मुख्य मजकुरावर जा

circa 1380–1050 BC

The Judges & Ruth

Israel cycles through rebellion, oppression, and rescue under charismatic leaders—culminating in Ruth's faithful love story.

703 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शास्ते ११:६सुमारे इ.स.पू. ११८७

    त्यांनी इफ्ताहाला म्हटले, “ये आणि आमचा सेनापती हो, म्हणजे आपण अम्मोनी लोकांविरुद्ध युद्ध करू.”

  2. शास्ते ११:७सुमारे इ.स.पू. ११८७

    गिलआदाच्या वडीलजनांना इफ्ताह म्हणाला, “तुम्ही माझा द्वेष केला नाही का आणि मला माझ्या वडिलांच्या घरातून हाकलून लावले होते ना? जेव्हा तुम्ही संकटात आहात तेव्हा आता तुम्ही मजकडे का आलात?”

  3. शास्ते ११:८सुमारे इ.स.पू. ११८७

    गिलआदाच्या वडीलजनांनी इफ्ताहाला म्हटले, “आम्ही तुझ्याकडे यासाठी आलो आहेत की; तू आमच्यासोबत अम्मोनी लोकांविरुद्ध युद्ध करण्यास ये आणि गिलआद मधील रहिवाशांचा प्रमुख हो.”

  4. शास्ते ११:९सुमारे इ.स.पू. ११८७

    गिलआदाच्या वडीलजनांना इफ्ताहाने उत्तर दिले, “समजा तुम्ही मला अम्मोनी लोकांशी लढण्यासाठी परत नेले आणि याहवेहने ते मला दिले तर मी खरोखर तुमचा प्रमुख होईन काय?”

  5. शास्ते ११:१०सुमारे इ.स.पू. ११८७

    गिलआदाच्या वडिलांनी इफ्ताहाला उत्तर दिले, “याहवेह आमचे साक्षी आहेत; तुम्ही सांगाल तसे आम्ही नक्कीच करू.”

  6. शास्ते ११:११सुमारे इ.स.पू. ११८७

    तेव्हा इफ्ताह गिलआदाच्या वडिलांसोबत गेला आणि लोकांनी त्याला त्यांचा प्रमुख व सेनापती केले. आणि त्याने मिस्पाह येथे याहवेहसमोर आपले सर्व शब्द पुन्हा सांगितले.

  7. शास्ते ११:१२सुमारे इ.स.पू. ११८७

    नंतर इफ्ताहाने अम्मोनी राजाकडे दूत पाठवून प्रश्न केला: “तुला माझ्याविरुद्ध काय तक्रार आहे की तू माझ्या देशावर हल्ला केला?”

  8. शास्ते ११:१३सुमारे इ.स.पू. ११८७

    अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाच्या दूतांना उत्तर दिले, “जेव्हा इस्राएली लोक इजिप्त देशामधून बाहेर आले, तेव्हा आर्णोन नदीपासून यब्बोक आणि यार्देन या नद्यांपर्यंतचा सर्व मुलूख त्यांनी हिरावून घेतला होता. आता तो शांततेने परत केला जावा.”

  9. शास्ते ११:१४सुमारे इ.स.पू. ११८७

    इफ्ताहाने अम्मोनी राजाकडे दूतांना परत पाठवले

  10. शास्ते ११:१५सुमारे इ.स.पू. ११८७

    म्हणाला: “इफ्ताह असे म्हणतो: इस्राएलने मोआब किंवा अम्मोनी लोकांची भूमी घेतली नाही.

  11. शास्ते ११:१६सुमारे इ.स.पू. ११८७

    परंतु जेव्हा इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले, त्यांनी तांबडा समुद्र ओलांडला आणि कादेश या ठिकाणी आले.

  12. शास्ते ११:१७सुमारे इ.स.पू. ११८७

    तेव्हा इस्राएली लोकांनी एदोमाच्या राजाकडे दूतांना पाठवून म्हटले, ‘आम्हाला तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या,’ परंतु एदोमाच्या राजाने ऐकले नाही. तसाच त्यांनी मोआबाच्या राजाकडे निरोप पाठविला आणि त्यानेही नकार दिला. म्हणून इस्राएली लोक कादेश येथेच राहिले.

  13. शास्ते ११:१८सुमारे इ.स.पू. ११८७

    “नंतर त्यांनी एदोम आणि मोआब या देशांना वेढा घालून रानातून आणि पूर्वेकडील सीमेने प्रवास करीत मोआबाच्या सीमेच्या पलीकडे आर्णोन नदीजवळ तळ दिला. परंतु त्यांनी मोआबाच्या सीमेत प्रवेश केला नाही, कारण आर्णोन ही मोआबाची सीमा होती.

  14. शास्ते ११:१९सुमारे इ.स.पू. ११८७

    “नंतर इस्राएलने अमोर्‍यांचा राजा सीहोनकडे दूतांना पाठविले. जो त्यावेळी हेशबोन येथे राज्य करीत होता आणि त्याला म्हटले, ‘आम्हाला आमच्या स्वस्थानी जाण्यासाठी तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या.’

  15. शास्ते ११:२०सुमारे इ.स.पू. ११८७

    त्यांना त्याच्या सीमेतून जाऊ द्यावे असा विश्वास सीहोन राजाने इस्राएलवर ठेवला नाही. त्याने आपले सर्व सैन्य गोळा केले आणि याहसाह येथे तळ दिला आणि इस्राएलाशी युद्ध केले.

  16. शास्ते ११:२१सुमारे इ.स.पू. ११८७

    “नंतर याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने सीहोन व त्याचे सर्व सैन्य इस्राएलाच्या हाती दिले आणि त्यांनी त्यांचा पराभव केला. त्या देशात राहणार्‍या अमोरी लोकांचा सर्व देश इस्राएलने घेतला,

  17. शास्ते ११:२२सुमारे इ.स.पू. ११८७

    आर्णोन ते यब्बोकपर्यंत आणि वाळवंटापासून यार्देनपर्यंत अमोर्‍यांचा सर्व प्रदेश काबीज केला.

  18. शास्ते ११:२३सुमारे इ.स.पू. ११८७

    “याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराने आपल्या इस्राएली लोकांपुढून अमोर्‍यांना घालवून टाकले, तर ते परत मागण्याचा तुला कोणता अधिकार आहे?

  19. शास्ते ११:२४सुमारे इ.स.पू. ११८७

    तुझे दैवत कमोशने तुला काही वतन दिले, तर ते तू आपल्या ताब्यात ठेवणार नाहीस का? तसेच याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला जे वतन म्हणून देत आहे, ते आम्ही आमच्याच ताब्यात ठेवू.

  20. शास्ते ११:२५सुमारे इ.स.पू. ११८७

    सिप्पोरचा पुत्र मोआबाचा राजा बालाकहून आपण श्रेष्ठ आहोत, असे तुला वाटते काय? त्याने इस्राएलशी कधी भांडण केले का किंवा त्यांच्याशी त्याने युद्ध केले काय?

  21. शास्ते ११:२६सुमारे इ.स.पू. ११८७

    तीनशे वर्षे इस्राएलने हेशबोन, अरोएर, आजूबाजूच्या वसाहती आणि आर्णोनच्या बाजूची सर्व नगरे ताब्यात घेतली. त्या काळात तुम्ही त्यांना पुन्हा का घेतले नाही?

  22. शास्ते ११:२७सुमारे इ.स.पू. ११८७

    मी तुझ्याविरुद्ध काही अपराध केलेला नाही, उलट तूच माझ्याशी लढण्यासाठी येऊन माझ्यावर अन्याय करीत आहेस. याहवेह जे न्यायी आहेत, ते इस्राएली लोक व अम्मोनी लोक यांच्यामध्ये आज न्याय करोत.”

  23. शास्ते ११:२८सुमारे इ.स.पू. ११८७

    अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाने पाठविलेल्या संदेशाकडे अजिबात लक्ष दिले नाही.

  24. शास्ते ११:२९सुमारे इ.स.पू. ११८७

    मग याहवेहचा आत्मा इफ्ताहावर आला. तो गिलआद व मनश्शेह पार करून गिलआदाच्या मिस्पेह येथे गेला आणि तिथून त्याने अम्मोनी लोकांवर आक्रमण केले.

  25. शास्ते ११:३०सुमारे इ.स.पू. ११८७

    इफ्ताहाने याहवेहला नवस केला: “जर तुम्ही अम्मोनी लोकांना माझ्या हाती द्याल,