Skip to content

Timnah

8 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Timnath

31.7800, 34.9000 गूगल नकाशावर पाहा

Timnah चा उल्लेख असलेली वचने

  1. कालांतराने यहूदाहची पत्नी जी शूवाची मुलगी होती ती मरण पावली. शोक करण्याचे दिवस संपल्यावर यहूदाह, आपला मित्र अदुल्लाम येथील हीरा, याच्याबरोबर आपल्या मेंढरांची लोकर कातरणार्‍यांकडे तिम्ना येथे गेला.

  2. “तुझा सासरा तिम्ना येथे मेंढरांची लोकर कातरण्यासाठी गेला आहे,” असे कोणीतरी तामारेला सांगितले.

  3. तिने आपले वैधव्यदशेत वापरण्याचे कपडे बाजूला ठेवून दिले आणि आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून तिने अंगावर बुरखा घेतला. मग तिम्नाच्या वाटेवर असलेल्या एनाईम गावाच्या प्रवेशद्वाराजवळ ती जाऊन बसली. कारण तिने पाहिले की, शेलाह आता मोठा झाला असला तरी तिला त्याची पत्नी म्हणून दिले गेले नाही.

  4. तिथून ती बालाहाच्या पश्चिमेस वळसा घेऊन सेईर पर्वताकडे गेली आणि यआरीम म्हणजेच कसालोन डोंगराच्या उत्तरेस जाऊन बेथ-शेमेश इथे उतरून तिम्नाहास जाऊन पोहोचते.

  5. शमशोन खाली तिम्नाह येथे गेला आणि तिथे त्याने एक तरुण पलिष्टी स्त्री पाहिली.

  6. तिथून परत आल्यावर, तो आपल्या आईवडिलांना म्हणाला, “मी तिम्नाह इथे एक पलिष्टी स्त्री पाहिली आहे; मला ती माझी पत्नी करून द्या.”

  7. शमशोन त्यांच्या आईवडिलांसोबत खाली तिम्नाह येथे गेला. ते तिम्नाह येथील द्राक्षांच्या मळ्यांजवळ पोहोचले असता, अचानक एक तरुण सिंह गर्जना करीत त्याच्या अंगावर आला.

  8. त्यावेळेस पलिष्ट्यांनी डोंगर पायथ्याशी असलेल्या नगरांवर आणि यहूदीयाच्या नेगेवमधील गावांवर हल्ला केला. त्यांनी बेथ-शेमेश, अय्यालोन आणि गदेरोथ, तसेच सोकोह, तिम्नाह आणि गिम्झो आणि त्यांच्या आजूबाजूची गावे काबीज केली.