मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह ४३:२५सुमारे इ.स.पू. ७१२

    “मी, खरोखर केवळ माझ्याकरिताच मी तुमचे अपराध पुसेन आणि पुन्हा त्यांची आठवणही करणार नाही.

  2. यशायाह ४३:२६सुमारे इ.स.पू. ७१२

    भूतकाळाचे परीक्षण करा, चला, याबद्दल चर्चा करू या; तुम्ही निष्पाप आहा हे सिद्ध करण्यास आपली बाजू मांडा.

  3. यशायाह ४३:२७सुमारे इ.स.पू. ७१२

    तुमच्या पूर्वपित्याने पातके केली; ज्याला मी पाठविले, कि तुम्हाला माझ्याविरुद्ध बंडखोरी करण्यास शिकवावे.

  4. यशायाह ४३:२८सुमारे इ.स.पू. ७१२

    म्हणूनच मी तुमच्या मंदिराच्या अधिपतींची मानहानी केली; मी याकोबाला विध्वंसाच्या हवाली केले व इस्राएलला तिरस्कारास्पद केले.

  5. यशायाह ४४:१सुमारे इ.स.पू. ७१२

    “परंतु आता माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या इस्राएला, ऐक,

  6. यशायाह ४४:२सुमारे इ.स.पू. ७१२

    याहवेह असे म्हणतात— ज्यांनी तुला निर्माण केले व तुला गर्भाशयात घडविले, आणि जे तुला साहाय्य करतील: याकोबा, माझ्या सेवका, भिऊ नको, हे यशुरून, ज्याला मी निवडले आहे, घाबरू नको.

  7. यशायाह ४४:३सुमारे इ.स.पू. ७१२

    कारण मी तहानलेल्या भूमीवर पाण्याचा वर्षाव करेन, आणि शुष्क जमिनीला झरे देईन; तुमच्या मुलाबाळांवर मी माझा आत्मा ओतेन व तुमच्या वंशजांना आशीर्वाद देईन.

  8. यशायाह ४४:४सुमारे इ.स.पू. ७१२

    कुरणातील गवतासारखे ते उगवतील वाहत्या झऱ्याच्या काठावरील वाळुंजाच्या वृक्षासारखे ते वाढतील.

  9. यशायाह ४४:५सुमारे इ.स.पू. ७१२

    काहीजण म्हणतील ‘मी याहवेहचा आहे’; तर इतरजण स्वतःला याकोबाच्या नावाने संबोधतील; आणखी दुसरे आपल्या हातावर ‘याहवेहचा’ असे लिहून स्वतःचे नाव इस्राएल ठेवतील.

  10. यशायाह ४४:६सुमारे इ.स.पू. ७१२

    “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचा राजा व उद्धारक, याहवेह असे म्हणतात— मी आदि व अंत आहे. माझ्याशिवाय इतर कोणीही परमेश्वर नाही.

  11. यशायाह ४४:७सुमारे इ.स.पू. ७१२

    माझ्यासारखे कोणी आहे काय? त्याने ते घोषित करावे. त्याने तसे जाहीर करावे आणि माझ्यासमोर प्रस्तुत करावे, मी माझ्या पुरातन लोकांची स्थापना केल्यापासून काय घडले, आणि पुढे काय होणार आहे होय, काय घडणार आहे हे त्यांनी सांगावे.

  12. यशायाह ४४:८सुमारे इ.स.पू. ७१२

    भिऊ नका, थरथर कापू नका. मी अशी घोषणा केली नव्हती का व हे फार पूर्वी जाहीर केले नव्हते का? तुम्ही माझे साक्षीदार आहात. माझ्याशिवाय कोणी दुसरा परमेश्वर आहे काय? नाही, माझ्याशिवाय दुसरा खडक नाही; माझ्या माहितीत कोणी नाही.”

  13. यशायाह ४४:९सुमारे इ.स.पू. ७१२

    कोरीव मूर्ती घडविणारे किती शून्यवत आहेत, आणि त्यांना जे मौल्यवान वाटते ते मातीमोल आहे. जे त्यांच्यावतीने बोलतात, ते अंध आहेत; ते अज्ञानी असून ते लज्जित झाले आहेत.

  14. यशायाह ४४:१०सुमारे इ.स.पू. ७१२

    जिच्यापासून काहीही लाभ होत नाही अशा दैवतांना आकार कोण देतो व त्या मूर्ती कोण घडवितो?

  15. यशायाह ४४:११सुमारे इ.स.पू. ७१२

    हे करणारे लोक लज्जित होतील; हे सर्व कारागीर तर केवळ मानव आहेत. या सर्वांनी एकत्र यावे व सिद्ध करावे; त्यांना भयभीत करून लज्जित करण्यात येईल.

  16. यशायाह ४४:१२सुमारे इ.स.पू. ७१२

    लोहार अवजारे घेतो आणि आपल्या भट्टीपाशी उभा राहून तो काम करतो; मूर्तीला आकार देण्यासाठी तो हातोडी वापरतो, त्याच्या बाहूच्या शक्तीने तो त्याला ठोकून घडवितो. मग त्याला भूक लागते व तो शक्तिहीन होतो; तो पाणी पीत नाही आणि दुर्बल होतो.

  17. यशायाह ४४:१३सुमारे इ.स.पू. ७१२

    सुतार लाकडाचा एक ओंडका घेऊन त्याचे मोजपट्टीने माप घेतो आणि त्यावर लेखणीने खुणा करतो; पटाशीने ते तासून गुळगुळीत करतो. कंपासने त्यावर निशाणी करतो. त्याला मानवाच्या शरीराचा आकार देतो, सर्व मानवी गौरवाने अलंकृत करतो, जेणेकरून त्याची मंदिरात स्थापना होऊ शकेल.

  18. यशायाह ४४:१४सुमारे इ.स.पू. ७१२

    तो गंधसरू तोडतो किंवा बहुतेक सुरू वा एला ही झाडे निवडतो, तो त्या झाडाला रानातील इतर झाडांसह वाढवितो, किंवा देवदारू लावतो व पावसाच्या पाण्यावर त्याला वाढू देतो.

  19. यशायाह ४४:१५सुमारे इ.स.पू. ७१२

    मनुष्य त्याचा उपयोग जळणासाठी करतो; काही लाकूड जाळून स्वतःला ऊब मिळण्यासाठी, आणि आग पेटवून भाकर भाजण्यासाठी. परंतु तो त्या लाकडातून स्वतःसाठी एक देवही निर्माण करतो व त्याची आराधना करतो; तो एक मूर्ती तयार करतो व त्यास नमन करतो.

  20. यशायाह ४४:१६सुमारे इ.स.पू. ७१२

    अर्धे लाकूड तो जळण म्हणून वापरतो; त्यावर आपले अन्न शिजवितो, तो त्यावर मांस भाजतो व खाऊन तृप्त होतो. आपल्याला ऊबही आणतो व म्हणतो, “अहा! मी किती उबदार झालो आहे; मला अग्नी दिसत आहे.”

  21. यशायाह ४४:१७सुमारे इ.स.पू. ७१२

    आणि उरलेल्या लाकडापासून तो आपले दैवत म्हणजे मूर्ती तयार करतो; त्या मूर्तीस नमन करून तिची पूजा करतो, तो त्याची प्रार्थना करतो आणि म्हणतो “माझी सुटका कर! तू माझ्या देव आहेस!”

  22. यशायाह ४४:१८सुमारे इ.स.पू. ७१२

    ते अज्ञानी आहेत, त्यांना काहीही कळत नाही; त्यांनी बघू नये म्हणून त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्यांना समज येऊ नये म्हणून त्यांची अंतःकरणे बधिर केली आहेत.

  23. यशायाह ४४:१९सुमारे इ.स.पू. ७१२

    कोणीही थांबून विचार करीत नाही, कोणालाही समज नाही व ते जाणून असे म्हणत नाहीत, “अरे! हा तर लाकडाचा ठोकळा आहे; यातील काही भाग मी सरपण म्हणून वापरला, याच्या कोळशावर मी भाकरही भाजली व मांस शिजवून ते खाल्ले. मग यातील अवशिष्ट भागाची मी तिरस्करणीय वस्तू बनवावी काय? मी लाकडाच्या ठोकळ्याला नमन करावे काय?”

  24. यशायाह ४४:२०सुमारे इ.स.पू. ७१२

    असा मनुष्य राख भक्षण करतो; संभ्रमात पडलेले अंतःकरण त्याला चुकीचे मार्गदर्शन करते; तो स्वतःला वाचवू शकत नाही किंवा म्हणू शकत नाही “ही माझ्या उजव्या हातातील वस्तू निव्वळ खोटेपणा नाही का?”

  25. यशायाह ४४:२१सुमारे इ.स.पू. ७१२

    “हे याकोबा, या गोष्टी आठवणीत ठेव, इस्राएला, तू माझा सेवक आहेस. मीच तुला निर्माण केले, तू माझा सेवक आहेस; इस्राएला, तुला मी विसरणार नाही.