- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1380–1050 BC
The Judges & Ruth
Israel cycles through rebellion, oppression, and rescue under charismatic leaders—culminating in Ruth's faithful love story.
या कालखंडातील वचने
- शास्ते ९:३१सुमारे इ.स.पू. १२३३
त्याने अबीमेलेखकडे दूत पाठवून त्याला कळविले, “एबेदचा पुत्र गाल व त्याचे भाऊबंद शेखेमात आले आहेत आणि आता ते या शहराला तुझ्याविरुद्ध चिथावीत आहेत.
- शास्ते ९:३२सुमारे इ.स.पू. १२३३
म्हणून आता तू आणि तुझे लोक रात्री या आणि शेतांमध्ये दबा धरून बसा.
- शास्ते ९:३३सुमारे इ.स.पू. १२३३
सकाळी अगदी सूर्योदय झाल्याबरोबर शहरावर स्वारी कर. जेव्हा गाल आणि त्याचे लोक तुझ्याविरुद्ध लढण्यास बाहेर येतील, तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी पाहा.”
- शास्ते ९:३४सुमारे इ.स.पू. १२३३
तेव्हा अबीमेलेख आणि त्याच्या सर्व सैन्याने रात्रीच कूच केले आणि शेखेमजवळ त्यांनी आपल्या चार टोळ्या केल्या व शहराच्या सभोवती ते दबा धरून बसले.
- शास्ते ९:३५सुमारे इ.स.पू. १२३३
आता एबेदचा पुत्र गाल बाहेर आला आणि शहराच्या वेशीजवळ उभा राहिला, अबीमेलेख आणि त्याचे सैन्य जे दबा धरून बसले होते तेही बाहेर आले.
- शास्ते ९:३६सुमारे इ.स.पू. १२३३
जेव्हा गालने त्यांना पाहिले, तेव्हा तो जबुलास म्हणाला, “पाहा, डोंगराच्या शिखरांवरून लोक उतरत आहेत!” जबुल त्याला म्हणाला, “नाही, ती केवळ डोंगराची सावली आहे जी तुला माणसांसारखी दिसत आहे.”
- शास्ते ९:३७सुमारे इ.स.पू. १२३३
परंतु गाल परत म्हणाला: “पाहा, मध्य उंचवट्यापासून लोक खाली येत आहेत आणि दैवप्रश्न करणाऱ्यांच्या एला वृक्षाच्या मागील वाटेने टोळी येत आहे.”
- शास्ते ९:३८सुमारे इ.स.पू. १२३३
तेव्हा जबुल त्याला म्हणाला, “आता तुझे ते मोठेपणाचे बोलणे कुठे आहे, तू जे बोलला होता, ‘अबीमेलेख कोण आहे की त्याची चाकरी करावी?’ हीच माणसे आहेत ना ज्यांची तू थट्टा केली होती? तर बाहेर जा आणि त्यांच्याशी लढ!”
- शास्ते ९:३९सुमारे इ.स.पू. १२३३
तेव्हा गालने शेखेमाच्या नागरिकांना लढण्यासाठी नेले व अबीमेलेखाशी तो लढला.
- शास्ते ९:४०सुमारे इ.स.पू. १२३३
नंतर अबीमेलेखाने त्याचा वेशीच्या प्रवेश दारापर्यंत पाठलाग केला आणि पळून जात असता अनेक मृत्युमुखी पडले.
- शास्ते ९:४१सुमारे इ.स.पू. १२३३
मग अबीमेलेख अरुमा येथे राहिला आणि जबुलाने गाल आणि त्याच्या भाऊबंदांना शेखेमातून घालवून दिले.
- शास्ते ९:४२सुमारे इ.स.पू. १२३३
दुसर्या दिवशी शेखेमातील लोक बाहेर शेतात गेले आणि अबीमेलेखाला ही बातमी देण्यात आली.
- शास्ते ९:४३सुमारे इ.स.पू. १२३३
म्हणून त्याने लोक घेतले, त्यांना तीन तुकड्या मध्ये विभाजित केले व ते शेतांमध्ये दबा धरून बसले. जेव्हा त्याने पहिले की लोक शहरातून बाहेर येत आहेत, तेव्हा त्याने उठून त्यांच्यावर हल्ला केला.
- शास्ते ९:४४सुमारे इ.स.पू. १२३३
अबीमेलेख आणि त्याच्या तुकडीने शहराच्या वेशीजवळ पुढे धावत येऊन ती रोखून धरली. त्याच्या इतर दोन तुकड्यांनी जे शेतात होते त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा शेतांमध्ये संहार केला.
- शास्ते ९:४५सुमारे इ.स.पू. १२३३
संपूर्ण दिवसभर अबीमेलेख शहर काबीज करेपर्यंत शहरावर हल्ला करीत राहिला आणि त्याने त्यातील लोकांचा संहार केला. नंतर त्याने शहराचा नाश केला आणि त्यावर मीठ पेरले.
- शास्ते ९:४६सुमारे इ.स.पू. १२३३
हे ऐकून शेखेमाचे नागरिक जे बुरुजात होते त्यांनी बआल-बरीथच्या मंदिराशेजारी असलेल्या किल्ल्यामध्ये आश्रय घेतला
- शास्ते ९:४७सुमारे इ.स.पू. १२३३
जेव्हा अबीमेलेखाने हे ऐकले की नागरिक शेखेमाच्या बुरुजात एकत्र झाले आहेत,
- शास्ते ९:४८सुमारे इ.स.पू. १२३३
अबीमेलेख आणि त्याची सर्व माणसे सलमोन डोंगराकडे गेले. त्याने कुर्हाड घेतली आणि झाडांच्या फांद्या तोडून, त्या आपल्या खांद्यावर उचलून ठेवल्या. त्याने आपल्या लोकांना आदेश दिला, “त्वरा करा! तुम्ही मला जे करताना पाहिले तसेच करा!”
- शास्ते ९:४९सुमारे इ.स.पू. १२३३
म्हणून सर्व माणसांनी फांद्या तोडल्या आणि अबीमेलेखाच्या मागे चालले. त्यांनी फांद्यांची रास बुरुजाच्या चहूबाजूंनी लावली आणि लोक आत असता त्याला आग लावली. अशा रीतीने शेखेमाच्या बुरुजामध्ये असलेले सुमारे एक हजार स्त्रीपुरुष मरण पावले.
- शास्ते ९:५०सुमारे इ.स.पू. १२३३
त्यानंतर अबीमेलेख तेबेस येथे गेला आणि त्याला वेढा दिला आणि ते हस्तगत केले.
- शास्ते ९:५१सुमारे इ.स.पू. १२३३
त्या शहरात एक मजबूत बुरूज होता, ज्यामध्ये सर्व पुरुष आणि सर्व स्त्रिया—शहरातील सर्व लोक—बुरुजाकडे पळाले. त्यांनी स्वतःला आतमध्ये बंद करून घेतले आणि बुरुजाच्या छतावर चढले.
- शास्ते ९:५२सुमारे इ.स.पू. १२३३
अबीमेलेख बुरुजाकडे गेला आणि त्याने त्यावर हल्ला केला. पण बुरुजाला आग लावण्यासाठी तो प्रवेशद्वाराजवळ गेला असताना,
- शास्ते ९:५३सुमारे इ.स.पू. १२३३
एका स्त्रीने जात्याची वरची तळी खाली सरळ अबीमेलेखाच्या डोक्यावर टाकली आणि त्याच्या कवटीचा चुराडा केला.
- शास्ते ९:५४सुमारे इ.स.पू. १२३३
त्याने घाईने आपल्या शस्त्रवाहकास बोलावून आदेश दिला, “तुझी तलवार काढ आणि मला ठार कर, ‘एका स्त्रीने त्याला ठार केले, असे कोणीही म्हणू शकणार नाही.’ ” तेव्हा त्या तरुणाने त्याला आपल्या तलवारीने भोसकले आणि तो मरण पावला.
- शास्ते ९:५५सुमारे इ.स.पू. १२३३
जेव्हा इस्राएली लोकांनी अबीमेलेख मृत झाल्याचे पाहिले, तेव्हा ते आपापल्या घरी परतले.