मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह ४५:१९सुमारे इ.स.पू. ७१२

    मी गुप्तपणे, एखाद्या अंधार्‍या ठिकाणाहून बोललो नाही; मी याकोबाच्या वंशजांना असे म्हटले नाही, ‘माझा व्यर्थच शोध घ्या.’ मी, याहवेह, जे सत्य तेच बोलतो; जे योग्य आहे तेच घोषित करतो.

  2. यशायाह ४५:२०सुमारे इ.स.पू. ७१२

    “हे देशातून पलायन करणाऱ्यांनो, एकत्र या, जमा होऊन एकत्र या; लाकडी मूर्ती घेऊन फिरणारे अज्ञानी लोक, ते अशा दैवतांची प्रार्थना करतात, जे त्यांची सोडवणूक करू शकत नाहीत.

  3. यशायाह ४५:२१सुमारे इ.स.पू. ७१२

    पुढे काय होणार आहे ते विचारार्थ हजर करा— आपसात विचारविनिमय करा. पुरातन कालातच हे सर्व भविष्य कोणी सांगितले, अत्यंत जुन्या काळी हे कोणी घोषित केले? तो मीच, याहवेह नव्हतो काय? कारण मजवेगळा दुसरा परमेश्वरच नाही, न्यायी परमेश्वर व उद्धारकर्ता माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही.

  4. यशायाह ४५:२२सुमारे इ.स.पू. ७१२

    “पृथ्वीच्या सर्व टोकांनो, माझ्याकडे वळा व उद्धार पावा; कारण मीच परमेश्वर आहे, अन्य कोणीही नाही.

  5. यशायाह ४५:२३सुमारे इ.स.पू. ७१२

    मी स्वतः शपथ वाहिली आहे, माझ्या मुखाने संपूर्ण प्रामाणिकपणाने हे शब्द उच्चारले आहेत ते हे शब्द आहेत, जे कधीही रद्द केले जाणार नाहीतः प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल; आणि प्रत्येक जीभ माझ्या नावाने शपथ घेईल.

  6. यशायाह ४५:२४सुमारे इ.स.पू. ७१२

    ते माझ्याबद्दल म्हणतील, ‘केवळ याहवेहमध्येच आमची सुटका व सामर्थ्य आहे.’ ” जेव्हा त्यांच्यावर संतापलेले सर्वजण त्यांच्याकडे येतील, तेव्हा ते लज्जित होतील.

  7. यशायाह ४५:२५सुमारे इ.स.पू. ७१२

    इस्राएलचे सर्व वंशज याहवेहमध्ये सुटका पावतील आणि त्यांच्याबद्दल अभिमान बाळगतील.

  8. यशायाह ४६:१सुमारे इ.स.पू. ७१२

    बेल नतमस्तक होतो, नबो वाकून जातो; ओझे वाहणारे पशू त्यांच्या मूर्ती वाहून नेतात. या प्रतिमांची नेआण तापदायक, व थकेलेल्यांना अधिकच ओझे देणारे आहे.

  9. यशायाह ४६:२सुमारे इ.स.पू. ७१२

    ते एकत्र मिळून लवतात व नतमस्तक होतात; हे ओझे सोडविणे अशक्य झाल्यामुळे, ते स्वतःच बंदिवासात जातात.

  10. यशायाह ४६:३सुमारे इ.स.पू. ७१२

    “याकोबाच्या वंशजांनो, इस्राएलच्या सर्व अवशिष्ट लोकांनो, माझे ऐका, तुम्ही जन्माला आल्यापासून मीच तुमचे संगोपन केले आहे, आणि तुमच्या जन्मापासून मीच तुमची काळजी घेतली आहे.

  11. यशायाह ४६:४सुमारे इ.स.पू. ७१२

    वयस्कर होऊन तुमचे केस पांढरे होईपर्यंत तो मी आहे, तो मी आहे जो तुम्हाला आधार देईल. मी तुम्हाला निर्माण केले आहे व मी तुमचा सांभाळ करेन; मी तुम्हाला आधार देईन व तुम्हाला सोडवेन.

  12. यशायाह ४६:५सुमारे इ.स.पू. ७१२

    “तुम्ही कोणाशी माझी तुलना कराल किंवा माझी बरोबरी कराल? तुम्हाला माझ्यासारखा असा कोण आढळेल, ज्याच्याशी तुम्ही माझी तुलना कराल?

  13. यशायाह ४६:६सुमारे इ.स.पू. ७१२

    काहीजण त्यांच्या पिशवीतून सोने काढून ते ओततात व चांदी तराजूत तोलतात; ते एखाद्या सोनाराला दैवत घडविण्यासाठी मजुरीने कामाला लावतात, आणि मग ते त्याच्यापुढे नमन करून त्याची पूजा करतात.

  14. यशायाह ४६:७सुमारे इ.स.पू. ७१२

    ते त्याला आपल्या खांद्यावर घेतात व वाहून नेतात; नंतर ते त्याला त्याच्या स्थानी ठेवतात, तेव्हा ते दैवत तिथेच राहते. त्या ठिकाणाहून त्याला हालता येत नाही. कोणी त्याचा धावा केला, तरी ते उत्तर देऊ शकत नाही; ते कोणालाही त्यांच्या संकटातून सोडवू शकत नाही.

  15. यशायाह ४६:८सुमारे इ.स.पू. ७१२

    “बंडखोरांनो, हे लक्षात ठेवा, विसरू नका, हे जरा मनावर घ्या.

  16. यशायाह ४६:९सुमारे इ.स.पू. ७१२

    भूतकाळात घडलेल्या गोष्टींची आठवण करा, फार पुरातन काळातील गोष्टी; मी परमेश्वर आहे, माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही नाही; मी परमेश्वर आहे आणि माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही.

  17. यशायाह ४६:१०सुमारे इ.स.पू. ७१२

    मी सुरुवातीपासूनच शेवट कळवितो व पुरातन काळातच भावी काळात होणाऱ्या गोष्टी प्रगट करतो. मी म्हणतो, ‘माझ्या योजना कायम राहतील, आणि माझ्या इच्छेस येईल ते मी करेन.’

  18. यशायाह ४६:११सुमारे इ.स.पू. ७१२

    मी पूर्वेकडून त्या वेगवान हिंस्र पक्ष्याला, त्या अति दूर असलेल्या मनुष्याला माझा हेतू साध्य करण्यासाठी बोलवेन. जे मी बोललो, ते मी घडवून आणणार; जे मी योजले आहे, ते मी करेनच!

  19. यशायाह ४६:१२सुमारे इ.स.पू. ७१२

    अहो हट्टी अंतःकरणाच्या लोकांनो, तुम्ही, जे आता माझ्या नीतिमत्वापासून फार दूर गेलेले आहात, माझे ऐका.

  20. यशायाह ४६:१३सुमारे इ.स.पू. ७१२

    मी माझे नीतिमत्व तुमच्याजवळ आणत आहे, ते फार दूर नाही; आणि माझ्या तारणास विलंब लागणार नाही. मी माझे तारण सीयोनाला माझे वैभव इस्राएलला बहाल करेन.

  21. यशायाह ४७:१सुमारे इ.स.पू. ७१२

    “हे कुमारी खाल्डियन कन्ये, सिंहासनावरून खाली उतर व धुळीत बस; हे बाबेल्यांच्या नगराची महाराणी, सिंहासन सोडून जमिनीवर बस. तू यापुढे कोमल व नाजूक म्हणविली जाणार नाहीस.

  22. यशायाह ४७:२सुमारे इ.स.पू. ७१२

    जाते घेऊन धान्य दळीत बस; तुझा बुरखा काढून टाक. तुझ्या घागर्‍याचा घोळ उचल आणि पाय उघडे करून ओढ्यातून पायपीट करत जा.

  23. यशायाह ४७:३सुमारे इ.स.पू. ७१२

    तुझ्या नग्नतेचे प्रदर्शन होईल, आणि तुझी लज्जा अनावृत होईल. मी सूड उगवेन; मी कोणा मनुष्याला सोडणार नाही.”

  24. यशायाह ४७:४सुमारे इ.स.पू. ७१२

    आमचे उद्धारकर्ता—सर्वसमर्थ याहवेह हे ज्यांचे नाव आहे— तेच इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत.

  25. यशायाह ४७:५सुमारे इ.स.पू. ७१२

    “स्तब्ध बस, अंधारात जा, खास्द्यांच्या नगराची राणी. तू यापुढे राज्याची महाराणी म्हणविली जाणार नाहीस.