मुख्य मजकुरावर जा

circa 1380–1050 BC

The Judges & Ruth

Israel cycles through rebellion, oppression, and rescue under charismatic leaders—culminating in Ruth's faithful love story.

703 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शास्ते ९:५६सुमारे इ.स.पू. १२३३

    अबीमेलेखाने आपल्या सत्तर भावांचे वध करून आपल्या वडिलांविरुद्ध जी दुष्टाई केली होती, तिची परतफेड परमेश्वराने अशा रीतीने केली.

  2. शास्ते ९:५७सुमारे इ.स.पू. १२३३

    शेखेमातील लोकांच्या सर्व दुष्टाईबद्दल परमेश्वराने त्यांना शिक्षा दिली. यरूब्बआलाचा पुत्र योथामचा शापही त्यांच्यावर आला.

  3. शास्ते १०:१सुमारे इ.स.पू. १२३२

    अबीमेलेखाच्या काळानंतर इस्साखार गोत्राताल एक पुरुष, तोला जो पुआहचा पुत्र व दोदोचा नातू इस्राएलाच्या सुटकेसाठी उभा राहिला. तो एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शामीर नगरात राहत असे.

  4. शास्ते १०:२सुमारे इ.स.पू. १२३२

    तेवीस वर्षे त्याने इस्राएलचे नेतृत्व केले; नंतर त्याचा मृत्यू झाला आणि त्याला शामीर येथे मूठमाती देण्यात आली.

  5. शास्ते १०:३सुमारे इ.स.पू. १२०९

    त्याच्यानंतर याईर गिलआदीचा उदय झाला. त्याने बावीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले.

  6. शास्ते १०:४सुमारे इ.स.पू. १२०९

    त्याचे तीस पुत्र होते, जे तीस गाढवांवर स्वार होत असत. गिलआद येथील तीस नगरे त्यांच्या अधिकारात होती. ती आज देखील हव्वोथ-याईर म्हणून संबोधली जातात.

  7. शास्ते १०:५सुमारे इ.स.पू. १२०९

    याईर मरण पावल्यावर त्याला कामोन येथे मूठमाती देण्यात आली.

  8. शास्ते १०:६सुमारे इ.स.पू. ११८७

    इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने पुन्हा वाईट कृत्य केले. ते बआल व अष्टारोथ या दैवतांच्या मूर्तीची आणि अरामाचे दैवत, सीदोनाचे दैवत, मोआबाचे दैवत, अम्मोनाचे दैवत व पलिष्टीच्या दैवतांची उपासना व सेवा करू लागले. इस्राएली लोक याहवेहला विसरले आणि त्यांची सेवा करणे सोडले.

  9. शास्ते १०:७सुमारे इ.स.पू. ११८७

    यास्तव याहवेहचा राग इस्राएलवर भडकला. त्यांनी त्यांना पलिष्टी आणि अम्मोनी लोकांच्या हाती विकले.

  10. शास्ते १०:८सुमारे इ.स.पू. ११८७

    ज्यांनी त्या वर्षी त्यांची दाणादाण केली आणि त्यांना चिरडून टाकले. अठरा वर्षे त्यांनी अमोऱ्यांचा देश असलेल्या गिलआदामध्ये यार्देन नदीच्या पूर्वेकडील सर्व इस्राएली लोकांवर अत्याचार केला.

  11. शास्ते १०:९सुमारे इ.स.पू. ११८७

    तसेच यहूदाह घराणे, बिन्यामीन घराणे व एफ्राईम घराण्यांविरुद्ध युद्ध करण्यास अम्मोनी वंशजांनी यार्देन नदी पार केली; यामुळे इस्राएली फार संकटात होते.

  12. शास्ते १०:१०सुमारे इ.स.पू. ११८७

    तेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहला आरोळी मारली, “आम्ही आमच्या परमेश्वराचा त्याग केला आणि बआलची सेवा करून तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.”

  13. शास्ते १०:११सुमारे इ.स.पू. ११८७

    याहवेहने इस्राएली लोकांना उत्तर दिले, “जेव्हा इजिप्ती, अमोरी, अम्मोनी, पलिष्टी,

  14. शास्ते १०:१२सुमारे इ.स.पू. ११८७

    सीदोनी, अमालेकी व माओनी या सर्वांनी तुमच्यावर अत्याचार केला आणि तुम्ही माझ्या मदतीसाठी धावा केला आणि मी तुम्हाला सोडविले नाही काय?

  15. शास्ते १०:१३सुमारे इ.स.पू. ११८७

    परंतु तुम्ही माझा त्याग केला आणि इतर दैवतांची सेवा करू लागले, म्हणून यापुढे मी तुम्हाला सोडविणार नाही.

  16. शास्ते १०:१४सुमारे इ.स.पू. ११८७

    जा आणि तुम्ही निवडलेल्या नवीन दैवतांचा धावा करा. तुमच्या आपत्काली त्यांनीच तुम्हाला सोडवावे!”

  17. शास्ते १०:१५सुमारे इ.स.पू. ११८७

    परंतु इस्राएली लोकांनी याहवेहला म्हटले, “आम्ही पाप केले आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, पण आता आम्हाला सोडवा.”

  18. शास्ते १०:१६सुमारे इ.स.पू. ११८७

    नंतर त्यांनी त्यांच्याजवळ असलेली परदेशी दैवते दूर टाकली आणि याहवेहची सेवा केली. याहवेहना इस्राएलची दैन्यावस्था सहन झाली नाही.

  19. शास्ते १०:१७सुमारे इ.स.पू. ११८७

    जेव्हा अम्मोनी लोकांना युद्धासाठी एकत्र करण्यात आले आणि त्यांनी गिलआदामध्ये तळ ठोकला, तेव्हा इस्राएली लोक एकत्र आले आणि त्यांनी मिस्पाह येथे तळ दिला.

  20. शास्ते १०:१८सुमारे इ.स.पू. ११८७

    गिलआदाच्या लोकांचे पुढारी एकमेकांना म्हणाले, “जो कोणी अम्मोनी लोकांवर हल्ला करण्यास पुढाकार घेईल तो गिलआदामध्ये राहणार्‍या सर्वांचा प्रमुख होईल.”

  21. गिलआदी इफ्ताह हा एक महान योद्धा होता. त्याच्या पित्याचे नाव गिलआद; त्याची आई एक वेश्या होती.

  22. गिलआदाच्या पत्नीने सुद्धा त्याच्या पुत्रांना जन्म दिला आणि जेव्हा ते मोठे झाले, तेव्हा त्यांनी इफ्ताहाला हाकलून दिले. ते त्याला म्हणाले, “आमच्या पित्याच्या वतनातून तुला काहीही मिळावयाचे नाही, कारण तू दुसर्‍या स्त्रीचा पुत्र आहेस.”

  23. म्हणून इफ्ताह आपल्या भावांपासून पळून गेला आणि तोब या देशात जाऊन राहिला. लवकरच त्याने गुंड लोकांची टोळी जमविली. त्या टोळीतले लोक त्याचे अनुयायी बनले व त्याच्याबरोबर राहू लागले.

  24. शास्ते ११:४सुमारे इ.स.पू. ११८७

    काही वेळानंतर, अम्मोनी लोक इस्राएली लोकांविरुद्ध युद्ध करू लागले.

  25. शास्ते ११:५सुमारे इ.स.पू. ११८७

    जेव्हा अम्मोनी इस्राएल लोकांशी लढत होते, तेव्हा गिलआदाचे वडीलजन इफ्ताहाला आणण्यास तोब येथे गेले.