मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह ४४:२२सुमारे इ.स.पू. ७१२

    मी तुझी पापे आकाशातील मेघांप्रमाणे, सकाळच्या धुक्याप्रमाणे विरून टाकली आहेत. माझ्याकडे परत ये, मी खंडणी भरून तुला मुक्त केले आहे.”

  2. यशायाह ४४:२३सुमारे इ.स.पू. ७१२

    अहो आकाशांनो, आनंद गीते गा, कारण याहवेहने हे अद्भुत कृत्य केले आहे; हे खालील पृथ्वी, गर्जना कर, हे पर्वतांनो, अरण्यांनो आणि सर्व वृक्षांनो, गायनाचा कल्लोळ उसळू द्या. कारण याहवेहने याकोबाचा उद्धार केला आहे. इस्राएलमध्ये त्यांनी त्यांचे गौरव प्रकट केले आहे!

  3. यशायाह ४४:२४सुमारे इ.स.पू. ७१२

    “याहवेह असे म्हणतात; तुमचे उद्धारकर्ता, ज्यांनी तुमची गर्भाशयात घडण केली: मी याहवेह आहे, संपूर्ण आकाश मी एकट्याने पसरले, मीच सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता, ज्याने आकाश ताणले, ज्याने स्वतः पृथ्वी पसरविली,

  4. यशायाह ४४:२५सुमारे इ.स.पू. ७१२

    खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे जे व्यर्थ करतात आणि दैवप्रश्न करणाऱ्यांना मूर्ख ठरवितात, जो सुज्ञ माणसांचे ज्ञान उलथून टाकतो आणि ते निरर्थक बनवितो.

  5. यशायाह ४४:२६सुमारे इ.स.पू. ७१२

    जो त्याच्या सेवकाच्या वचनांना पाठिंबा देतो आणि त्याच्या संदेशवाहकांच्या भविष्यवाण्यांची परिपूर्ती करतो, जो यरुशलेमविषयी म्हणतो, ‘मी यरुशलेम पुनः रहिवासित करेन,’ यहूदीयाच्या नगराविषयी म्हणतो, ‘ती पुनः बांघली जाईल,’ आणि तेथील भग्नावशेषाविषयी म्हणतो, ‘मी त्यांची पुनर्बांधणी करेन,’

  6. यशायाह ४४:२७सुमारे इ.स.पू. ७१२

    जो खोल जलाशयाला म्हणतो, ‘आटून जा, आणि मी तुमचे झरे कोरडे करेन,’

  7. यशायाह ४४:२८सुमारे इ.स.पू. ७१२

    कोरेशविषयी जो म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे तेव्हा तो माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल; तो यरुशलेमविषयी म्हणेल, “त्याची पुनर्बांधणी होवो,” आणि मंदिराविषयी म्हणेल, “त्याचा पाया बांधण्यात येवो.” ’

  8. यशायाह ४५:१सुमारे इ.स.पू. ७१२

    “त्यांच्या अभिषिक्ताला दिलेला याहवेहचा संदेश, कोरेशने अनेक देश जिंकावे आणि राजांना शस्त्र विरहित करावे यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे. मी त्याच्यासाठी दारे उघडेन; यापुढे या वेशी बंद होणार नाहीत:

  9. यशायाह ४५:२सुमारे इ.स.पू. ७१२

    हे कोरेशा, मी तुझ्यापुढे चालेन, मी पर्वत जमीनदोस्त करेन आणि कास्याच्या वेशी तोडेन व त्यांच्या लोखंडी सळया कापून टाकेन.

  10. यशायाह ४५:३सुमारे इ.स.पू. ७१२

    दडवून ठेवलेली भांडारे, गुप्तस्थळी जमा करून ठेवलेली संपत्ती, मी तुला देईन, जेणेकरून तुला तुझ्या नावाने हाक मारणारा, याहवेह इस्राएलचा परमेश्वर मीच आहे हे तुला समजेल.

  11. यशायाह ४५:४सुमारे इ.स.पू. ७१२

    माझा सेवक याकोबासाठी, माझ्या निवडलेल्या इस्राएलसाठी, तू जरी माझा अधिकार मान्य करत नाही, तरी मी तुला नावाने हाक मारून बोलाविले आणि तुला मानाच्या उपाधीने अलंकृत केले.

  12. यशायाह ४५:५सुमारे इ.स.पू. ७१२

    मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही; माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही परमेश्वर नाही. तू जरी माझा अधिकार मान्य करत नाही, तरी मी तुला सामर्थ्य देईन.

  13. यशायाह ४५:६सुमारे इ.स.पू. ७१२

    मग सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सर्व लोकांना कळेल की माझ्याशिवाय दुसरा परमेश्वर नाहीच. मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही;

  14. यशायाह ४५:७सुमारे इ.स.पू. ७१२

    मीच प्रकाश व अंधकार निर्माण करतो. मीच कल्याण व अरिष्ट आणतो, या सर्व गोष्टी करणारा याहवेह मीच आहे.

  15. यशायाह ४५:८सुमारे इ.स.पू. ७१२

    “अहो वरील आकाशांनो, माझ्या नीतिमत्तेचा पाऊस पडू द्या; मेघ त्यांचा वर्षाव करोत, पृथ्वी पूर्ण रुंदीने उघडून जावो, तारण उसळून वर येवो त्यासह नीतिमत्वाचीही भरभराट होवो; मी, याहवेहने हे निर्माण केले आहे.

  16. यशायाह ४५:९सुमारे इ.स.पू. ७१२

    “जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो, त्याला धिक्कार असो. जो जमिनीवर पडलेल्या मडक्याच्या अनेक तुकड्यांमधील केवळ एक मडक्याच्या तुकडा आहे. माती कुंभाराला म्हणते काय, ‘हे तू काय घडवित आहेस?’ तुझी हस्तकृती तुला म्हणते काय, ‘कुंभाराला तर हातच नाहीत’?

  17. यशायाह ४५:१०सुमारे इ.स.पू. ७१२

    धिक्कार असो त्या मुलाला, जो त्याच्या पित्याला म्हणतो ‘तुम्ही कोणाला जन्म दिलात?’ किंवा त्याच्या आईला विचारतो, ‘तू कोणाला जन्मास घातले?’

  18. यशायाह ४५:११सुमारे इ.स.पू. ७१२

    “इस्राएलचे पवित्र परमेश्वर आणि तिचे निर्माणकर्ता, याहवेह हे असे म्हणतात: जे पुढे घडणार आहे त्याविषयी, माझ्या लेकरांबद्धल तुम्ही मला प्रश्न विचारता काय, किंवा माझ्या हस्तकृतीसाठी मला आज्ञा देता काय?

  19. यशायाह ४५:१२सुमारे इ.स.पू. ७१२

    ज्याने पृथ्वी अस्तित्वात आणली व तिच्यावर मानवजात निर्माण केली, तो मीच आहे. माझ्या हातांनी मी अंतराळ पसरले त्यांच्या तारकागण माझ्याच आज्ञेत आहेत.

  20. यशायाह ४५:१३सुमारे इ.स.पू. ७१२

    माझा न्याय्य हेतू सिद्धीस नेण्यास मीच कोरेशाला उभारेन: त्याचे सर्व मार्ग मी सरळ करेन. तो माझे शहर पुनर्निर्मित करेल, माझे बंदिवान लोक मोकळे करेल, पण ते तो बक्षीस किंवा मोबदल्यासाठी करणार नाही, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.”

  21. यशायाह ४५:१४सुमारे इ.स.पू. ७१२

    याहवेह असे म्हणतात: “इजिप्तचे उत्पादन आणि कूशचा सर्व व्यापारी माल व शबाईचे ते उंच लोक— ते तुमच्याकडे येतील ते सर्वकाही तुमचेच होईल. बेड्या घातलेल्या बंदिवानाप्रमाणे ते पाय ओढत तुमच्यामागे चालतील ते साखळदंडाने बांधलेले तुमच्याकडे येतील. तुम्हाला नमन करतील व विनंती करून म्हणतील, ‘निश्चितच परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, दुसरे कोणी नाही; त्यांच्याशिवाय दुसरा देव नाही.’ ”

  22. यशायाह ४५:१५सुमारे इ.स.पू. ७१२

    हे परमेश्वरा आणि इस्राएलाच्या तारणकर्त्या, खरोखर तुम्ही परमेश्वर आहात, जे स्वतःला अदृश्य ठेवतात.

  23. यशायाह ४५:१६सुमारे इ.स.पू. ७१२

    जे मूर्ती घडवितात, ते लज्जित व अपमानित होतील; ते सर्वजण एकत्र अपमानित केले जातील.

  24. यशायाह ४५:१७सुमारे इ.स.पू. ७१२

    परंतु अनंतकाळच्या तारणाने याहवेह इस्राएलला सोडवतील; युगानुयुगापर्यंत ते कधीही लज्जित व अपमानित होणार नाहीत.

  25. यशायाह ४५:१८सुमारे इ.स.पू. ७१२

    याहवेह असे म्हणतात— ज्यांनी आकाशे निर्माण केली तेच परमेश्वर आहेत; ज्यांनी पृथ्वीची निर्मिती केली व घडण केली, ती प्रस्थापित केली; ती ओसाड व निर्जन घडविली नाही, परंतु त्यावर वसतिस्थान व्हावे म्हणून निर्माण केली— ते म्हणतात: “मीच याहवेह आहे. माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही.