- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1380–1050 BC
The Judges & Ruth
Israel cycles through rebellion, oppression, and rescue under charismatic leaders—culminating in Ruth's faithful love story.
या कालखंडातील वचने
- शास्ते ६:३१सुमारे इ.स.पू. १२४५
परंतु योआशाने त्याच्या आजूबाजूच्या विरोधी जमावाला उत्तर दिले, “तुम्ही बआलची बाजू मांडणार आहात का? तुम्ही त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहात का? जो कोणी त्याच्यासाठी लढेल त्याला सकाळपर्यंत जिवे मारावे! जर बआल खरोखरच देव असता तर, जेव्हा कोणी त्याची वेदी तोडतो तेव्हा तो स्वतःचा बचाव करू शकला असता.”
- शास्ते ६:३२सुमारे इ.स.पू. १२४५
म्हणून गिदोनाने बआल दैवताची वेदी विध्वंस केली, त्या दिवशी त्यांनी त्याला “यरूब्बआल” असे नाव दिले, त्याचा अर्थ, “बआल दैवतानेच त्याचा विरोध करावा,” असा होता.
- शास्ते ६:३३सुमारे इ.स.पू. १२४५
त्यानंतर लवकरच मिद्यानी, अमालेकी आणि इतर पूर्वेकडील शेजारी राष्ट्रांची सैन्ये एकत्रित झाली. त्यांनी यार्देन पार केली व येज्रीलच्या खोर्यात तळ दिला.
- शास्ते ६:३४सुमारे इ.स.पू. १२४५
तेव्हा याहवेहचा आत्मा गिदोनावर आला आणि त्याने रणशिंग फुंकले; अबिएजेरी लोक त्याच्याकडे आले.
- शास्ते ६:३५सुमारे इ.स.पू. १२४५
त्याने मनश्शेह, आशेर, जबुलून आणि नफतालीकडे दूत पाठवून त्यांच्या सैन्यांना येण्याचे आव्हान केले व त्या सर्वांनी त्याला साथ दिली.
- शास्ते ६:३६सुमारे इ.स.पू. १२४५
गिदोन परमेश्वराला म्हणाला, “जर तुम्ही इस्राएलला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे माझ्या हातांनी वाचवाल—
- शास्ते ६:३७सुमारे इ.स.पू. १२४५
पाहा, तर आज रात्री खळ्यात मी लोकर ठेवेन आणि सकाळी लोकर तेवढी दवाने ओली असावी, परंतु सभोवतालची जमीन कोरडी असे आढळून आले, तर मी समजेन की तुम्ही इस्राएलला वाचविण्यासाठी मला मदत कराल.”
- शास्ते ६:३८सुमारे इ.स.पू. १२४५
आणि अगदी तसेच घडून आले. दुसर्या दिवशी सकाळी गिदोन उठला; त्याने ती लोकर दाबली आणि तिच्यातील दहिवर पिळले—एक वाटीभर पाणी काढले.
- शास्ते ६:३९सुमारे इ.स.पू. १२४५
नंतर गिदोन परमेश्वराला म्हणाला, “कृपा करून माझ्यावर रागावू नका. मला पुन्हा आणखी एक वेळ विनंती करू द्या. मला पुन्हा एकदा परीक्षा घेऊ द्या, परंतु यावेळी ती लोकर कोरडी असू द्या आणि पूर्ण भूमी दवबिंदूने झाकून टाका.”
- शास्ते ६:४०सुमारे इ.स.पू. १२४५
त्या रात्री परमेश्वराने तसेच केले. त्या रात्री लोकर कोरडी राहिली, परंतु जमीन दहिवराने आच्छादून गेली.
- शास्ते ७:१सुमारे इ.स.पू. १२४५
अगदी पहाटेस यरूब्बआल (म्हणजे गिदोन) आणि त्याचे सर्व लोक हरोदाच्या झर्यापर्यंत गेले. मिद्यान्यांचा तळ त्यांच्या उत्तरेस मोरेह डोंगराजवळ खोर्यात होता.
- शास्ते ७:२सुमारे इ.स.पू. १२४५
याहवेह गिदोनाला म्हणाले, “तुझ्याकडे खूप जास्त लोक आहेत. मी मिद्यानी लोकांना तुमच्या हातात देणार नाही; नाहीतर इस्राएलचे लोक माझ्यासमोर गर्व करून म्हणतील की, ‘आमच्याच बळाने आम्ही स्वतःला वाचविले आहे.’
- शास्ते ७:३सुमारे इ.स.पू. १२४५
आता सैन्यांना सूचना दे, ‘जर कोणी घाबरत असतील, तर त्यांनी गिलआद डोंगरावरून माघारी जावे.’ ” त्यामधून बावीस हजार लोक परत गेले व दहा हजार राहिले.
- शास्ते ७:४सुमारे इ.स.पू. १२४५
परंतु याहवेह गिदोनास म्हणाले, “अजूनही पुष्कळ लोक आहेत. त्यांना पाण्याजवळ घेऊन चल आणि तिथे मी त्यांना पारखून त्यांची संख्या तुझ्यासाठी कमी करेन. जर मी म्हणालो, ‘हा तुझ्याबरोबर जाईल,’ तो तुझ्याबरोबर जाईल; पण जर मी म्हणालो, ‘हा तुझ्याबरोबर जाऊ नये,’ तर त्याने तुझ्याबरोबर जाऊ नये.”
- शास्ते ७:५सुमारे इ.स.पू. १२४५
म्हणून गिदोनाने त्या माणसांना पाण्याजवळ नेले. तिथे याहवेहने त्याला सांगितले, “जे कुत्र्याप्रमाणे पाणी जिभेने पितात त्यांना जे गुडघे टेकून पाणी पितात त्यांच्यापासून वेगळे करा.”
- शास्ते ७:६सुमारे इ.स.पू. १२४५
त्यांच्यापैकी तीनशे जण होते जे पाणी आपल्या तोंडाजवळ घेऊन, कुत्र्यांसारखे चाटून पाणी प्याले. बाकी सर्व गुडघे टेकून पाणी प्याले.
- शास्ते ७:७सुमारे इ.स.पू. १२४५
याहवेहने गिदोनाला सांगितले, “जे चाटून पाणी प्याले, त्या तीनशे लोकांच्या साहाय्यानेच मी तुम्हाला सोडवेन आणि मिद्यानी लोकांना तुमच्या हाती देईन. बाकी सर्वांना तू घरी पाठवून दे.”
- शास्ते ७:८सुमारे इ.स.पू. १२४५
गिदोनाने बाकीच्या इस्राएली लोकांना घरी पाठवून दिले, परंतु त्याच्याजवळ फक्त तीनशे लोकच ठेवले, ज्यांनी इतरांकडून अन्नसामुग्री व रणशिंगे घेतली. त्याच्या खाली खोर्यात मिद्यानी लोक आपल्या छावणीत होते.
- शास्ते ७:९सुमारे इ.स.पू. १२४५
त्या रात्री, याहवेह गिदोनास म्हणाले, “ऊठ, खाली छावणीवर चाल कर, कारण मी त्यांना तुझ्या हातात देणार आहे.
- शास्ते ७:१०सुमारे इ.स.पू. १२४५
परंतु तुला हल्ला करण्यास भीती वाटत असेल, तर तुझा सेवक पुराहला आपल्याबरोबर घे
- शास्ते ७:११सुमारे इ.स.पू. १२४५
आणि ते काय बोलत आहे ते ऐक. त्यानंतर तू हल्ला करण्यास उत्साहित होशील.” तेव्हा तो आणि त्याचा सेवक पुराह छावणीच्या सीमेपर्यंत खाली उतरले.
- शास्ते ७:१२सुमारे इ.स.पू. १२४५
मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील इतर देशांचे लोक टोळांप्रमाणे त्या खोर्यात दाटीने पसरले होते. त्यांचे उंट समुद्र किनार्यावरील वाळूप्रमाणे इतके अधिक होते की, त्यांची गणती करणे शक्य नव्हते.
- शास्ते ७:१३सुमारे इ.स.पू. १२४५
गिदोन तिथे पोहोचला तेव्हा एक मनुष्य आपल्या सोबत्याला स्वप्न सांगत होता. तो म्हणत होता, “मला एक स्वप्न पडले, एक जवाची गोल भाकर घरंगळत मिद्यानी छावणीत आली. तिने आपल्या तंबूला असा जोराचा धक्का दिला की तो तंबू उलटला आणि जमिनीवर भुईसपाट झाला.”
- शास्ते ७:१४सुमारे इ.स.पू. १२४५
त्याच्या सोबत्याने उत्तर दिले, “हे इस्राएलातील योआशाचा पुत्र गिदोनाच्या तलवारीशिवाय दुसरे काही नाही. परमेश्वराने मिद्यानी व त्यांची संपूर्ण छावणी त्याच्या हाती दिली आहे.”
- शास्ते ७:१५सुमारे इ.स.पू. १२४५
जेव्हा गिदोनाने स्वप्न व त्याचा अर्थ ऐकला, तेव्हा तिथे त्याने दंडवत घातले आणि उपासना केली. तो इस्राएली लोकांच्या छावणीत लोकांकडे परतला आणि म्हणाला, “उठा! कारण मिद्यानी लोकांची छावणी याहवेहने तुमच्या हातात दिली आहे.”