मुख्य मजकुरावर जा

circa 1380–1050 BC

The Judges & Ruth

Israel cycles through rebellion, oppression, and rescue under charismatic leaders—culminating in Ruth's faithful love story.

703 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शास्ते ४:११सुमारे इ.स.पू. १२८५

    आता हेबेर केनीने मोशेचा मेहुणा होबाबचे गोत्र व इतर केनी लोकांना सोडले आणि केदेशजवळ साननीम येथील मोठ्या एलावृक्षाजवळ आपला तंबू ठोकला.

  2. शास्ते ४:१२सुमारे इ.स.पू. १२८५

    जेव्हा त्यांनी सिसेराला सांगितले की अबीनोअमाचा मुलगा बाराक ताबोर पर्वतावर गेला आहे,

  3. शास्ते ४:१३सुमारे इ.स.पू. १२८५

    तेव्हा सिसेराने आपले सर्व लोक आणि आपले नऊशे लोखंडी रथ सज्ज करून, हरोशेथ-हग्गोईम येथून किशोन नदीकडे कूच केले.

  4. शास्ते ४:१४सुमारे इ.स.पू. १२८५

    तेव्हा दबोरा बाराकास म्हणाली, “जा! आज तो दिवस आहे, याहवेहने सिसेराला तुझ्या हाती दिलेले आहे. याहवेह तुझ्यापुढे निघाले आहेत ना?” तेव्हा बाराक दहा हजार लोकांसह ताबोर पर्वतावरून उतरला.

  5. शास्ते ४:१५सुमारे इ.स.पू. १२८५

    जसा बाराक पुढे गेला, याहवेहने सिसेरा आणि त्याचे सर्व रथ आणि त्याच्या सैनिकांचा तलवारीने धुव्वा उडविला, सिसेरा तर आपल्या रथातून उतरला आणि पायी पळून गेला.

  6. शास्ते ४:१६सुमारे इ.स.पू. १२८५

    बाराकाने रथांचा आणि सैन्याचा हरोशेथ-हग्गोईमपर्यंत पाठलाग केला आणि सिसेराचे संपूर्ण सैन्य तलवारीने पडले; एकही पुरुष जिवंत राहिला नाही.

  7. शास्ते ४:१७सुमारे इ.स.पू. १२८५

    सिसेरा तर केनी हेबेराची पत्नी याएलच्या डेर्‍याकडे पायी पळून गेला, कारण हासोरचा राजा याबीन आणि केनी हेबेरच्या घराण्यात सलोखा होता.

  8. शास्ते ४:१८सुमारे इ.स.पू. १२८५

    याएल सिसेराला भेटण्यास बाहेर आली आणि त्याला म्हणाली, “या, महाराज, आत या. भिऊ नका.” म्हणून तो तिच्या डेर्‍यात गेला आणि तिने त्याला कांबळीखाली झाकले.

  9. शास्ते ४:१९सुमारे इ.स.पू. १२८५

    “मला तहान लागली आहे,” तो तिला म्हणाला. “कृपा करून मला थोडेसे पाणी दे.” तेव्हा तिने त्याला दुधाची बुधली उघडून त्यातून त्याला थोडे दूध दिले आणि त्याला झाकून टाकले.

  10. शास्ते ४:२०सुमारे इ.स.पू. १२८५

    तो तिला म्हणाला, “डेर्‍याच्या दाराशी उभी राहा. जर कोणी येईल आणि तुला विचारेल, ‘आत कोणी आहे का?’ तर ‘नाही’ असे सांग.”

  11. शास्ते ४:२१सुमारे इ.स.पू. १२८५

    सिसेरा थकून झोपलेला होता, परंतु हेबेराची पत्नी याएलने डेर्‍याची मेख आणि हातोडा घेतला आणि हळूच त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात तिने मेख ठोकली व ती आरपार जाऊन जमिनीत रुतून बसली आणि तो मरण पावला.

  12. शास्ते ४:२२सुमारे इ.स.पू. १२८५

    बाराक सिसेराचा शोध करीत आला, तेव्हा याएल त्याला सामोरी गेली व म्हणाली, “या, ज्या पुरुषाचा तुम्ही शोध करीत आहात, तो मी तुम्हाला दाखविते.” तो तिच्याबरोबर आत गेला, तेव्हा तिथे डेर्‍याची मेख कपाळातून आरपार जाऊन सिसेरा मरून पडलेला त्याला दिसला.

  13. शास्ते ४:२३सुमारे इ.स.पू. १२८५

    त्या दिवशी परमेश्वराने कनानाचा राजा याबीनास इस्राएलसमोर पराजित केले.

  14. शास्ते ४:२४सुमारे इ.स.पू. १२८५

    इस्राएली लोकांचे वर्चस्व अधिकाधिक प्रबळ होत गेले आणि शेवटी त्यांनी कनानाचा राजा याबीनचा नाश केला.

  15. त्या दिवशी दबोरा आणि अबीनोअमाचा पुत्र बाराकाने हे गीत गाईले:

  16. “जेव्हा इस्राएलचे राजकुमार पुढे चालतात, जेव्हा लोक स्वेच्छेने स्वतःला सादर करतात— याहवेहची स्तुती करा!

  17. “अहो राजांनो हे ऐका! अधिपतींनो कान द्या! मी स्वतः याहवेहची स्तुती करेन; मी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराची स्तुती गाईन.

  18. “जेव्हा याहवेह तुम्ही सेईरातून बाहेर निघाले, जेव्हा तुम्ही एदोमाच्या भूमीतून चालत गेले, पृथ्वी थरारली, आकाशाने जल ओतले, ढगांनी जलबिंदू खाली ओतले.

  19. याहवेहसमोर पर्वत थरथरला, याहवेह इस्राएलच्या परमेश्वरासमोर सीनाय थरकापला.

  20. “अनथाचा पुत्र शमगारच्या दिवसामध्ये, याएलच्या काळी राजमार्ग सुने पडले; प्रवाशांनी वळणाचा मार्ग वापरला.

  21. इस्राएलमधील ग्रामीण लढणार नाहीत; मी, दबोरा उठेपर्यंत ते थांबले, मी, इस्राएलमधील एक माता उठेपर्यंत ते थांबले.

  22. परमेश्वराने नवीन पुढारी निवडले जेव्हा युद्ध शहराच्या वेशीजवळ आले होते, परंतु इस्राएलाच्या चाळीस हजारांमध्ये एकही ढाल किंवा भाला दिसला नाही.

  23. माझे हृदय इस्राएलच्या राजपुत्रांसह आहे, लोकांमध्ये स्वेच्छेने काम करणाऱ्यांबरोबर आहे. याहवेहची स्तुती हो!

  24. “तुम्ही जे शुभ्र गाढवांवर स्वार होता, गालिचांच्या खोगिरावर बसता, आणि तुम्ही त्या मार्गाने पायी चालणारे, विचार करा,

  25. गायकांचा आवाज पाणवठ्याच्या ठिकाणी. ते याहवेहचे विजयगीत गातात, इस्राएलच्या गावकर्‍यांच्या विजयाचे स्मरण करतात. “नंतर याहवेहचे लोक शहराच्या द्वाराजवळ गेले.