- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1380–1050 BC
The Judges & Ruth
Israel cycles through rebellion, oppression, and rescue under charismatic leaders—culminating in Ruth's faithful love story.
या कालखंडातील वचने
- शास्ते ८:१६सुमारे इ.स.पू. १२४५
मग त्याने त्या शहरातील वडिलांना पकडले आणि सुक्कोथ येथील लोकांना रानातील काटे आणि काटेरी झुडपांची शिक्षा देऊन धडा शिकविला.
- शास्ते ८:१७सुमारे इ.स.पू. १२४५
त्याने पेनुएल येथील बुरूज मोडून टाकला व त्या शहरातील पुरुषांचा संहार केला.
- शास्ते ८:१८सुमारे इ.स.पू. १२४५
मग गिदोनाने जेबह राजा व सलमुन्ना राजाला विचारले, “तुम्ही ताबोर येथे ज्या पुरुषांना ठार केले ते कसे होते?” त्यांनी उत्तर दिले, “ते तुझ्यासारखेच, प्रत्येकजण राजपुत्राप्रमाणे दिसत होते.”
- शास्ते ८:१९सुमारे इ.स.पू. १२४५
गिदोनाने म्हटले, “ते माझे भाऊ होते, माझ्याच आईचे पुत्र. जीवित याहवेहची शपथ घेऊन सांगतो की त्यांना तुम्ही ठार केले नसते, तर मी तुमचा वध केला नसता.”
- शास्ते ८:२०सुमारे इ.स.पू. १२४५
मग आपल्या ज्येष्ठपुत्र येथेर याच्याकडे वळून त्याला म्हणाला, “त्यांना ठार कर!” परंतु येथेर याने आपली तलवार उपसली नाही, कारण तो कोवळा मुलगा होता आणि भयभीत झाला.
- शास्ते ८:२१सुमारे इ.स.पू. १२४५
जेबह व सलमुन्ना म्हणाले, “तूच ते कर. ‘कारण जसा पुरुष, तसे त्याचे बल.’ ” तेव्हा गिदोन पुढे आला आणि त्यांना ठार केले व त्यांच्या उंटांच्या गळ्यांतील अलंकार काढून घेतले.
- शास्ते ८:२२सुमारे इ.स.पू. १२४५
आता इस्राएलचे लोक गिदोनास म्हणू लागले, “तू आमच्यावर राज्य कर; तू आणि तुझे पुत्र आणि तुझे नातूही; कारण मिद्यानी लोकांच्या हातातून तू आम्हाला सोडविले आहे.”
- शास्ते ८:२३सुमारे इ.स.पू. १२४५
परंतु गिदोनाने त्यांना म्हटले, “मी तुमच्यावर राज्य करणार नाही किंवा माझा पुत्रही तुमच्यावर राज्य करणार नाही. याहवेह तुमच्यावर राज्य करतील.”
- शास्ते ८:२४सुमारे इ.स.पू. १२४५
आणि गिदोन म्हणाला, “माझी एक विनंती आहे, तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या लुटीतील एक कुंडले मला द्यावे.” (सोन्याची कुंडले घालण्याची इश्माएली लोकांची प्रथा होती.)
- शास्ते ८:२५सुमारे इ.स.पू. १२४५
त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला ते देण्यास आनंद होईल.” म्हणून त्यांनी एक वस्त्रे पसरले आणि त्यांच्यातील प्रत्येकाने आपल्या लुटीतील एकेक कुंडले तिथे टाकली.
- शास्ते ८:२६सुमारे इ.स.पू. १२४५
त्याने मागितलेल्या कुंडलांचे वजन एक हजार सातशे शेकेल, याखेरीज त्याला चंद्रकोरी, लोलक, मिद्यानी राजांची जांभळी वस्त्रे व उंटांच्या गळ्यातील साखळ्याही मिळाल्या.
- शास्ते ८:२७सुमारे इ.स.पू. १२४५
गिदोनाने त्या सोन्याचे एक एफोद करून आपले नगर ओफराह येथे ठेवले. सर्व इस्राएली लोकांनी त्याची उपासना करून व्यभिचार केला आणि ते गिदोन आणि त्याच्या कुटुंबासाठी पाश असे झाले.
- शास्ते ८:२८सुमारे इ.स.पू. १२४५
अशा प्रकारे इस्राएली लोकांपुढे मिद्यानी वश झाले आणि त्यांनी आपले डोके पुन्हा कधीही वर काढले नाही. आणि गिदोनाच्या सर्व हयातीत चाळीस वर्षे देशाला शांतता लाभली.
- शास्ते ८:२९सुमारे इ.स.पू. १२४५
योआशचा पुत्र यरूब्बआल राहण्यासाठी घरी परतला.
- शास्ते ८:३०सुमारे इ.स.पू. १२४५
गिदोनाला एकूण सत्तर पुत्र झाले, कारण त्याला अनेक पत्नी होत्या.
- शास्ते ८:३१सुमारे इ.स.पू. १२४५
शेखेमातही त्याला एक उपपत्नी होती. तिने त्याला एक पुत्र दिला. त्याचे नाव अबीमेलेख असे होते.
- शास्ते ८:३२सुमारे इ.स.पू. १२४५
योआशचा पुत्र गिदोन पूर्ण वयातीत होऊन मरण पावला व त्याला अबियेजर्यांच्या ओफराह येथे त्याचा पिता योआशच्या कबरेत पुरण्यात आले.
- शास्ते ८:३३सुमारे इ.स.पू. १२४५
गिदोन मरण पावल्याबरोबर, इस्राएली लोकांनी बआल दैवताच्या मागे लागून पुन्हा व्यभिचार केला. त्यांनी बआल-बरीथची दैवत म्हणून स्थापना केली
- शास्ते ८:३४सुमारे इ.स.पू. १२४५
आणि ज्या याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने, त्यांच्या चहूकडील शत्रूंच्या हातातून सोडविले होते, त्यांचे स्मरण ठेवले नाही.
- शास्ते ८:३५सुमारे इ.स.पू. १२४५
तसेच इस्राएलसाठी सगळ्या चांगल्या गोष्टी करूनही त्यांनी यरूब्बआल (म्हणजे गिदोन) च्या घराण्यावर काहीही निष्ठा दाखविली नाही.
यरूब्बआलचा पुत्र अबीमेलेख हा आपल्या आईच्या भावांना भेटण्यासाठी शेखेम येथे गेला आणि त्यांना व आपल्या आईच्या सर्व घराण्याला तो बोलला,
“तुम्ही शेखेमातील सर्व नागरिकांना विचारा, ‘तुमच्यासाठी काय उत्तम आहे: यरूब्बआलच्या सर्व सत्तर पुत्रांनी किंवा एक व्यक्तीने तुमच्यावर राज्य करावे?’ स्मरण ठेवा मी तुमच्या रक्तामांसाचा आहे.”
जेव्हा बंधूंनी हे सर्व शेखेमातील नागरिकांना सांगितले, त्यांनी अबीमेलेखाचे अनुसरण करण्याचे ठरविले, कारण ते म्हणाले, “तो आमचा नातेवाईक आहे.”
त्यांनी त्याला बआल-बरीथ मंदिरातील सत्तर शेकेल चांदी दिली आणि अबीमेलेखाने ती अविचारी व लुच्ची माणसे त्याच्यामागे चालण्यासाठी उपयोगी आणली.
तो ओफराह येथील आपल्या पित्याच्या घरी गेला व तिथे एका दगडावर त्याने आपल्या सत्तर भावांचा म्हणजे यरूब्बआलाच्या पुत्रांचा वध केला. परंतु यरूब्बआलाचा धाकटा पुत्र योथाम लपून निसटून गेला.