- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1380–1050 BC
The Judges & Ruth
Israel cycles through rebellion, oppression, and rescue under charismatic leaders—culminating in Ruth's faithful love story.
या कालखंडातील वचने
- शास्ते ७:१६सुमारे इ.स.पू. १२४५
मग गिदोनाने आपल्या तीनशे सैनिकांच्या तीन तुकड्या केल्या आणि प्रत्येकाला एक रणशिंग व मातीचे एक रिकामे मडके दिले, त्या मडक्यात एकेक मशाल होती.
- शास्ते ७:१७सुमारे इ.स.पू. १२४५
तो त्यांना म्हणाला, “माझ्याकडे पाहत राहा आणि जसे मी करतो तसे करा. मी छावणीच्या सीमेवरील टोकावर पोहोचल्यावर जसे मी करतो तसेच करा.
- शास्ते ७:१८सुमारे इ.स.पू. १२४५
मी व माझ्यासोबत असलेल्या सर्वांनी आमची रणशिंगे फुंकल्यानंतर तुम्हीही छावणीच्या सर्व बाजूंना तुमची रणशिंगे फुंका आणि मोठ्याने ओरडून म्हणा, ‘याहवेहसाठी व गिदोनासाठी.’ ”
- शास्ते ७:१९सुमारे इ.स.पू. १२४५
गिदोन आणि त्याच्या बरोबरची शंभर माणसे मध्य पहाटेच्या सुरुवातीला पहारा बदलल्यानंतर छावणीच्या टोकाला पोहोचले. त्यांनी रणशिंग फुंकले आणि त्यांच्या हातातील मडके फोडले.
- शास्ते ७:२०सुमारे इ.स.पू. १२४५
तीनही दलांनी रणशिंग फुंकले आणि मडके फोडले. आपल्या डाव्या हातात मशाली धरून आणि उजव्या हातात रणशिंगे धरून जे फुंकणार होते, ते ओरडले, “याहवेहसाठी आणि गिदोनासाठी तलवार!”
- शास्ते ७:२१सुमारे इ.स.पू. १२४५
प्रत्येक व्यक्ती छावणीच्या सभोवताली आपल्या स्थानी उभे राहिले, सर्व मिद्यानी लोक पळू लागले, ते पळत असता मोठ्याने ओरडत पळाले.
- शास्ते ७:२२सुमारे इ.स.पू. १२४५
जेव्हा तीनशे रणशिंगे फुंकली, याहवेहने छावणीतील संपूर्ण पुरुषांची तलवार त्यांच्याच साथीदारावर चालविली. सैन्य सरेराहनजीकच्या बेथ-शिट्टाहपर्यंत व टब्बाथा नजीकच्या आबेल-महोलाहच्या सीमेपर्यंत पळून गेले.
- शास्ते ७:२३सुमारे इ.स.पू. १२४५
तेव्हा नफताली, आशेर व मनश्शेहमधील इस्राएली लोकांना बोलाविले गेले आणि त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग केला.
- शास्ते ७:२४सुमारे इ.स.पू. १२४५
गिदोनाने एफ्राईमच्या सर्व डोंगराळ प्रदेशात आपले दूत पाठवून हा संदेश दिला, “खाली येऊन मिद्यानाशी लढून बेथ-बाराहपर्यंत यार्देन नदीचे उतार रोखून धरा.” म्हणून एफ्राईमच्या सर्व लोकांना बोलाविण्यात आले आणि त्यांनी बेथ बारापर्यंत यार्देन नदीचा उतार रोखून धरला.
- शास्ते ७:२५सुमारे इ.स.पू. १२४५
त्यांनी ओरेब व जेब नावांच्या दोन मिद्यानी पुढार्यांनाही पकडले. त्यांनी ओरेबाला ओरेबाच्या खडकावर मारले आणि जेबाला जेबाच्या द्राक्षकुंडाजवळ मारले. मग इस्राएली लोकांनी मिद्यानांचा पाठलाग केला आणि ओरेब व जेब यांची शिरे यार्देनेपलीकडे गिदोनाकडे आणली.
- शास्ते ८:१सुमारे इ.स.पू. १२४५
आता एफ्राईमचे लोक गिदोनाला म्हणाले, “तू आमच्याशी असा का वागला? जेव्हा तू मिद्यानी लोकांशी युद्ध करावयास गेला तर आम्हाला का बोलाविले नाही?” आणि त्यांनी रागात गिदोनासह वाद घातला.
- शास्ते ८:२सुमारे इ.स.पू. १२४५
परंतु त्याने त्यांना उत्तर दिले, “तुमच्या तुलनेत मी काय साध्य केले आहे? एफ्राईमच्या द्राक्षांचा सरवा हा अबिएजेराच्या द्राक्षाच्या पूर्ण कापणीपेक्षा चांगला नाही काय?
- शास्ते ८:३सुमारे इ.स.पू. १२४५
परमेश्वराने ओरेब व जेब मिद्यानी पुढारी तुमच्या हातात दिले. तुमच्या तुलनेने मी काय केले आहे?” असे बोलल्यानंतर त्यांचा त्याच्यावरचा राग शांत झाला.
- शास्ते ८:४सुमारे इ.स.पू. १२४५
मग गिदोन आणि त्याचे तीनशे लोक थकून गेलेले होते तरीही ते त्यांचा पाठलाग करीत यार्देन किनारी आले आणि पलीकडे गेले.
- शास्ते ८:५सुमारे इ.स.पू. १२४५
तो सुक्कोथ येथील लोकांना म्हणाला, “मी तुम्हाला विनंती करतो की, माझ्याबरोबरच्या लोकांना काही भाकरी द्या; कारण ते फार थकले आहेत आणि मी मिद्यानी लोकांचे राजे जेबह व सलमुन्नाचा आताही पाठलाग करीत आहे.”
- शास्ते ८:६सुमारे इ.स.पू. १२४५
परंतु सुक्कोथाचे अधिकारी म्हणाले, “आता तुझ्या हातात जेबह व सलमुन्नाचे हात आहेत का? मग आम्ही तुझ्या सैन्याला भाकरी का द्यावी?”
- शास्ते ८:७सुमारे इ.स.पू. १२४५
त्यावर गिदोन म्हणाला, “याहवेह जेव्हा जेबह व सलमुन्नाला माझ्या हाती देतील, तेव्हा मी रानातील काटे व काटेरी झुडपांनी तुमच्या शरीराचे मांस फाडेन.”
- शास्ते ८:८सुमारे इ.स.पू. १२४५
मग तो तिथून पेनुएल येथे गेला आणि तिथेही त्याने तीच विनंती केली, पण त्यांनी देखील सुक्कोथ येथील लोकांप्रमाणे उत्तर दिले.
- शास्ते ८:९सुमारे इ.स.पू. १२४५
म्हणून तो पेनुएलच्या लोकांना म्हणाला, “मी सुरक्षित परत येईन, तेव्हा हा बुरूज पाडून टाकेन.”
- शास्ते ८:१०सुमारे इ.स.पू. १२४५
आता जेबह राजा व सलमुन्ना राजा आपल्या उरलेल्या पंधरा हजार सैनिकांसह कर्कोर येथे पोहोचले होते, पूर्वेकडील देशांच्या मित्र सेनांपैकी तेवढेच सैनिक उरले होते; कारण त्यांचे एक लाख वीस हजार सैनिक आधीच ठार झालेले होते.
- शास्ते ८:११सुमारे इ.स.पू. १२४५
मग गिदोनाने नोबाह व योगबेहाहच्या पूर्वेस राहुट्यात राहणार्या लोकांच्या वाटेने वर जाऊन बेसावध सेनेवर अचानक हल्ला चढविला.
- शास्ते ८:१२सुमारे इ.स.पू. १२४५
जेबह व सलमुन्ना हे दोन मिद्यानी राजे पळाले, परंतु त्याने त्यांचा पाठलाग केला व त्यांना पकडले आणि त्यांच्या सर्व सैन्याची दाणादाण केली.
- शास्ते ८:१३सुमारे इ.स.पू. १२४५
योआशाचा पुत्र गिदोन युद्धावरून हेरेसच्या खिंडीतून परत आला.
- शास्ते ८:१४सुमारे इ.स.पू. १२४५
तिथे त्याने सुक्कोथातील एका तरुणास पकडले व त्याला विचारले आणि त्या तरुणाने सुक्कोथ येथील सर्व सत्याहत्तर अधिकारी आणि वडीलजनांची नावे लिहून दिली.
- शास्ते ८:१५सुमारे इ.स.पू. १२४५
मग गिदोन आला आणि सुक्कोथ येथील लोकांना म्हणाला, “यांना पाहा हे जेबह राजा व सलमुन्ना यांच्याविषयी तुम्ही मला टोमणा मारत म्हटले होते, ‘आता तुझ्या हातात ओरेब व जेबाचे हात आहेत काय? मग आम्ही तुझ्या थकलेल्या सैन्याला भाकरी का द्यावी?’ ”