मुख्य मजकुरावर जा

Samson

38 वचने · 2 कुटुंब सदस्य

Samson चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यानंतर दलीला शमशोनास म्हणाली, “तुम्ही मला मूर्ख बनविले आहे; तुम्ही मला खोटे सांगितले. तर आता, मला सांगा तुम्हाला कशाने बांधावे.”

  2. तेव्हा दलीलाने नवीन दोर घेतले आणि त्यांनी त्याला बांधून टाकले. नंतर लोक खोलीत लपून बसलेले होते, ती त्याला म्हणाली, “शमशोन पलिष्टी लोक तुमच्यावर चालून आले आहेत!” परंतु शमशोनाने दंडाला बांधलेले दोर, सुताचा धागा तोडावा त्याप्रमाणे तोडून टाकले!

  3. तेव्हा दलीलाने शमशोनास म्हटले, “आतापर्यंत तुम्ही मला मूर्ख बनविले आणि आणि मला खोटे सांगितले. मला सांगा तुम्हाला कशाने बांधावे.” तो तिला म्हणाला, “पाहा, माझ्या डोक्याच्या केसांच्या सात बटा मागात गुंफल्या आणि त्या फणीने घट्ट केल्या तर मी इतर माणसांसारखा बलहीन होईन.” मग तो झोपला असताना, दलीलाने त्याच्या डोक्याच्या केसांच्या सात बटा मागात गुंफल्या

  4. आणि ते फणीने घट्ट केल्या. परत ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत!” तो आपल्या झोपेतून जागा झाला व त्याने विणकराची फणी व मागसुद्धा उखडून काढला.

  5. मग ती म्हणाली, “शमशोन, तुमच्यावर पलिष्टी चालून आले आहेत!” तो आपल्या झोपेतून जागा झाला आणि त्याला वाटले, “मी पूर्वीप्रमाणेच बाहेर जाईन आणि झटका मारून स्वतःस मोकळे करेन.” परंतु याहवेहने त्याला सोडले आहे, हे त्याला कळले नाही.

  6. आता पलिष्ट्यांचे अधिकारी त्यांचे दैवत दागोनला यज्ञ अर्पण करून उत्सव करण्यास एकत्र आले आणि म्हणाले, “आमच्या दैवताने आमचा शत्रू शमशोनला आमच्या हाती दिले आहे.”

  7. जेव्हा ते मोठ्या आनंदात होते, ते ओरडून म्हणाले, “शमशोनाला आमची करमणूक करण्यास बाहेर आणा.” म्हणून त्यांनी शमशोनाला तुरुंगातून बाहेर आणले आणि त्याने त्यांची करमणूक केली. जेव्हा त्यांनी त्याला दोन खांबाच्या मध्ये उभे केले,

  8. तेव्हा ज्या सेवकाने त्याचा हात धरला होता त्यास शमशोन म्हणाला, “मला अशा ठिकाणी ठेव जेणेकरून ज्या खांबांवर हे मंदिर आधारलेले आहे ते मी चाचपडू शकेन, म्हणजे मी त्याचावर टेकेन.”

  9. आता ते मंदिर पूर्णपणे पुरुषांनी व स्त्रियांनी भरलेले होते; पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तिथे होते आणि गच्चीवर सुमारे तीन हजार पुरुष आणि स्त्रिया शमशोन करीत असलेली करमणूक पाहत होते.

  10. मग शमशोनाने याहवेहला प्रार्थना केली, अहो, सार्वभौम याहवेह माझी आठवण करा. परमेश्वरा कृपा करून आणखी एकदाच मला बळ द्या आणि म्हणजे या पलिष्ट्यांचा मी माझ्या दोन्ही डोळ्यांबद्दल सूड घेऊ शकेन.

  11. मग ज्या मधल्या दोन खांबांवर मंदिर आधारलेले होते, त्यास शमशोनाने एका बाजूला त्याच्या उजव्या हाताने, आणि दुसर्‍या बाजूला डाव्या हाताने धरले,

  12. शमशोन म्हणाला, “या पलिष्ट्यांबरोबर मलाही मृत्यू येवो!” नंतर त्याने आपल्या पूर्ण सामर्थ्याने ढकलले आणि ते मंदिर अधिकारी आणि सर्व लोकांवर कोसळले. त्याच्या मृत्यूच्या क्षणी त्याने जेवढे लोक ठार केले त्यांची संख्या, त्याने आपल्या सर्व हयातीत मारलेल्या संख्येहून अधिक होती.

  13. तर मग, मी आणखी किती उदाहरणे सांगावी? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आणि सर्व संदेष्ट्यांच्या विश्वासाबद्दलच्या कथा सांगण्यासाठी मला वेळ नाही.