मुख्य मजकुरावर जा

Judges of Israel बद्दल बायबलमधील वचने

42 वचने · 17 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा याहवेहने त्यांना लुटारूंच्या हातून वाचविण्यासाठी शास्ते उभे केले.

  2. तरी देखील त्यांनी आपल्या शास्त्यांचे ऐकले नाही, परंतु व्यभिचारी मनाने इतर दैवतांच्या मागे लागले आणि त्यांची उपासना करू लागले. त्वरेने ते आपल्या पूर्वजांच्या मार्गापासून बहकले, ज्यांनी याहवेहच्या आज्ञांचे पालन केले होते.

  3. जेव्हा याहवेहने त्यांच्यासाठी शास्ते उभे केले होते, ते शास्त्यांबरोबर होते आणि शास्तेच्या जीवनभर ते त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून त्यांना सोडवित होते; कारण जुलूम व त्रास देणाऱ्यांमुळे इस्राएली लोक विव्हळत असल्यामुळे याहवेहला त्यांची दया येऊ लागली होती.

  4. परंतु शास्ते मरण पावले की लोक योग्य ते करण्याचे सोडून त्यांचे पूर्वज करीत त्यापेक्षा अधिक वाईट आचरण करू लागले. ते इतर दैवतांची उपासना करीत व त्यांच्या पापी चालीरीतींकडे हट्टाने पुन्हा वळत.

  5. परंतु जेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहचा धावा केला, तेव्हा त्यांनी त्यांना सोडविण्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ केनाजचा पुत्र ओथनिएलला सुटका करणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली.

  6. याहवेहचा आत्मा त्याच्यावर उतरला, जेणेकरून तो इस्राएलाचा शास्ता झाला आणि युद्धासाठी निघाला. याहवेहने अरामचा राजा कुशन-रिशाथईमला अथनिएलाच्या हाती दिले, ज्याने त्याच्यावर ताबा घेतला.

  7. त्यामुळे केनाजचा पुत्र ओथनिएल मरेपर्यंत देशात चाळीस वर्षे शांतता होती.

  8. अबीमेलेखाच्या काळानंतर इस्साखार गोत्राताल एक पुरुष, तोला जो पुआहचा पुत्र व दोदोचा नातू इस्राएलाच्या सुटकेसाठी उभा राहिला. तो एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शामीर नगरात राहत असे.

  9. तेवीस वर्षे त्याने इस्राएलचे नेतृत्व केले; नंतर त्याचा मृत्यू झाला आणि त्याला शामीर येथे मूठमाती देण्यात आली.

  10. त्याच्यानंतर याईर गिलआदीचा उदय झाला. त्याने बावीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले.

  11. त्याचे तीस पुत्र होते, जे तीस गाढवांवर स्वार होत असत. गिलआद येथील तीस नगरे त्यांच्या अधिकारात होती. ती आज देखील हव्वोथ-याईर म्हणून संबोधली जातात.

  12. याईर मरण पावल्यावर त्याला कामोन येथे मूठमाती देण्यात आली.

  13. मग एफ्राईमच्या लोकांनी आपले सैन्य एकवटले आणि ते पार होऊन साफोन येथे आले. ते इफ्ताहाला म्हणाले, “आम्हाला सोबत न घेता तू अम्मोन्यांशी लढावयास का गेलास? आता आम्ही तुझ्यासह तुझे घर जाळून टाकणार आहोत.”

  14. इफ्ताहाने प्रत्युत्तर दिले, “मी आणि माझ्या लोकांचे अम्मोन्यांशी फार मोठे भांडण झाले आणि मी तुम्हाला बोलाविले देखील होते, पण तुम्ही मला त्यांच्या हातातून सोडविले नाही.

  15. जेव्हा मी हे पहिले तुम्ही मदतीला येत नाही, तेव्हा मी माझ्या जिवावर उदार होऊन अम्मोनी लोकांवर चालून गेलो आणि याहवेहने मला त्यांच्यावर विजय दिला. मग आज तुम्ही आमच्याविरुद्ध लढावयास का आलात?”

  16. मग इफ्ताहाने गिलआदाच्या माणसांना एकत्र बोलाविले आणि एफ्राईमच्या विरुद्ध युद्ध केले. गिलआदाच्या माणसांनी एफ्राईमच्या लोकांना मारले, कारण ते म्हणाले होते, “तुम्ही गिलआदाचे लोक एफ्राईमातून व मनश्शेहतून पळपुटे आहात.”

  17. गिलआदांनी एफ्राईमकडे जाणारे यार्देनेचे खोरे काबीज केले आणि जेव्हा एफ्राईममधील कोणी वाचला व म्हणाला, “मला ओलांडू दे,” तेव्हा गिलआदाचे लोक त्याला विचारीत, “तू एफ्राईमी आहेस का?” जर तो म्हणाला, “नाही,”

  18. ते म्हणत, “ठीक आहे मग ‘शिब्बोलेथ म्हण.’ ” जर तो “सीब्बोलेथ,” म्हणाला, कारण तो ते शब्द नीट उच्चारू शकला नाही, तर ते त्याला धरत आणि त्याला यार्देनेच्या उतारावर ठार करीत. त्यावेळी एफ्राईमचे बेचाळीस हजार लोक ठार झाले.

  19. इफ्ताहाने सहा वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले. मग गिलआदी इफ्ताह मरण पावला आणि त्याला गिलआदाच्या एका गावात पुरण्यात आले.

  20. त्याच्यानंतर बेथलेहेमच्या इब्झानने इस्राएलचे नेतृत्व केले.

  21. त्याला तीस पुत्र आणि तीस कन्या होत्या. त्याने आपल्या कन्यांचा विवाह परकीय कुळात केला आणि आपल्या पुत्रांसाठी त्याने तीस तरुण स्त्रिया परकीय कुळांतून आणल्या. इब्झानने इस्राएलचे नेतृत्व सात वर्षे केले.

  22. नंतर इब्झान मरण पावला आणि त्याला बेथलेहेमात मूठमाती देण्यात आली.

  23. त्याच्यानंतर एलोन जबुलूनने दहा वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले.

  24. मग एलोन मरण पावला आणि त्याला जबुलून देशातील अय्यालोनमध्ये पुरण्यात आले.

  25. त्याच्यानंतर पिराथोन येथील हिल्लेलचा मुलगा अब्दोनाने इस्राएलचे नेतृत्व केले.