- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1380–1050 BC
The Judges & Ruth
Israel cycles through rebellion, oppression, and rescue under charismatic leaders—culminating in Ruth's faithful love story.
या कालखंडातील वचने
- शास्ते ३:१७सुमारे इ.स.पू. १३२५
त्याने मोआबच्या राजा एग्लोनाच्या समोर रसद सादर केली, जो खूप गलेलठ्ठ मनुष्य होता.
- शास्ते ३:१८सुमारे इ.स.पू. १३२५
एहूदाने रसद सादर केल्यानंतर, ज्यांनी ते वाहून नेले होते त्यांना त्यांच्या मार्गावर परत पाठविले.
- शास्ते ३:१९सुमारे इ.स.पू. १३२५
परंतु गिलगालजवळील दगडी मूर्तीजवळ पोहोचल्यावर तो स्वतः एग्लोनकडे परत गेला आणि म्हणाला, “महाराज, माझ्याकडे तुमच्यासाठी एक गुप्त संदेश आहे.” राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आम्हाला एकटे सोडा!” आणि ते सर्व निघून गेले.
- शास्ते ३:२०सुमारे इ.स.पू. १३२५
मग त्याच्या राजवाड्याच्या वरच्या खोलीत तो एकटाच बसला असताना एहूद त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, “तुमच्यासाठी माझ्याकडे परमेश्वराचा संदेश आहे.” राजा आसनावरून उठताच,
- शास्ते ३:२१सुमारे इ.स.पू. १३२५
एहूदाने आपला डावा हात पुढे झग्याखाली करून उजव्या मांडीवर बांधलेली तलवार उपसली आणि राजाच्या पोटात खोल खुपसली.
- शास्ते ३:२२सुमारे इ.स.पू. १३२५
पात्याबरोबर मूठही आत गेली आणि आतडी बाहेर पडली, एहूदाने ती तलवार बाहेर काढली नाही, तलवारीवर चरबी गोळा झाली होती.
- शास्ते ३:२३सुमारे इ.स.पू. १३२५
मग एहूद बाहेर ओसरीत गेला; त्याने त्याच्यामागे वरच्या खोलीचे दरवाजे बंद केले आणि त्यांना कुलूप लावले.
- शास्ते ३:२४सुमारे इ.स.पू. १३२५
तो गेल्यानंतर सेवक आले आणि त्यांना वरच्या खोलीचे दरवाजे कुलूप लावून बंद असल्याचे दिसले. ते म्हणाले, “महाराज राजवाड्याच्या आतील खोलीत आराम करण्यास गेले असावे.”
- शास्ते ३:२५सुमारे इ.स.पू. १३२५
ते लाजिरवाणे वाटेपर्यंत थांबले, परंतु जेव्हा त्यांनी खोलीचे दार उघडले नाही, तेव्हा त्यांनी किल्ली घेतली आणि दार उघडले. तिथे त्यांना आपला स्वामी जमिनीवर मरून पडलेला दिसला.
- शास्ते ३:२६सुमारे इ.स.पू. १३२५
ते तिथे वाट पाहत असता, एहूद पळून गेला. दगडी मूर्तीपलीकडे सेईराह येथे जाऊन पोहोचला.
- शास्ते ३:२७सुमारे इ.स.पू. १३२५
तो तिथे गेल्यावर त्याने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले आणि इस्राएली लोक त्याच्यासोबत डोंगराळ प्रदेशातून उतरले आणि त्याने त्यांचे नेतृत्व केले.
- शास्ते ३:२८सुमारे इ.स.पू. १३२५
त्याने आदेश दिला, “माझ्यामागे या, कारण याहवेहने तुमचे शत्रू मोआबी लोक तुमच्या हाती दिले आहेत.” मग ते त्याच्या पाठोपाठ खाली गेले आणि त्यांनी मोआब देशाजवळचे यार्देनेचे उतार रोखून धरले आणि कोणासही पलीकडे जाऊ दिले नाही.
- शास्ते ३:२९सुमारे इ.स.पू. १३२५
त्यावेळी त्यांनी सुमारे दहा हजार मोआबी लोक मारले. हे सर्व धिप्पाड आणि बलवान पुरुष होते; त्यापैकी एकही सुटू शकला नाही.
- शास्ते ३:३०सुमारे इ.स.पू. १३२५
त्या दिवशी मोआबी लोक इस्राएली लोकांच्या अधीन आले आणि त्यानंतर देशाला ऐंशी वर्षे शांतता लाभली.
- शास्ते ३:३१सुमारे इ.स.पू. १३२५
एहूदनंतर अनथाचा पुत्र शमगार आला, त्याने बैलाच्या अंकुशाने सहाशे पलिष्ट्यांना मारले. त्यानेही इस्राएलला वाचविले.
- शास्ते ४:१सुमारे इ.स.पू. १३०५
एहूदच्या मृत्यूनंतर इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने पुन्हा वाईट कृत्य केले.
- शास्ते ४:२सुमारे इ.स.पू. १३०५
म्हणून याहवेहने त्यांना कनानातील हासोर येथील राजा याबीनच्या हाती दिले. त्याच्या सैन्याचा सेनापती सिसेरा हा हरोशेथ-हग्गोईम येथे राहणारा होता.
- शास्ते ४:३सुमारे इ.स.पू. १३०५
त्याच्याजवळ नऊशे लोखंडी रथ होते आणि त्याने क्रूरतेने वीस वर्षे इस्राएली लोकांचा छळ केला, त्यांनी मदतीसाठी याहवेहचा धावा केला.
- शास्ते ४:४सुमारे इ.स.पू. १२८५
त्या समयी लप्पिदोथाची पत्नी दबोरा एक संदेष्टी होती आणि ती इस्राएलचे नेतृत्व करत होती.
- शास्ते ४:५सुमारे इ.स.पू. १२८५
तिने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा आणि बेथेलमध्ये दबोराच्या खजूराच्या झाडाखाली न्यायसभा चालविली आणि इस्राएली लोक त्यांच्यातील वादाचा निर्णय घेण्यासाठी तिच्याकडे येत असत.
- शास्ते ४:६सुमारे इ.स.पू. १२८५
तिने नफतालीच्या प्रदेशातील केदेश येथे राहणारा अबीनोअमाचा पुत्र बाराकास बोलावून आणले आणि ती त्याला म्हणाली, “याहवेह इस्राएलाचे परमेश्वर तुला आज्ञा देतात: ‘जा आणि तुझ्यासोबत नफताली आणि जबुलून वंशातील दहा हजार पुरुषांना सोबत घेऊन ताबोर पर्वताकडे कूच करून जा.
- शास्ते ४:७सुमारे इ.स.पू. १२८५
मी याबीनाच्या सैन्याचा सेनापती सिसेराला त्याच्या रथांसह आणि त्याच्या सैन्यासह किशोन नदीकडे नेईन आणि त्याला तुझ्या हाती देईन.’ ”
- शास्ते ४:८सुमारे इ.स.पू. १२८५
बाराक तिला म्हणाला, “जर तू माझ्यासोबत येशील तर मी जाईन; परंतु तू माझ्याबरोबर येत नसशील, तर मी जाणार नाही.”
- शास्ते ४:९सुमारे इ.स.पू. १२८५
दबोराने उत्तर दिले, “मी तुजबरोबर अवश्य येईन, परंतु जो मार्ग तू घेत आहेस त्यामध्ये तुझा सन्मान होणार नाही, कारण याहवेह सिसेराला एका स्त्रीच्या हातात देतील.” मग ती बाराकासोबत केदेश येथे गेली.
- शास्ते ४:१०सुमारे इ.स.पू. १२८५
बाराकाने जबुलूनी आणि नफतालीच्या लोकांना बोलाविले आणि तेव्हा दहा हजार पुरुष त्याच्यामागे निघाले. दबोराही त्याच्यासह केदेशला गेली.