मुख्य मजकुरावर जा

circa 1380–1050 BC

The Judges & Ruth

Israel cycles through rebellion, oppression, and rescue under charismatic leaders—culminating in Ruth's faithful love story.

703 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शास्ते २:१५सुमारे इ.स.पू. १४१४

    जेव्हा इस्राएली राष्ट्र त्यांच्या शत्रूविरुद्ध लढण्यास जात असे, तेव्हा याहवेहचा हात त्यांच्याविरुद्ध असून त्यांचा पराभव होत असे, जसे याहवेहने त्यांना वचन दिले होते. ते भयंकर संकटात होते.

  2. शास्ते २:१६सुमारे इ.स.पू. १४१३

    तेव्हा याहवेहने त्यांना लुटारूंच्या हातून वाचविण्यासाठी शास्ते उभे केले.

  3. शास्ते २:१७सुमारे इ.स.पू. १४१३

    तरी देखील त्यांनी आपल्या शास्त्यांचे ऐकले नाही, परंतु व्यभिचारी मनाने इतर दैवतांच्या मागे लागले आणि त्यांची उपासना करू लागले. त्वरेने ते आपल्या पूर्वजांच्या मार्गापासून बहकले, ज्यांनी याहवेहच्या आज्ञांचे पालन केले होते.

  4. शास्ते २:१८सुमारे इ.स.पू. १४१३

    जेव्हा याहवेहने त्यांच्यासाठी शास्ते उभे केले होते, ते शास्त्यांबरोबर होते आणि शास्तेच्या जीवनभर ते त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून त्यांना सोडवित होते; कारण जुलूम व त्रास देणाऱ्यांमुळे इस्राएली लोक विव्हळत असल्यामुळे याहवेहला त्यांची दया येऊ लागली होती.

  5. शास्ते २:१९सुमारे इ.स.पू. १४१३

    परंतु शास्ते मरण पावले की लोक योग्य ते करण्याचे सोडून त्यांचे पूर्वज करीत त्यापेक्षा अधिक वाईट आचरण करू लागले. ते इतर दैवतांची उपासना करीत व त्यांच्या पापी चालीरीतींकडे हट्टाने पुन्हा वळत.

  6. शास्ते २:२०सुमारे इ.स.पू. १४१३

    यासाठी याहवेहचा क्रोध इस्राएलविरुद्ध भडकला आणि त्यांनी जाहीर केले, “कारण या इस्राएली राष्ट्राने त्यांच्या पूर्वजांशी मी केलेल्या कराराचे उल्लंघन केले आहे आणि माझे ऐकले नाही,

  7. शास्ते २:२१सुमारे इ.स.पू. १४१३

    यहोशुआ मरण पावल्यावर, यापुढे मी घालविलेल्या राष्ट्रांपैकी कोणतेही राष्ट्र त्यांच्यापुढून घालविणार नाही.

  8. शास्ते २:२२सुमारे इ.स.पू. १४१३

    इस्राएली लोकांची मी परीक्षा घेईन आणि त्यांच्या पूर्वजांप्रमाणे याहवेहच्या आज्ञेचे पालन ते करतात की नाही हे पाहण्यासाठी या राष्ट्रांचा मी उपयोग करेन.”

  9. शास्ते २:२३सुमारे इ.स.पू. १४१३

    याहवेहने त्या राष्ट्रांना तिथेच राहू दिले; यहोशुआच्या हातात देऊनही त्यांना एकदम घालवून दिले नाही.

  10. शास्ते ३:१सुमारे इ.स.पू. १४४३

    कनानमधील युद्धांमध्ये भाग न घेतलेल्या इस्राएली लोकांची परीक्षा घेण्यासाठी याहवेहने या राष्ट्रांना त्या देशात राहण्याची परवानगी दिली

  11. शास्ते ३:२सुमारे इ.स.पू. १४४३

    (हे केवळ यासाठी की ज्यांना युद्धाचा पूर्वी कोणताही अनुभव नव्हता, त्या इस्राएली लोकांच्या वंशजांना हा अनुभव यावा):

  12. शास्ते ३:३सुमारे इ.स.पू. १४४३

    ते लोक हे होते, पलिष्टांचे पाच शासक, कनानी, सीदोनी, व बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या घाटापर्यंत लबानोन डोंगरात राहणारे हिव्वी.

  13. शास्ते ३:४सुमारे इ.स.पू. १४४३

    याहवेहने मोशेद्वारे त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञांचे पालन ते करतील की नाही याबाबत परीक्षा पाहण्यासाठी इस्राएली लोकांना मागे राहू दिले होते.

  14. शास्ते ३:५सुमारे इ.स.पू. १४४३

    इस्राएली लोक कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी, आणि यबूसींमध्ये राहू लागले.

  15. शास्ते ३:६सुमारे इ.स.पू. १४४३

    इस्राएली लोकांनी विवाहात त्यांच्या कन्या घेतल्या आणि आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना दिल्या आणि त्यांच्या दैवतांची उपासना करू लागले.

  16. शास्ते ३:७सुमारे इ.स.पू. १४४३

    इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले; ते याहवेह त्यांच्या परमेश्वराला विसरले आणि बआल व अशेरा या दैवतांची उपासना करू लागले.

  17. शास्ते ३:८सुमारे इ.स.पू. १४१३

    याहवेहचा क्रोध इस्राएलावर भडकला म्हणून त्यांनी, जिथे इस्राएली लोक आठ वर्षे गुलामगिरीत होते त्या अराम-नहराईम राजा कुशन-रिशाथईमच्या हाती त्यांना विकले.

  18. शास्ते ३:९सुमारे इ.स.पू. १४०५

    परंतु जेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहचा धावा केला, तेव्हा त्यांनी त्यांना सोडविण्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ केनाजचा पुत्र ओथनिएलला सुटका करणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली.

  19. शास्ते ३:१०सुमारे इ.स.पू. १४०५

    याहवेहचा आत्मा त्याच्यावर उतरला, जेणेकरून तो इस्राएलाचा शास्ता झाला आणि युद्धासाठी निघाला. याहवेहने अरामचा राजा कुशन-रिशाथईमला अथनिएलाच्या हाती दिले, ज्याने त्याच्यावर ताबा घेतला.

  20. शास्ते ३:११सुमारे इ.स.पू. १४०५

    त्यामुळे केनाजचा पुत्र ओथनिएल मरेपर्यंत देशात चाळीस वर्षे शांतता होती.

  21. शास्ते ३:१२सुमारे इ.स.पू. १३४२

    एकदा पुन्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले आणि म्हणून याहवेहने मोआबाचा राजा एग्लोनला इस्राएलावर वर्चस्व करण्यास दिले.

  22. शास्ते ३:१३सुमारे इ.स.पू. १३४२

    एग्लोन अम्मोनी व अमालेकींना सोबत घेऊन आला आणि त्याने इस्राएली लोकांवर हल्ला केला आणि त्यांनी खजुरीच्या झाडांचे शहर ताब्यात घेतले.

  23. शास्ते ३:१४सुमारे इ.स.पू. १३४२

    इस्राएली लोक अठरा वर्षे मोआबचा राजा एग्लोनचे गुलाम होते.

  24. शास्ते ३:१५सुमारे इ.स.पू. १३२५

    इस्राएलांनी पुन्हा याहवेहचा धावा केला आणि त्यांनी त्यांना एक सोडविणारा—बिन्यामीन गेराचा पुत्र एहूद दिला, जो डाव्या हाताचा मनुष्य होता. इस्राएली लोकांनी त्याला मोआबाचा राजा एग्लोनकडे नजराणा देऊन पाठविले.

  25. शास्ते ३:१६सुमारे इ.स.पू. १३२५

    आता एहूदाने दुधारी तलवार बनविली, जी अर्धा मीटर लांब होती, ती त्याने त्याच्या झग्याखाली उजव्या मांडीवर बांधली.