Skip to content

Herod

23 वचने · 5 कुटुंब सदस्य

Herod चा उल्लेख असलेली वचने

  1. त्यावेळी प्रांताधिकारी हेरोदाने येशूंविषयी ऐकले,

  2. आता हेरोदाने आपली पत्नी हेरोदिया, जी पूर्वी त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी होती हिच्या मागणीनुसार योहानाला बांधून तुरुंगात ठेवले होते.

  3. हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियेच्या कन्येने पाहुण्यांसाठी नृत्य करून हेरोदाला खूप संतुष्ट केले.

  4. हेरोद राजाने याबद्दल ऐकले, कारण येशूंचे नाव सर्वठिकाणी प्रसिद्ध झाले होते. काहीजण म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मरणातून उठला आहे आणि म्हणूनच आश्चर्यकर्म करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये दिसत आहे.”

  5. परंतु हेरोदाने हे ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला, तोच पुनः जिवंत झाला आहे!”

  6. कारण हेरोदाने योहानाला बांधून तुरुंगात टाकण्यासाठी हुकूम दिला होता. हेरोदाने हे यासाठी केले, की त्याचा भाऊ फिलिप्पाची पत्नी हेरोदिया हिच्याशी त्याने विवाह केला होता.

  7. कारण योहान हेरोदाला म्हणत असे, “आपला भाऊ फिलिप्पाची पत्नी हेरोदिया हिला तू ठेवावे हे नियमाने अयोग्य आहे.”

  8. कारण हेरोद योहानाला भीत असे आणि तो नीतिमान व पवित्र मनुष्य आहे म्हणून त्याचे संरक्षण करत असे. हेरोद योहानाचे बोलणे ऐकून गोंधळात पडत असे; तरी त्याचे ऐकून घ्यावयास त्याला आवडे असे.

  9. अखेर योग्य समय आला. हेरोदाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने आपल्या दरबारातील मुख्य अधिकारी आणि लष्करातील सेनापती तसेच गालील प्रांतातील प्रमुख नागरिकांना मोठी मेजवानी दिली.

  10. त्या समारंभात हेरोदियेची कन्या आत आली व नृत्य करून तिने हेरोदाला संतुष्ट केले आणि त्याचबरोबर मेजवानीसाठी आलेल्या इतर पाहुणे मंडळीलाही खुश केले. हेरोद राजाने मुलीला म्हटले, “तुला हवे असेल ते माग आणि ते मी तुला देईन.”

  11. “सावध असा,” येशूंनी त्यांना इशारा दिला, “हेरोद राजा आणि परूशी लोकांच्या खमिरापासून सांभाळा.”

  12. तिबिर्य कैसराच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी—ज्यावेळी पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता, हेरोद गालील प्रांताचा, त्याचा भाऊ फिलिप्प इतुरीया व त्राखोनीतीचा आणि लूसनिया अबिलेनेचा शासक होता.

  13. योहानाने मांडलिक हेरोदाला दोष दिला, कारण त्याने आपल्या भावाची पत्नी हेरोदिया हिच्याशी विवाह केला आणि इतर अनेक वाईट गोष्टी केल्या,

  14. येशूंबद्दल शासक हेरोदाने सर्वकाही ऐकले. तेव्हा तो घोटाळ्यात पडला. कारण काही लोक म्हणत होते, “हा बाप्तिस्मा करणारा योहान पुन्हा जिवंत झाला आहे.”

  15. पण हेरोद म्हणाला, “मी तर योहानाचा शिरच्छेद केला होता, मग हा मनुष्य कोण ज्याच्याबद्दल मी ऐकत आहे?” आणि तो येशूंना भेटण्याचा प्रयत्न करू लागला.

  16. काही परूशी येशूंकडे येऊन त्यांना म्हणाले, “आपण येथून निघून जा, कारण हेरोद राजा आपणास जिवे मारावयास पाहत आहे.”

  17. तो गालीली असल्याचे समजल्यावर, पिलाताने येशूंना हेरोद राजाकडे घेऊन जाण्यास सांगितले, कारण गालील प्रांत हेरोदाच्या अधिकारकक्षेत होता आणि स्वतः हेरोद त्यावेळी यरुशलेमात होता.

  18. येशूंना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्यामुळे हेरोद आनंदित झाला. कारण येशूंविषयी त्याने पुष्कळ ऐकले होते आणि त्याने केलेला एखादा चमत्कार डोळ्यांनी पाहण्याची त्याची फार इच्छा होती.

  19. त्यावेळी हेरोद आणि त्याचे शिपाई येशूंचा उपहास आणि चेष्टा करू लागले. त्यांना झगझगीत कपडे घालून त्यांनी पिलाताकडे परत पाठविले.

  20. त्या दिवशी हेरोद आणि पिलात मित्र झाले. त्याआधी ते एकमेकांचे शत्रू होते.

  21. हेरोदाचा निर्णय देखील असाच आहे, म्हणूनच त्याने याला आमच्याकडे परत पाठविले आहे. मरणदंडाची शिक्षा व्हावी असे या मनुष्याने काहीही केलेले नाही.

  22. खरोखर हेरोद राजा आणि राज्यपाल पंतय पिलात आणि सर्व गैरयहूदी आणि त्याचप्रमाणे या शहरात राहणारे इस्राएली लोक तुमचे पवित्र सेवक येशू, ज्यांचा तुम्ही अभिषेक केला आहे, त्यांच्याविरुद्ध कट कारस्थान करण्यास एकत्र आले.

  23. आता अंत्युखिया येथील मंडळीत संदेष्टे व शिक्षक होते: बर्णबा, शिमोन, ज्याला निगेर देखील म्हणत, कुरेनेचा लूक्य, मनायेन ज्याचे संगोपन मांडलिक हेरोद राजाकडून झाले होते आणि शौल.