मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह ३८:१५सुमारे इ.स.पू. ७१८

    परंतु मी काय बोलू शकतो? ते माझ्याशी बोलले आहेत आणि त्यांनी स्वःताच हे केले आहे. कारण माझ्या या तीव्र मनोवेदनेमुळे माझी सर्व वर्षे मी नम्रपणाने चालेन.

  2. यशायाह ३८:१६सुमारे इ.स.पू. ७१८

    हे प्रभू, अशा गोष्टी करून लोक जगतात; आणि माझ्या आत्म्याला त्यांच्यामध्येही जीवन सापडते. तुम्ही माझे आरोग्य पुनः प्रदान केले आहे आणि मला जीवन दिले आहे.

  3. यशायाह ३८:१७सुमारे इ.स.पू. ७१८

    अशा मनोवेदना मी सहन करणे निश्चितच माझ्या भल्याचे होते. तुमच्या प्रेमाखातर तुम्ही मला नाशाच्या गर्तेपासून वाचविले; तुम्ही माझी सर्व पापे तुमच्या पाठीमागे टाकली आहेत.

  4. यशायाह ३८:१८सुमारे इ.स.पू. ७१८

    कारण अधोलोक तुमची स्तुती करू शकत नाही, मृत्यू तुमचे स्तुतिगान करू शकत नाही. जे खाली गर्तेत जातात ते तुमच्या विश्वासूपणाची आशा करू शकत नाहीत.

  5. यशायाह ३८:१९सुमारे इ.स.पू. ७१८

    जिवंत, जे जिवंत आहेत—ते तुमची स्तुती करतात, जसे मी आज करीत आहे; पालक त्यांच्या मुलांना तुमच्या विश्वासूपणाबद्दल सांगतात.

  6. यशायाह ३८:२०सुमारे इ.स.पू. ७१८

    याहवेह मला वाचवतील, आणि आपण याहवेहच्या मंदिरात आपल्या आयुष्याचे सर्व दिवस तंतुवाद्याच्या साहाय्याने गाणी गात राहू.

  7. यशायाह ३८:२१सुमारे इ.स.पू. ७१८

    यशायाहने म्हटले होते, “अंजिराचा लेप तयार करा आणि तो गळवावर लावा आणि तो बरा होईल.”

  8. यशायाह ३८:२२सुमारे इ.स.पू. ७१८

    हिज्कीयाहने विचारले होते, “मी याहवेहच्या मंदिरात जाईन याचे चिन्ह काय असेल?”

  9. यशायाह ३९:१सुमारे इ.स.पू. ७१२

    त्यावेळी बाबेलचा राजा बलदानचा पुत्र मरोदख-बलादानने हिज्कीयाहला पत्रे आणि भेटवस्तू पाठविल्या, कारण त्याने त्याच्या आजारपणाबद्दल आणि बरे झाल्याबद्दल ऐकले होते.

  10. यशायाह ३९:२सुमारे इ.स.पू. ७१२

    हिज्कीयाहने राजदूतांचे आनंदाने स्वागत केले आणि त्याच्या भांडारांमध्ये काय आहे ते दाखविले—चांदी, सोने, मसाले, उत्तम जैतुनाचे तेल—त्याचे संपूर्ण शस्त्रागार आणि त्याच्या खजिन्यामध्ये असलेली सर्व संपत्ती. त्याच्या राजवाड्यात किंवा त्याच्या संपूर्ण राज्यात हिज्कीयाहने त्यांना दाखविले नाही असे काहीही नव्हते.

  11. यशायाह ३९:३सुमारे इ.स.पू. ७१२

    तेव्हा यशायाह संदेष्टा राजा हिज्कीयाहकडे गेला आणि त्याने विचारले, “ती माणसे काय म्हणाली आणि ती कुठून आली होती?” हिज्कीयाहने उत्तर दिले, “दूरवरील देशातून, ते बाबेलहून माझ्याकडे आले आहेत.”

  12. यशायाह ३९:४सुमारे इ.स.पू. ७१२

    संदेष्ट्याने विचारले, “त्यांनी तुझ्या राजवाड्यात काय पाहिले?” हिज्कीयाह म्हणाला, “त्यांनी माझ्या राजवाड्यातील सर्वकाही पाहिले. माझ्या खजिन्यांमध्ये असे काहीही राहिले नाही, जे मी त्यांना दाखविले नाही.”

  13. यशायाह ३९:५सुमारे इ.स.पू. ७१२

    तेव्हा यशायाह हिज्कीयाहला म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेहचे वचन ऐका:

  14. यशायाह ३९:६सुमारे इ.स.पू. ७१२

    अशी वेळ निश्चितच येईल जेव्हा तुमच्या राजवाड्यामधील सर्वकाही आणि तुमच्या पूर्वजांनी आजपर्यंत जे काही साठवून ठेवले आहे ते सर्व, बाबेलला नेले जाईल. काहीही सोडले जाणार नाही, असे याहवेह म्हणतात.

  15. यशायाह ३९:७सुमारे इ.स.पू. ७१२

    आणि तुमच्या वंशजांपैकी काही, तुमच्या मांसाचे आणि तुमच्या रक्ताचे जे तुमच्यापासून जन्माला येतील, ते नेले जातील आणि ते बाबेलच्या राजाच्या राजवाड्यात खोजे करण्यात येतील.”

  16. यशायाह ३९:८सुमारे इ.स.पू. ७१२

    हिज्कीयाहने यशायाहास उत्तर दिले, “तुम्ही बोललेले याहवेह यांचे वचन चांगले आहे,” कारण त्याने असा विचार केला, “माझ्या आयुष्यभर शांती आणि सुरक्षितता असेल.”

  17. यशायाह ४०:१सुमारे इ.स.पू. ७१२

    सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, तुमचे परमेश्वर असे म्हणतात.

  18. यशायाह ४०:२सुमारे इ.स.पू. ७१२

    यरुशलेम बरोबर कोमलपणे बोला, आणि तिला असे घोषित करा की, तिची कठोर सेवा पूर्ण झाली आहे, तिच्या पापाची परतफेड झाली आहे, याहवेहच्या हातातून तिला तिच्या सर्व पापांसाठी दुप्पट मिळाले आहे.

  19. यशायाह ४०:३सुमारे इ.स.पू. ७१२

    बोलविणार्‍याचा आवाज म्हणतो: “अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली याहवेहसाठी मार्ग तयार करा; आणि आमच्या परमेश्वरासाठी वाळवंटामध्ये महामार्ग सरळ करा,

  20. यशायाह ४०:४सुमारे इ.स.पू. ७१२

    प्रत्येक दरी उंच केली जाईल, प्रत्येक डोंगर आणि टेकडी खाली केली जाईल; खडबडीत जमीन सपाट होईल, खडकाळ जागा सखल भूप्रदेश करण्यात येईल.

  21. यशायाह ४०:५सुमारे इ.स.पू. ७१२

    आणि याहवेहचे गौरव प्रगट होईल, आणि सर्व लोक ते एकत्र पाहतील. कारण याहवेहच्या मुखाने हे बोलले आहे.”

  22. यशायाह ४०:६सुमारे इ.स.पू. ७१२

    एक वाणी म्हणाली, “आरोळी द्या.” आणि मी म्हणालो, “मी काय आरोळी देऊ?” “सर्व लोक गवतासारखे आहेत, आणि त्यांचे विश्वासूपण वनातील फुलांसारखे आहे.

  23. यशायाह ४०:७सुमारे इ.स.पू. ७१२

    गवत सुकते आणि फुले गळून पडतात, कारण याहवेहचा श्वास त्यावर फुंकर घालतो. निश्चितच लोक गवत आहेत.

  24. यशायाह ४०:८सुमारे इ.स.पू. ७१२

    गवत सुकते आणि फुले गळून पडतात, परंतु आपल्या परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.”

  25. यशायाह ४०:९सुमारे इ.स.पू. ७१२

    तुम्ही जे सीयोनसाठी सुवार्ता आणता, उंच डोंगरावर जा. यरुशलेममध्ये सुवार्ता आणणारे तुम्ही, तुमचा आवाज उंचावून आरोळी द्या, आवाज उंच करा, घाबरू नका; यहूदीयाच्या नगरांना सांगा, “तुमचे परमेश्वर येत आहेत!”