मुख्य मजकुरावर जा

circa 1380–1050 BC

The Judges & Ruth

Israel cycles through rebellion, oppression, and rescue under charismatic leaders—culminating in Ruth's faithful love story.

703 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अशा रीतीने या मिद्यानी लोकांमुळे इस्राएलाची अवस्था इतकी निकृष्ट व कंगाल झाली, की ते मदतीसाठी याहवेहचा धावा करू लागले.

  2. मिद्यान्यांमुळे जेव्हा इस्राएली लोक मदतीसाठी याहवेहचा धावा करू लागले,

  3. शास्ते ६:८सुमारे इ.स.पू. १२४५

    त्यांनी एक संदेष्टा पाठवला, तो म्हणाला, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात, मी तुम्हाला इजिप्तमधून, गुलामगिरीच्या देशातून बाहेर काढले.

  4. शास्ते ६:९सुमारे इ.स.पू. १२४५

    मी तुम्हाला इजिप्तमधील लोकांच्या हातातून सोडविले आणि जे तुमच्याशी क्रूरपणे वागत, त्या सर्व लोकांच्या हातून सोडविले आणि तुमच्या शत्रूंना तुमच्यापुढून घालवून त्यांचा देश तुम्हाला दिला.

  5. शास्ते ६:१०सुमारे इ.स.पू. १२४५

    मी तुम्हाला म्हटले, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहता, त्यांच्या दैवतांची उपासना करू नका. परंतु तुम्ही माझे ऐकले नाही.”

  6. शास्ते ६:११सुमारे इ.स.पू. १२४५

    याहवेहचा दूत आला आणि ओफराह येथील एला वृक्षाखाली बसला. तो वृक्ष अबियेजरी योआशच्या मालकीचा होता, जिथे त्याचा पुत्र गिदोन मिद्यानी लोकांपासून वाचविण्यासाठी द्राक्षकुंडात गहू मळत होता.

  7. शास्ते ६:१२सुमारे इ.स.पू. १२४५

    जेव्हा याहवेहचा दूत गिदोनाच्या पुढे प्रगट झाला आणि त्यास म्हणाला, “हे बलवान सैनिका, याहवेह तुझ्याबरोबर आहेत.”

  8. शास्ते ६:१३सुमारे इ.स.पू. १२४५

    गिदोन त्यास म्हणाला, “महाराज, मला माफ करा, परंतु जर याहवेह आमच्यासह असते तर हे सर्व आमच्यासोबत का घडले? आमच्या पूर्वजांनी सांगितलेले त्यांचे सर्व चमत्कार कुठे आहेत, जेव्हा ते म्हणाले, ‘परमेश्वराने आम्हाला इजिप्तमधून बाहेर काढले नाही का?’ पण आता याहवेहने आम्हाला सोडून दिले आहे आणि आम्हाला मिद्यानच्या हाती दिले आहे.”

  9. शास्ते ६:१४सुमारे इ.स.पू. १२४५

    याहवेह त्याच्याकडे वळून म्हणाले, “आपल्या बळाचा उपयोग कर आणि जा इस्राएलला मिद्यान्यांच्या हातून सोडव. मी तुला पाठवित नाही का?”

  10. शास्ते ६:१५सुमारे इ.स.पू. १२४५

    गिदोनाने उत्तर दिले, “महाराज, मला माफ करा, मी इस्राएली लोकांना कसा काय सोडविणार? माझे कुटुंब संपूर्ण मनश्शेह गोत्रातील अत्यंत दुर्बल असे कुटुंब आहे आणि माझ्या पूर्ण कुटुंबात मला अत्यंत कनिष्ठ समजले जाते.”

  11. शास्ते ६:१६सुमारे इ.स.पू. १२४५

    याहवेहने उत्तर दिले, “मी तुझ्याबरोबर असेन आणि तू सर्व मिद्यान्यांचा असा नायनाट करशील की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहणार नाही.”

  12. शास्ते ६:१७सुमारे इ.स.पू. १२४५

    गिदोनाने प्रत्युत्तर दिले, “जर तुम्ही माझ्यावर संतुष्ट झाले असाल तर ते सिद्ध करण्यासाठी मला एखादे चिन्ह दाखवा.

  13. शास्ते ६:१८सुमारे इ.स.पू. १२४५

    मी परत येऊन माझे अर्पण तुमच्यापुढे ठेवीपर्यंत कृपा करून जाऊ नका.” आणि याहवेह म्हणाले, “तू परत येईपर्यंत मी वाट पाहीन.”

  14. शास्ते ६:१९सुमारे इ.स.पू. १२४५

    गिदोन आत गेला, त्याने एक करडू कापून कालवण तयार केले आणि पिठाच्या एक एफापासून खमीर नसलेली भाकर केली. टोपलीत मांस आणि त्याचा रस्सा एका भांड्यात ठेवून त्याने ते बाहेर आणले आणि एलाच्या वृक्षाखाली त्याला अर्पण केले.

  15. शास्ते ६:२०सुमारे इ.स.पू. १२४५

    परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, “मांस व बेखमीर भाकरी त्या तिथे असलेल्या खडकावर ठेव आणि रस्सा त्यावर ओत.” गिदोनाने सूचनांप्रमाणे केले,

  16. शास्ते ६:२१सुमारे इ.स.पू. १२४५

    तेव्हा याहवेहच्या दूताने आपल्या हातातील काठीने त्या मांसास व बेखमीर भाकरीस स्पर्श केला, त्याबरोबर खडकातून अग्नी निघाला व त्या अग्नीने ते मांस व त्या भाकरी भस्म करून टाकल्या. आणि याहवेहचा तो दूत एकाएकी अंतर्धान पावला.

  17. शास्ते ६:२२सुमारे इ.स.पू. १२४५

    जेव्हा गिदोनाच्या लक्षात आले की तो खरोखर याहवेहचा दूत होता, तेव्हा तो मोठ्याने म्हणाला, “अरेरे, अहो सार्वभौम याहवेह! मी तर मरणार, कारण मी याहवेहच्या दूताला समोरासमोर पाहिले आहे!”

  18. शास्ते ६:२३सुमारे इ.स.पू. १२४५

    परंतु याहवेहने त्याला उत्तर दिले, “शांती असो! भिऊ नकोस. तू मरणार नाहीस.”

  19. शास्ते ६:२४सुमारे इ.स.पू. १२४५

    म्हणून गिदोनाने तिथे याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि तिला याहवेह शालोम, याहवेह शांती देतात असे नाव दिले. ही वेदी अद्यापही अबियेजरीकरांच्या मुलुखातील ओफराह या गावी आहे.

  20. शास्ते ६:२५सुमारे इ.स.पू. १२४५

    त्याच रात्री याहवेहने त्याला म्हटले, “वडिलांच्या कळपातील उत्तम सात वर्षांचा दुसरा गोर्‍हा घे. तुझ्या पित्याची बआल दैवताची वेदी पाडून टाक आणि तिच्याजवळ असणार्‍या अशेरा देवीचा खांब तोडून टाक.

  21. शास्ते ६:२६सुमारे इ.स.पू. १२४५

    नंतर या उंचवट्यावर याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी योग्य प्रकारची वेदी बांधा. तू तोडलेल्या अशेरा खांबाच्या लाकडाचा वापर करून, होमार्पण म्हणून दुसरा गोर्‍हा अर्पण कर.”

  22. शास्ते ६:२७सुमारे इ.स.पू. १२४५

    यास्तव गिदोनाने आपल्या नोकरांपैकी दहा नोकर बरोबर घेतले आणि याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे सर्वकाही केले. परंतु आपल्या पित्याच्या परिवारातील माणसांच्या व गावातील लोकांच्या भीतीने त्याने ते हवन दिवसाच्या ऐवजी रात्री केले.

  23. शास्ते ६:२८सुमारे इ.स.पू. १२४५

    दुसर्‍या दिवशी पहाटेस गाव जागे होऊ लागले, तेव्हा बआल दैवताची वेदी मोडून पडलेली, तिच्याजवळच असलेला अशेराचा खांब नाहीसा झालेला, नवीन वेदी बांधलेली व तिच्यावर दुसर्‍या गोर्‍ह्याचे होमार्पण झालेले दृष्टीस पडले!

  24. शास्ते ६:२९सुमारे इ.स.पू. १२४५

    ते एकमेकांना विचारू लागले, “हे कोणी केले असावे?” शोध घेतल्यावर त्यांना सांगण्यात आले, “योआशाचा पुत्र गिदोनाने ते केले होते.”

  25. शास्ते ६:३०सुमारे इ.स.पू. १२४५

    योआशाला नगरवासी मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले, “तुझ्या पुत्राला बाहेर आण; बआल दैवताच्या वेदीचा अपमान केल्याबद्दल व तिच्याजवळील अशेरामूर्ती फोडल्याबद्दल त्याने मेलेच पाहिजे.”