- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यशायाह ३७:२८सुमारे इ.स.पू. ७१०
“परंतु मी जाणतो तू कुठे आहेस तू कधी जातो व येतो आणि तू माझ्यावर कसा संतापतोस.
- यशायाह ३७:२९सुमारे इ.स.पू. ७१०
कारण तू माझ्यावर संतापतो व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे, मी तुझ्या नाकात वेसण अडकवेन व तुझ्या तोंडात लगाम घालेन आणि मग तू आलास त्याच वाटेने तुझ्याच देशात तुला परत नेईन.
- यशायाह ३७:३०सुमारे इ.स.पू. ७१०
“हिज्कीयाह, तुझ्यासाठी चिन्ह असेल: “या वर्षी तुम्ही आपोआप उगविलेले धान्य खाल, तरी पुढील वर्षी त्यातूनच उगविलेले खाल. परंतु तिसऱ्या वर्षी पेरणी व कापणी कराल, द्राक्षमळे लावाल व त्याची फळे खाल.
- यशायाह ३७:३१सुमारे इ.स.पू. ७१०
पुन्हा एकदा यहूदीया राज्यातील अवशिष्ट लोक जमिनीत रुजाल आणि फलद्रृप व्हाल.
- यशायाह ३७:३२सुमारे इ.स.पू. ७१०
यरुशलेममधून अवशिष्ट लोक येतील, सीयोन पर्वतातून वाचलेल्याची टोळी येईल. सर्वसमर्थ याहवेहच्या आवेशाने हे सर्व घडून येईल.
- यशायाह ३७:३३सुमारे इ.स.पू. ७१०
“म्हणून अश्शूरच्या राजाविषयी याहवेह असे म्हणतात: “तो या शहरात प्रवेश करणार नाही किंवा एखादा बाणही सोडणार नाही. तो या ठिकाणी ढाल घेऊन येणार नाही किंवा तटबंदीबाहेर मोर्चे बांधणार नाही.
- यशायाह ३७:३४सुमारे इ.स.पू. ७१०
ज्या रस्त्याने तो आला, त्याच रस्त्याने तो परत जाईल; तो या शहरात प्रवेश करणार नाही,” असे याहवेह घोषित करतात.
- यशायाह ३७:३५सुमारे इ.स.पू. ७१०
“माझ्याकरिता आणि माझा सेवक दावीद याच्या स्मरणार्थ, मी या यरुशलेम नगराचे रक्षण करेन!”
- यशायाह ३७:३६सुमारे इ.स.पू. ७१०
त्या रात्री याहवेहच्या दूताने अश्शूर सैनिकांच्या छावणीत एक लक्ष पंचाऐंशी हजार सैनिक ठार केले. दुसर्या दिवशी सकाळी लोक उठून पाहतात—तो त्यांच्या सर्व बाजूला प्रेते पसरलेली होती.
- यशायाह ३७:३७सुमारे इ.स.पू. ७१०
म्हणून अश्शूरचा राजा सन्हेरीबने छावणी उठविली व तो माघारी परतला. तो निनवेहला परत गेला व तिथेच राहिला.
- यशायाह ३७:३८सुमारे इ.स.पू. ७१०
एके दिवशी, तो निस्रोख या त्याच्या दैवताच्या मंदिरात पूजा करीत असताना, त्याचे पुत्र अद्राम्मेलेक व शरेसर यांनी तलवारीने त्याचा वध केला व ते अरारात देशात पळून गेले. नंतर त्याचा वारस, त्याचा पुत्र एसरहद्दोन राजा झाला.
- यशायाह ३८:१सुमारे इ.स.पू. ७१८
त्या दिवसांमध्ये हिज्कीयाह राजा आजारी पडला आणि मरणपंथाला लागला. आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्टा त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: तुझे घर व्यवस्थित ठेव, कारण तू मरणार आहेस; तू बरा होणार नाहीस.”
- यशायाह ३८:२सुमारे इ.स.पू. ७१८
हे ऐकताच हिज्कीयाहने आपले तोंड भिंतीकडे वळविले आणि याहवेहकडे प्रार्थना केली,
- यशायाह ३८:३सुमारे इ.स.पू. ७१८
“हे याहवेह, मी तुमच्यापुढे कसा विश्वासूपणाने आणि पूर्ण मनोभावे समर्पित होऊन चाललो व नेहमी तुमच्या दृष्टीने योग्य तेच केले, याचे स्मरण करा.” आणि हिज्कीयाह अतिदुःखाने रडू लागला.
- यशायाह ३८:४सुमारे इ.स.पू. ७१८
तेव्हा याहवेहचे वचन यशायाहकडे आले:
- यशायाह ३८:५सुमारे इ.स.पू. ७१८
“जा आणि हिज्कीयाहला सांग, ‘तुझे पूर्वज दावीदाचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षांची भर घालेन.
- यशायाह ३८:६सुमारे इ.स.पू. ७१८
आणि मी तुला आणि या शहराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवेन. मी या शहराचे रक्षण करेन.
- यशायाह ३८:७सुमारे इ.स.पू. ७१८
“ ‘याहवेहनी जे वचन दिले आहे, त्याप्रमाणे ते करतील यासाठी याहवेहनी तुम्हाला हे चिन्ह दिले आहे:
- यशायाह ३८:८सुमारे इ.स.पू. ७१८
मी सूर्याच्या सावलीला आहाजच्या पायऱ्यांवरून दहा पावले मागे जाईल असे करेन.’ ” तेव्हा सूर्यप्रकाश जिथून तो गेला होता, त्याच्या दहा पावले मागे गेला.
- यशायाह ३८:९सुमारे इ.स.पू. ७१८
यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने त्याच्या आजारपणा नंतर आणि बरा झाल्यावर केलेले लिखाण:
- यशायाह ३८:१०सुमारे इ.स.पू. ७१८
मी म्हणाला, “माझ्या जीवनाच्या बहराच्या काळात मला मृत्यूच्या दारातून जावे लागेल काय आणि माझी उरलेली वर्षे लुटली जावी काय?”
- यशायाह ३८:११सुमारे इ.स.पू. ७१८
मी म्हणालो, “मी जिवंतांच्या देशात पुन्हा याहवेह यांना स्वतः पाहणार नाही; येथून पुढे मला माझे सहकारी दिसणार नाहीत, किंवा जे आता या जगात आहेत त्यांच्याबरोबर मी राहणार नाही.
- यशायाह ३८:१२सुमारे इ.स.पू. ७१८
मेंढपाळाच्या तंबूप्रमाणे माझे घर पाडले गेले आणि माझ्याकडून काढून घेतले गेले. विणकराप्रमाणे मी माझे जीवन गुंडाळून टाकले आहे, आणि त्यांनी मला विणकऱ्याच्या मागापासून तोडून टाकले आहे; रात्री आणि दिवसा तुम्ही माझा अंत व्हावा असे केले.
- यशायाह ३८:१३सुमारे इ.स.पू. ७१८
मी धीर धरून पहाटेपर्यंत वाट पाहिली, परंतु सिंहासारखे त्यांनी माझी सर्व हाडे मोडली; रात्री आणि दिवसा तुम्ही माझा अंत व्हावा असे केले.
- यशायाह ३८:१४सुमारे इ.स.पू. ७१८
मी निळवी किंवा सारसाप्रमाणे चित्कारलो मी शोक करणाऱ्या कबुतरासारखा कण्हत राहिलो. आकाशाकडे पाहून माझे डोळे दुर्बल झाले. मला धमकाविण्यात आले आहे; हे प्रभू, मला मदत करण्यासाठी या!”