Skip to content

Manoah

14 वचने · 1 कुटुंब सदस्य

Manoah चा उल्लेख असलेली वचने

  1. दान कुळातील सोराह येथील एक मनुष्य होता, ज्याचे नाव मानोहा होते, त्याची पत्नी होती, जी वांझ असून ती लेकरांना जन्म देऊ शकत नव्हती.

  2. तेव्हा मानोहाने याहवेहला प्रार्थना केली: “हे प्रभू, तुमच्या सेवकाला क्षमा करा. परमेश्वराचा दूत पुन्हा आमच्याकडे येईल असे करा म्हणजे जे बाळ जन्मास येणार आहे त्याचे संगोपन कसे करावे तो आम्हास शिकवेल.”

  3. परमेश्वराने मानोहानाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि परमेश्वराचा दूत परत त्या स्त्रीकडे आला, जेव्हा ती शेतात बसलेली होती; परंतु तिचा पती मानोहा तिच्याबरोबर नव्हता

  4. मानोहा उठला आणि आपल्या पत्नीसह त्या ठिकाणी गेला, तो त्या पुरुषाजवळ गेला व त्याला विचारले, “त्या दिवशी माझ्या पत्नीशी बोलणारे आपणच आहात का?” त्याने उत्तर केले, “मीच आहे.”

  5. “तेव्हा मानोहाने त्याला विचारले, जेव्हा तुमचे शब्द पूर्ण होतील तेव्हा त्या बाळाच्या कार्यासाठी व जीवनासाठी कोणते नियम असावे?”

  6. याहवेहच्या दूताने मानोहाला उत्तर दिले, “मी तुझ्या पत्नीला जे सांगितले आहे ते सर्व तिने करावे.

  7. मानोहा याहवेहच्या दूतास म्हणाला, “आम्ही आपणासाठी करडू तयार करेपर्यंत आपण येथेच थांबावे.”

  8. याहवेहच्या दूताने उत्तर दिले, “तुम्ही मला रोखून धरले तरी मी तुमचे भोजन खाणार नाही. पण जर तुम्ही होमार्पण तयार केले तर ते याहवेहला अर्पण करा.” (हा याहवेहचा दूत आहे, हे अद्यापही मानोहाला समजले नव्हते.)

  9. नंतर मानोहाने याहवेहच्या दूताला विचारले, “आपले नाव काय? म्हणजे तुमचे शब्द खरे ठरल्यानंतर आम्ही तुमचा सत्कार करू.”

  10. मग मानोहाने एक तरुण करडू घेतले आणि ते अन्नबलीसह याहवेहला एका खडकावर अर्पिले आणि जेव्हा मानोहा आणि त्याची पत्नी हे पाहत असताना याहवेहने आश्चर्यकारक कृत्ये केली:

  11. मानोहा व त्याची पत्नी पाहत असताना वेदीवरून आकाशाकडे उफाळून वर जाणार्‍या अग्नीच्या ज्वालेवर याहवेहच्या दूताने आरोहण केले. ते पाहून मानोहा आणि त्याची पत्नी यांनी दंडवत घातले.

  12. जेव्हा याहवेहचा दूत मानोहा आणि त्याच्या पत्नीला परत प्रकट झाला नाही, तेव्हा मानोहाला हे कळले की तो याहवेहचा दूत होता.

  13. “आता आपला मृत्यू निश्चित आहे!” मानोहा त्याच्या पत्नीला म्हणाला. “आम्ही परमेश्वराला पाहिले आहे!”

  14. नंतर त्याचा मृतदेह नेण्यासाठी त्याचे भाऊबंद आणि पित्याच्या घरचे सर्व कुटुंब खाली आले. त्यांनी त्याला परत आणले व सोराह आणि एष्टाओल यांच्या दरम्यान त्याचा पिता मानोहाला मूठमाती दिली होती, तिथेच त्यालाही मूठमाती दिली. त्याने वीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले.