मुख्य मजकुरावर जा

Worldly Amusements and Pleasures बद्दल बायबलमधील वचने

12 वचने · 21 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. आता पलिष्ट्यांचे अधिकारी त्यांचे दैवत दागोनला यज्ञ अर्पण करून उत्सव करण्यास एकत्र आले आणि म्हणाले, “आमच्या दैवताने आमचा शत्रू शमशोनला आमच्या हाती दिले आहे.”

  2. जेव्हा त्यांनी शमशोनला पाहिले तेव्हा त्यांनी आपल्या दैवताची स्तुती करीत ते म्हणाले, “आमच्या दैवताने आमच्या शत्रूला आमच्या हाती दिले आहे, जो आमच्या देशाची गांजणूक करणारा व आमच्या लोकांतील अनेकांचा संहार करणारा होता.”

  3. जेव्हा ते मोठ्या आनंदात होते, ते ओरडून म्हणाले, “शमशोनाला आमची करमणूक करण्यास बाहेर आणा.” म्हणून त्यांनी शमशोनाला तुरुंगातून बाहेर आणले आणि त्याने त्यांची करमणूक केली. जेव्हा त्यांनी त्याला दोन खांबाच्या मध्ये उभे केले,

  4. तुम्ही जे सीयोनेत आरामात राहता, आणि शोमरोनच्या पर्वतावर निश्चिंत असण्याचा विचार करता की तुम्ही जे राष्ट्रातील मुख्य लोक आहात, ज्यांच्याजवळ इस्राएलचे लोक येतात, त्या तुमचा धिक्कार असो!

  5. कालनेह येथे जा आणि तिला पाहा; तिथून महान हमाथास जा, आणि तिथून खाली पलिष्ट्यांच्या गथ येथे जा. हे तुमच्या दोन राज्याहून अधिक उत्तम आहेत काय? त्यांचा देश तुमच्या देशाहून मोठा आहे काय?

  6. तुम्ही विपत्तीचे दिवस बाजूला सारता, आणि दहशतीचे राज्य जवळ आणता.

  7. तुम्ही हस्तिदंतांनी सजविलेल्या पलंगावर लोळता; आणि तुम्ही अंथरुणावर पडून राहतात. उत्तम कोकरे आणि चरबीयुक्त वासरे खाता.

  8. तुम्ही वीणेच्या सुरावर निरर्थक गाणी गाता, आणि दावीदासारखे आहोत याची भ्रामक कल्पना करता.

  9. तुम्ही वाट्या भरून द्राक्षारस पिता. उत्तम तेलांनी स्वतःला माखता, परंतु तुम्ही योसेफाच्या नाशाबद्दल दुःख करत नाही.

  10. हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियेच्या कन्येने पाहुण्यांसाठी नृत्य करून हेरोदाला खूप संतुष्ट केले.

  11. त्यामुळे वचन देऊन ती जे मागेल ते देण्याची त्याने शपथ वाहिली.

  12. तिने आपल्या आईच्या संकेताप्रमाणे म्हटले, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शिर एका तबकात मला द्या.”