेली.

  22. परंतु ओदेद नावाचा याहवेह यांचा एक संदेष्टा तिथे होता आणि जेव्हा सैन्य शोमरोनकडे परत आले, तेव्हा तो त्यांची भेट घेण्यासाठी निघाला. तो त्यांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यहूदीयावर रागावले होते म्हणून त्यांनी त्यांना तुमच्या हाती दिले. परंतु इतक्या क्रोधाने तुम्ही त्यांची कत्तल केली आहे की, त्याचे पडसाद स्वर्गापर्यंत पोहोचले.

  23. आणि आता तुमचा असा उद्देश आहे की, यहूदीया आणि यरुशलेममधील स्त्री-पुरुषांना तुमचे गुलाम बनवावे. परंतु तुमचे परमेश्वर याहवेह यांच्याविरुद्ध केलेल्या पापाबद्दल तुम्हीदेखील दोषी नाहीत का?

  24. आता माझे ऐका! तुम्ही कैदी म्हणून आणलेल्या तुमच्या सहइस्राएली लोकांना परत पाठवा, कारण याहवेहचा क्रोधाग्नी तुमच्यावर भडकलेला आहे.”

  25. नंतर एफ्राईममधील काही पुढारी—यहोहानानचा पुत्र अजर्‍याह, मेशिल्लेमोथचा पुत्र बेरेख्याह, शल्लूमचा पुत्र यहिज्कीयाह आणि हदलैचा पुत्र अमासा—यांनी जे युद्धातून परत येत होते त्यांचा सामना केला.