मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह ४०:१०सुमारे इ.स.पू. ७१२

    पाहा, सार्वभौम याहवेह सामर्थ्याने येत आहेत, आणि ते बलाढ्य हाताने राज्य करतात. पाहा, त्यांचे बक्षीस त्यांच्याबरोबर आहे, आणि ते देत असलेला मोबदला त्यांच्याबरोबर आहे.

  2. यशायाह ४०:११सुमारे इ.स.पू. ७१२

    ते मेंढपाळाप्रमाणे त्यांच्या कळपाचे संगोपन करतात: ते कोकरांना त्यांच्या कवेत एकत्र करतात आणि आपल्या हृदयाजवळ ठेवतात; जे अजून पिल्ले आहेत, त्यांना ते सौम्यपणाने नेतात.

  3. यशायाह ४०:१२सुमारे इ.स.पू. ७१२

    त्यांच्या ओंजळीत असलेले पाणी कोणी मोजले आहे, किंवा त्यांच्या हाताच्या रुंदीने आकाशात चिन्हे मापली आहेत? पृथ्वीवरील धूळ टोपलीत कोणी ठेवली आहे, किंवा पर्वतांचे वजन तराजूवर कोणी केले आहे आणि कोणी टेकड्या तोलल्या आहेत?

  4. यशायाह ४०:१३सुमारे इ.स.पू. ७१२

    याहवेहचा आत्मा कोण जाणू शकेल, किंवा याहवेहना सल्ला देऊ शकेल असा कोण सल्लागार आहे?

  5. यशायाह ४०:१४सुमारे इ.स.पू. ७१२

    ज्ञान प्राप्त करण्यासाठी याहवेह यांना कोणी सल्ला दिला, आणि त्यांना योग्य मार्ग कोणी शिकवला? असा कोण होता ज्याने त्यांना ज्ञान शिकविले, किंवा कोणी त्यांना समंजसपणाचा मार्ग दाखविला?

  6. यशायाह ४०:१५सुमारे इ.स.पू. ७१२

    राष्ट्रे ही निश्चितच बादलीतील थेंबासारखी आहेत; त्यांना तराजूवर असलेली धूळ समजले जाते; बेटांना ते असे तोलतात, जणू ते धूलिकण आहेत.

  7. यशायाह ४०:१६सुमारे इ.स.पू. ७१२

    लबानोनांच्या विशाल वनाची लाकडे वेदीच्या अग्नीसाठी पुरेशी नाहीत, तसेच होमार्पणासाठी तेथील असंख्य जनावरे सुद्धा पुरेशी नाहीत.

  8. यशायाह ४०:१७सुमारे इ.स.पू. ७१२

    त्यांच्यापुढे सर्व राष्ट्रे काहीच नसल्यासारखी आहेत; ते त्यांना निरुपयोगी असे समजतात. त्यांच्या दृष्टीने शून्यवत आहेत.

  9. यशायाह ४०:१८सुमारे इ.स.पू. ७१२

    तर मग तुम्ही परमेश्वराची तुलना कोणाबरोबर कराल? तुम्ही कोणत्या प्रतिमेला त्यांची उपमा द्याल?

  10. यशायाह ४०:१९सुमारे इ.स.पू. ७१२

    एक धातूकाम करणारा ओतीव मूर्ती तयार करतो, आणि सोनार त्याला सोन्याने मढवितो आणि तिची चांदीच्या साखळ्यांनी सजावट करतो.

  11. यशायाह ४०:२०सुमारे इ.स.पू. ७१२

    गरीब लोक अशा प्रकारचे अर्पण करू शकत नाही सडले जाणार नाही, असे लाकूड ते निवडतात; ती मूर्ती पडणार नाही अशी तिची रचना करण्यासाठी ते एका कुशल कारागिराला शोधतात.

  12. यशायाह ४०:२१सुमारे इ.स.पू. ७१२

    तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही ते कधी ऐकले नाही काय? तुम्हाला ते सुरुवातीपासूनच सांगितले नव्हते काय? पृथ्वीची स्थापना होताच तुम्ही ते कधी जाणले नाही काय?

  13. यशायाह ४०:२२सुमारे इ.स.पू. ७१२

    जे पृथ्वीवरील मंडलावर विराजमान होतात, त्यावरील लोक त्यांना टोळांप्रमाणे दिसतात. ते आकाशे एखाद्या आच्छादनाप्रमाणे पसरवितात, आणि तंबूप्रमाणे त्याला फैलावून आपला डेरा तयार करतात.

  14. यशायाह ४०:२३सुमारे इ.स.पू. ७१२

    ते राजपुत्रांना तुच्छतेस आणतात आणि या जगातील राज्यकर्त्यांना शून्यवत करून टाकतात.

  15. यशायाह ४०:२४सुमारे इ.स.पू. ७१२

    लागण करताच, पेरणी करताच, ते जमिनीत मूळ धरू लागते तोच, ते त्यांच्यावर फुंकर घालतात आणि ते कोमेजून जाते, आणि भुशाप्रमाणे वारा ते वाहून नेतो.

  16. यशायाह ४०:२५सुमारे इ.स.पू. ७१२

    “माझी तुलना तुम्ही कोणाशी कराल? माझी बरोबरी करेल असा कोण आहे?” असे पवित्र परमेश्वर विचारतात.

  17. यशायाह ४०:२६सुमारे इ.स.पू. ७१२

    तुमची दृष्टी वर करा व आकाशाकडे पाहा: हे सर्व कोणी निर्माण केले आहे? एकामागून एक असे हे तारांगण कोणी अस्तित्वात आणले आहे, आणि त्यातील प्रत्येकाला ते नावाने हाक मारतात. त्यांच्या थोर सामर्थ्यामुळे व त्यांच्या अमर्याद शक्तीमुळे त्यातील एकही कधी हरवत नाही.

  18. यशायाह ४०:२७सुमारे इ.स.पू. ७१२

    हे याकोबा, तू अशी तक्रार का करतो? हे इस्राएला, असे तू कसे म्हणतोस, “याहवेहपासून माझे मार्ग लपलेले आहेत; माझे परमेश्वर माझ्या संकटाकडे दुर्लक्ष का करतात”?

  19. यशायाह ४०:२८सुमारे इ.स.पू. ७१२

    तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही ते कधी ऐकले नाही काय? याहवेहच सनातन परमेश्वर आहेत, पृथ्वीच्या दिगंताचे उत्पन्नकर्ता तेच आहेत. ते कधी थकणार वा कंटाळणार नाहीत, त्यांची आकलन शक्ती अगम्य आहे.

  20. यशायाह ४०:२९सुमारे इ.स.पू. ७१२

    थकलेल्यास ते शक्ती देतात आणि बलहीनाचे सामर्थ्य वाढवितात.

  21. यशायाह ४०:३०सुमारे इ.स.पू. ७१२

    तरुण थकतात व कंटाळतात, तरुण पुरुष देखील ठेचाळतात व पडतात;

  22. यशायाह ४०:३१सुमारे इ.स.पू. ७१२

    पण जे याहवेहवर आशा ठेवतात ते नवे सामर्थ्य प्राप्त करतात, ते त्यांच्या पंखांनी गरुडाप्रमाणे वर झेप घेतील; ते धावतील पण दमणार नाहीत, ते चालतील पण क्षीण होणार नाहीत.

  23. यशायाह ४१:१सुमारे इ.स.पू. ७१२

    “हे बेटांनो, तुम्ही माझ्यासमोर शांत राहा! राष्ट्रांना त्यांच्या सामर्थ्याचे नूतनीकरण करू द्या! त्यांना पुढे येऊन बोलू द्या; न्यायनिवाड्यासाठी आपण एकत्र भेटू या.

  24. यशायाह ४१:२सुमारे इ.स.पू. ७१२

    “पूर्वेकडून कोणी एकाला चिथविले, नीतिमत्वात त्यांची सेवा करण्यासाठी त्याला बोलाविले? राष्ट्रांना ते त्याच्या स्वाधीन करतात आणि राजांना त्याच्या अधीन करतात. ते त्याच्या तलवारीने त्यांची धूळधाण करतात, त्याच्या धनुष्याने वार्‍याने उडणारा भुसा करतात.

  25. यशायाह ४१:३सुमारे इ.स.पू. ७१२

    तो त्यांचा पाठलाग करतो व काहीही इजा न होता, आणि आधी प्रवास न केलेल्या वाटेने सुरक्षित पुढे निघून जातो.