- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यशायाह ४१:२९सुमारे इ.स.पू. ७१२
पाहा, ती सर्व खोटी आहेत! त्यांची कामे व्यर्थ आहेत; त्यांच्या मूर्ती केवळ वायू असून, त्या गोंधळात टाकणाऱ्या आहेत.
- यशायाह ४२:१सुमारे इ.स.पू. ७१२
“पाहा, हा माझा सेवक! याला माझे पाठबळ आहे! माझा निवडलेला, ज्याच्याविषयी मी संतुष्ट आहे; माझा आत्मा मी त्याच्या ठायी ठेवेन. राष्ट्रांना तो न्याय आणेल.
- यशायाह ४२:२सुमारे इ.स.पू. ७१२
तो ओरडणार नाही किंवा आक्रोश करणार नाही. किंवा रस्त्यांमध्ये त्याचा आवाज उंचावणार नाही.
- यशायाह ४२:३सुमारे इ.स.पू. ७१२
चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझविणार नाही. तो विश्वासूपणाने न्यायदान करेल;
- यशायाह ४२:४सुमारे इ.स.पू. ७१२
पृथ्वीवर नीतिमत्वाचे अधिराज्य स्थापेपर्यंत, तो अडखळणार नाही किंवा निराश होणार नाही त्याच्या शिक्षणावर द्वीपही आशा ठेवतील.”
- यशायाह ४२:५सुमारे इ.स.पू. ७१२
परमेश्वर याहवेह हे असे म्हणतात— आकाश निर्माण करून ते विस्तारणारे, पृथ्वीवर सर्वकाही उगविणारे व ते पसरविणारे, ते तिच्यावरील लोकांना श्र्वास प्रदान करतात, आणि जे तिच्यावरून चालतात, त्यांना जीवन प्रदान करतात:
- यशायाह ४२:६सुमारे इ.स.पू. ७१२
“मी, याहवेहने, नीतिमत्वात तुम्हाला पाचारण केले आहे; मी तुमचा हात धरून तुम्हाला पाठिंबा देईन, मी तुमचे संगोपन करेन आणि तुम्हाला कराराच्या पूर्ततेचे लोक बनवेन आणि इतर राष्ट्रांना प्रकाश देणारे,
- यशायाह ४२:७सुमारे इ.स.पू. ७१२
जे डोळे अंध आहेत, ते उघडणारे आणि बंदीशाळेत आहेत, त्यांना सोडविणारे अंधारात बसलेल्यांची सुटका करणारे असे करेन.
- यशायाह ४२:८सुमारे इ.स.पू. ७१२
“मीच याहवेह आहे; हेच माझे नाव आहे! मी माझे गौरव दुसर्या कोणालाही किंवा माझे गौरव मूर्तींना देणार नाही.
- यशायाह ४२:९सुमारे इ.स.पू. ७१२
पाहा, गतकाळातील गोष्टी झालेल्या आहेत, आता मी नवीन गोष्टी घोषित करतो; भावी काळातील घटना प्रत्यक्ष घडण्यापूर्वीच मी ते तुमच्याकडे जाहीर करतो.”
- यशायाह ४२:१०सुमारे इ.स.पू. ७१२
याहवेहसाठी एक नवे गीत गा, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची स्तुतिस्तोत्रे गा, तुम्ही जे सागराच्या खोलात जाऊन राहता आणि त्यात असलेले सर्वकाही, तुम्ही बेटांनो व त्यावर राहणारे सर्वजण गीत गा.
- यशायाह ४२:११सुमारे इ.स.पू. ७१२
अरण्यात व त्याभोवती असणाऱ्या नगरांचे आवाज उंचावू दे; जिथे केदारचा रहिवास आहे, त्या वस्त्या आनंद करोत. सेलाच्या लोकांनो हर्षगीते गा; त्यांना पर्वतशिखरावरून गर्जना करू दे.
- यशायाह ४२:१२सुमारे इ.स.पू. ७१२
त्यांनी याहवेहला गौरव प्रदान करावे आणि त्यांचा महिमा बेटांना घोषित करावा.
- यशायाह ४२:१३सुमारे इ.स.पू. ७१२
याहवेह एखाद्या लढवय्याप्रमाणे आघाडीवर निघतील, एखाद्या योद्ध्याप्रमाणे ते आपला आवेश चेतवतील; ते गर्जना करून युद्धाची नांदी देतील आणि त्यांच्या शत्रूंवर विजयी होतील.
- यशायाह ४२:१४सुमारे इ.स.पू. ७१२
“दीर्घकालापासून मी स्तब्ध राहिलो आहे, मी शांत राहून स्वतःला आवर घातला आहे. परंतु आता, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे, मी आक्रोश करेन, धापा टाकेन व माझी दमछाक होईल.
- यशायाह ४२:१५सुमारे इ.स.पू. ७१२
मी पर्वत व टेकड्या उजाड करेन. त्यांची सर्व हिरवळ वाळवून टाकेन; मी नद्यांना बेटांमध्ये रूपांतरित करेन, आणि जलाशय वाळवून टाकेन.
- यशायाह ४२:१६सुमारे इ.स.पू. ७१२
मी आंधळ्यांना त्यांना माहीत नसलेल्या मार्गावरून चालवेन, अपरिचित रस्त्यावरून मी त्यांचे मार्गदर्शन करेन; मी त्यांच्यापुढील अंधकार प्रकाशात बदलेन आणि खडबडीत जागा सपाट करेन. या गोष्टी मी करेन; मी त्यांना टाकणार नाही.
- यशायाह ४२:१७सुमारे इ.स.पू. ७१२
परंतु जे मूर्तींवर विश्वास ठेवतात, जे मूर्तींना म्हणतात कि, ‘तुम्ही आमची दैवते आहात,’ ते पूर्णपणे लज्जित होऊन मागे फिरतील.
- यशायाह ४२:१८सुमारे इ.स.पू. ७१२
“अहो, तुम्ही बहिऱ्यांनो ऐका; पाहा, तुम्ही आंधळ्यांनो आणि बघा!
- यशायाह ४२:१९सुमारे इ.स.पू. ७१२
आंधळे कोण आहेत, केवळ माझे सेवक, आणि बहिरे कोण आहेत, मी पाठविलेले संदेशवाहक? आंधळे कोण आहेत, ज्यांनी माझ्याशी करार केला आहे, याहवेहच्या सेवकासारखे आंधळे?
- यशायाह ४२:२०सुमारे इ.स.पू. ७१२
तुम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत, परंतु तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही; तुमचे कान उघडे आहेत, परंतु तुम्हाला ऐकावयास येत नाही.”
- यशायाह ४२:२१सुमारे इ.स.पू. ७१२
त्यांच्या नीतिमत्तेप्रीत्यर्थ त्यांचे नियमशास्त्र महान व गौरवित केल्याने याहवेह प्रसन्न होतात.
- यशायाह ४२:२२सुमारे इ.स.पू. ७१२
पण हेच लोक लुटले व लुबाडले गेले आहेत, ते सर्वजण खड्ड्यात अडकले आहेत किंवा तुरुंगात लपवून ठेवण्यात आले आहेत. तेच लूट बनले आहेत, त्यांना सोडविणारा कोणी नाही; त्यांना लूट बनविण्यात आले आहे, “त्यांना परत पाठवा,” असे म्हणणारे कोणीही नाही.
- यशायाह ४२:२३सुमारे इ.स.पू. ७१२
भावी काळात तुमच्यापैकी कोण हे ऐकेल किंवा काळजीपूर्वक लक्ष देईल?
- यशायाह ४२:२४सुमारे इ.स.पू. ७१२
याकोबाची लूट होण्यासाठी त्यांना कोणी हवाली केले, आणि इस्राएलला लुबाडू दिले? ज्यांच्याविरुद्ध आम्ही पातक केले ते याहवेहच नाहीत काय? त्यांनी याहवेहचे मार्ग अनुसरले नाहीत; त्यांच्या नियमांचे पालन केले नाही,