मुख्य मजकुरावर जा

circa 1380–1050 BC

The Judges & Ruth

Israel cycles through rebellion, oppression, and rescue under charismatic leaders—culminating in Ruth's faithful love story.

703 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शास्ते ११:३१सुमारे इ.स.पू. ११८७

    आणि जेव्हा मी अम्मोन्यांकडून सुरक्षित परत येईन, तेव्हा माझ्या घराच्या दारातून जे काही मला भेटायला येईल ते याहवेहचे असेल आणि मी त्याचा होमार्पण म्हणून यज्ञ करेन.”

  2. शास्ते ११:३२सुमारे इ.स.पू. ११८७

    नंतर इफ्ताहाने अम्मोन्यांवर आक्रमण केले आणि याहवेहने त्यांना त्याच्या हाती दिले.

  3. शास्ते ११:३३सुमारे इ.स.पू. ११८७

    अरोएरापासून ते मिन्नीथापर्यंतच्या वाटेवरील सर्व वीस नगरांमध्ये आणि दूर आबेल-करामीमपर्यंत त्याने अम्मोन्यांची भयंकर कत्तल केली. अशाप्रकारे इस्राएली लोकांनी अम्मोनी लोकांस जेरीस आणले.

  4. शास्ते ११:३४सुमारे इ.स.पू. ११८७

    जेव्हा इफ्ताह मिस्पाह येथे आपल्या घरी परतला, त्याची कन्या डफ वाजवित व आनंदाने नृत्य करीत त्याला भेटण्यास बाहेर आली! ती त्याची एकुलती एक कन्या होती, तिच्याशिवाय त्याला पुत्र किंवा कन्या नव्हती.

  5. शास्ते ११:३५सुमारे इ.स.पू. ११८७

    जेव्हा त्यांना तिला पाहिले, त्याने आपली वस्त्रे फाडली आणि तो आकांत केला, “हाय, हाय, माझ्या कन्ये! तू मला मातीत मिळविले आहेस आणि तू माझ्या शोकाचे कारण झाली आहेस! कारण मी याहवेहला नवस केला आहे, जो आता मला मागे घेता येत नाही.”

  6. शास्ते ११:३६सुमारे इ.स.पू. ११८७

    “माझ्या पित्या,” तिने म्हटले, “याहवेहला तुम्ही आपले वचन दिलेले आहे. तुम्ही दिलेल्या वचनानुसार माझ्यासोबत करा, कारण याहवेहने तुमचे शत्रू अम्मोनी लोकांवर तुम्हाला विजय दिलेला आहे.

  7. शास्ते ११:३७सुमारे इ.स.पू. ११८७

    परंतु माझी एक विनंती मान्य करा,” ती म्हणाली. “मला माझ्या सख्यांबरोबर दोन महिने डोंगरावर फिरू द्या आणि माझा विवाह कदापि होणार नाही, याबद्दल शोक करू द्या.”

  8. शास्ते ११:३८सुमारे इ.स.पू. ११८७

    त्यावर तो म्हणाला, “ठीक आहे, तू जाऊ शकते.” त्याने तिला दोन महिन्यांसाठी जाऊ दिले. ती आणि तिच्या सख्या डोंगरावर गेल्या आणि तिचा विवाह कदापि होणार नाही, याबद्दल शोक केला.

  9. शास्ते ११:३९सुमारे इ.स.पू. ११८७

    दोन महिन्यानंतर ती आपल्या पित्याकडे परत आली आणि त्याने नवस केल्याप्रमाणे तिच्यासोबत केले आणि ती कुमारिका होती. त्यानंतर इस्राएली लोकांमध्ये प्रथा पडली,

  10. शास्ते ११:४०सुमारे इ.स.पू. ११८७

    की प्रत्येक वर्षी इस्राएली कुमारिकांनी चार दिवस डोंगरांवर जावे आणि गिलआदी इफ्ताहाच्या कन्येच्या स्मरणात शोक करावा.

  11. मग एफ्राईमच्या लोकांनी आपले सैन्य एकवटले आणि ते पार होऊन साफोन येथे आले. ते इफ्ताहाला म्हणाले, “आम्हाला सोबत न घेता तू अम्मोन्यांशी लढावयास का गेलास? आता आम्ही तुझ्यासह तुझे घर जाळून टाकणार आहोत.”

  12. इफ्ताहाने प्रत्युत्तर दिले, “मी आणि माझ्या लोकांचे अम्मोन्यांशी फार मोठे भांडण झाले आणि मी तुम्हाला बोलाविले देखील होते, पण तुम्ही मला त्यांच्या हातातून सोडविले नाही.

  13. जेव्हा मी हे पहिले तुम्ही मदतीला येत नाही, तेव्हा मी माझ्या जिवावर उदार होऊन अम्मोनी लोकांवर चालून गेलो आणि याहवेहने मला त्यांच्यावर विजय दिला. मग आज तुम्ही आमच्याविरुद्ध लढावयास का आलात?”

  14. मग इफ्ताहाने गिलआदाच्या माणसांना एकत्र बोलाविले आणि एफ्राईमच्या विरुद्ध युद्ध केले. गिलआदाच्या माणसांनी एफ्राईमच्या लोकांना मारले, कारण ते म्हणाले होते, “तुम्ही गिलआदाचे लोक एफ्राईमातून व मनश्शेहतून पळपुटे आहात.”

  15. गिलआदांनी एफ्राईमकडे जाणारे यार्देनेचे खोरे काबीज केले आणि जेव्हा एफ्राईममधील कोणी वाचला व म्हणाला, “मला ओलांडू दे,” तेव्हा गिलआदाचे लोक त्याला विचारीत, “तू एफ्राईमी आहेस का?” जर तो म्हणाला, “नाही,”

  16. ते म्हणत, “ठीक आहे मग ‘शिब्बोलेथ म्हण.’ ” जर तो “सीब्बोलेथ,” म्हणाला, कारण तो ते शब्द नीट उच्चारू शकला नाही, तर ते त्याला धरत आणि त्याला यार्देनेच्या उतारावर ठार करीत. त्यावेळी एफ्राईमचे बेचाळीस हजार लोक ठार झाले.

  17. इफ्ताहाने सहा वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले. मग गिलआदी इफ्ताह मरण पावला आणि त्याला गिलआदाच्या एका गावात पुरण्यात आले.

  18. त्याच्यानंतर बेथलेहेमच्या इब्झानने इस्राएलचे नेतृत्व केले.

  19. त्याला तीस पुत्र आणि तीस कन्या होत्या. त्याने आपल्या कन्यांचा विवाह परकीय कुळात केला आणि आपल्या पुत्रांसाठी त्याने तीस तरुण स्त्रिया परकीय कुळांतून आणल्या. इब्झानने इस्राएलचे नेतृत्व सात वर्षे केले.

  20. नंतर इब्झान मरण पावला आणि त्याला बेथलेहेमात मूठमाती देण्यात आली.

  21. शास्ते १२:११सुमारे इ.स.पू. ११७४

    त्याच्यानंतर एलोन जबुलूनने दहा वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले.

  22. शास्ते १२:१२सुमारे इ.स.पू. ११७४

    मग एलोन मरण पावला आणि त्याला जबुलून देशातील अय्यालोनमध्ये पुरण्यात आले.

  23. शास्ते १२:१३सुमारे इ.स.पू. ११६४

    त्याच्यानंतर पिराथोन येथील हिल्लेलचा मुलगा अब्दोनाने इस्राएलचे नेतृत्व केले.

  24. शास्ते १२:१४सुमारे इ.स.पू. ११६४

    त्याला चाळीस पुत्र आणि तीस नातू होते, ते सत्तर गाढवांवर स्वार होते. त्याने आठ वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले.

  25. शास्ते १२:१५सुमारे इ.स.पू. ११५६

    मग हिल्लेलचा पुत्र अब्दोन मरण पावला आणि त्याला अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात एफ्राईममधील पिराथोन येथे पुरण्यात आले.