Skip to content

Samson

38 वचने · 2 कुटुंब सदस्य

Samson चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव शमशोन ठेवले. तो वाढत गेला आणि याहवेहने त्याला आशीर्वाद दिला,

  2. शमशोन खाली तिम्नाह येथे गेला आणि तिथे त्याने एक तरुण पलिष्टी स्त्री पाहिली.

  3. त्याच्या आईवडिलांनी प्रत्युत्तर दिले, “तुझ्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या सर्व लोकांमध्ये स्वीकार करण्यायोग्य स्त्री नाही काय? सुंता न झालेल्या पलिष्टी लोकांकडे पत्नी मिळविण्यासाठी का जावे?” परंतु शमशोनाने आपल्या वडिलांना म्हटले, “मला तीच हवी आहे. ती माझ्यासाठी योग्य आहे.”

  4. शमशोन त्यांच्या आईवडिलांसोबत खाली तिम्नाह येथे गेला. ते तिम्नाह येथील द्राक्षांच्या मळ्यांजवळ पोहोचले असता, अचानक एक तरुण सिंह गर्जना करीत त्याच्या अंगावर आला.

  5. नंतर शमशोन खाली गेला आणि त्या स्त्रीसह बोलला आणि ती त्याला प्रिय वाटली.

  6. आता त्याचे वडील त्या स्त्रीला बघायला खाली गेले. आणि तिथे शमशोनाने तरुणांच्या प्रथेप्रमाणे मेजवानी दिली.

  7. शमशोन त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला एक कोडे सांगतो, तुम्ही मला सणाच्या सात दिवसांत उत्तर देऊ शकलात तर मी तुम्हाला तीस तागाची वस्त्रे आणि तीस जोडी कपडे देईन.

  8. चौथ्या दिवशी ते शमशोनाच्या पत्नीस म्हणाले, “तुझ्या पतीला फूस लावून या कोड्याचा अर्थ काढून घे नाहीतर किंवा तुझ्यासह आम्ही तुझ्या वडिलांचे घर तुम्ही मरेपर्यंत जाळून टाकू. आमची मालमत्ता चोरण्यासाठी आम्हाला या मेजवानीला बोलाविले होते का?”

  9. तेव्हा शमशोनाची पत्नी त्याच्यापुढे अश्रू गाळीत म्हणाली, “तुम्ही माझा द्वेष करता! तुम्ही माझ्यावर प्रीती करीत नाही. कारण तुम्ही माझ्या लोकांना कोडे घातले आहे, परंतु तुम्ही मला उत्तर दिले नाही.” तो तिला म्हणाला, “मी माझ्या वडिलांना किंवा आईला देखील कोड्याचे उत्तर सांगितले नाही, तर मग मी तुला ते का सांगावे?”

  10. आणि शमशोनची पत्नी त्याच्या मेजवानीला उपस्थित असलेल्या त्याच्या एका सोबत्याला देण्यात आली.

  11. काही दिवसानंतर गहू कापण्याच्या हंगामात, शमशोनाने एक शेळी घेतली आणि आपल्या पत्नीला भेटायला गेला. तो म्हणाला, “मी माझ्या पत्नीच्या खोलीत जात आहे.” पण तिचे वडील त्याला आत जाऊ देईना.

  12. शमशोन त्यांना म्हणाला, “यावेळी मला पलिष्ट्यांवर चालून जाण्याचा अधिकार आहे; मी त्यांना शिक्षा करेन.”

  13. म्हणून शमशोन बाहेर पडला आणि त्याने तीनशे कोल्हे पकडले आणि जोडीजोडीने त्यांच्या शेपट्या एकत्र बांधल्या. प्रत्येक दोन शेपट्यांच्या जोडीमध्ये त्याने एकएक मशाल बांधली,

  14. तेव्हा पलिष्ट्यांनी विचारले, “हे कोणी केले?” त्यांना सांगण्यात आले, “हे तिम्नाहचा जावई शमशोनाने केले, कारण त्याची पत्नी त्याच्या सोबत्याला देण्यात आली आहे.” तेव्हा पलिष्टी लोक आले व त्यांनी तिला व तिच्या पित्याला जाळून टाकले.

  15. शमशोन त्यांना म्हणाला, “आता तुम्ही याप्रकारे वागला आहात म्हणून, मी अशी शपथ घेतो की तुमच्यावर सूड घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही.”

  16. तेव्हा यहूदीयाच्या लोकांनी विचारले, “तुम्ही आमच्यासोबत युद्ध करण्यास का आलात?” त्यांनी उत्तर दिले, “आम्ही शमशोनाला कैदी करून घेऊन जाण्यास आलो आहोत, कारण जसे त्याने आमचे केले तसे आम्ही त्याचे करणार आहोत.”

  17. तेव्हा यहूदाहचे तीन हजार लोक खाली एटाम खडकातील गुहेकडे गेले आणि ते शमशोनाला म्हणाले, “पलिष्टी लोक आपल्यावर राज्य करतात हे तुला माहीत नाही काय? तू आमच्यासोबत हे काय केले?” त्याने उत्तर दिले, “ज्याप्रकारे त्यांनी माझ्याशी वर्तन केले तसेच मीही त्यांच्याशी केले.”

  18. ते त्याला म्हणाले, “आम्ही तुला बांधण्यासाठी आणि तुला पलिष्टी लोकांच्या हवाली करण्यासाठी आलो आहोत.” शमशोन म्हणाला, “तुम्ही मला ठार मारणार नाही, अशी शपथ माझ्याजवळ घ्या.”

  19. मग शमशोन म्हणाला, “गाढवाच्या जाभाडाने मी राशींवर राशी पाडल्या. केवळ गाढवाच्या जाभाडाने मी हजार माणसे वधली.”

  20. एके दिवशी शमशोन गाझा येथे गेला, जिथे त्याने एका वेश्येला पाहिले. तिच्यासोबत रात्र घालविण्यास तो आत गेला.

  21. गाझा येथील लोकांना सांगण्यात आले, “शमशोन येथे आला आहे!” म्हणून त्यांनी त्या जागेला वेढा घातला आणि त्याची वाट पाहत शहराच्या वेशीत रात्रभर दबा धरून बसले. त्यांनी रात्रभर कोणतीही हालचाल केली नाही, ते म्हणाले, “पहाटेस आपण त्याला ठार मारू.”

  22. परंतु मध्यरात्री पर्यंत शमशोन तिथे झोपला. मग तो उठला आणि त्याने शहराच्या वेशीची दारे, दोन्ही खांब व अडसरासह जमिनीतून उखडून काढली व आपल्या खांद्यांवर ठेवून हेब्रोनासमोरील डोंगरमाथ्यावर नेली.

  23. दलीला शमशोनास म्हणाली, “मला सांगा, तुमच्या प्रचंड सामर्थ्याचे रहस्य काय आहे आणि तुम्हाला कशाने बांधावे आणि तुम्ही शक्तिहीन व्हाल.”

  24. शमशोनाने तिला उत्तर दिले, “जर मला कोणी धनुष्याच्या न सुकलेल्या ताज्या सात दोर्‍यांनी बांधले, तर मी दुसर्‍या कोणत्याही मनुष्यासारखा बलहीन होईन.”

  25. काही लोक खोलीत लपून होते, तिने त्याला म्हटले, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आलेले आहेत!” परंतु अग्नीजवळ जाताच सुताचा धागा जसा सहज तुटून जातो त्याप्रमाणे शमशोनाने त्या धनुष्याच्या दोर्‍या तोडून टाकल्या जणू आणि त्याच्या बळाचे रहस्य उघडकीस आले नाही.