circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यशायाह ४८:१६सुमारे इ.स.पू. ७१२
“माझ्याजवळ या व हे लक्षपूर्वक ऐका: “माझ्या पहिल्या घोषणेपासूनच मी गुप्तपणे बोललो नाही; ज्यावेळी ते घडेल, मी तिथे हजर आहे.” आणि आता सार्वभौम याहवेहने, त्यांच्या पवित्र आत्म्याची देणगी देऊन मला पाठविले आहे.
- यशायाह ४८:१७सुमारे इ.स.पू. ७१२
याहवेह हे असे म्हणतात— जे तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत: “मी याहवेह, तुमचा परमेश्वर आहे, जो तुमच्या हितासाठीच तुम्हाला शिक्षण देतो, जे मार्ग तुम्ही अनुसरावे, त्यांनीच तुम्हाला मार्गस्थ करतो.
- यशायाह ४८:१८सुमारे इ.स.पू. ७१२
केवळ तुम्ही माझ्या आज्ञांकडे लक्ष दिले असते, तर शांती एखाद्या नदीप्रमाणे, तुमचे सुयश समुद्रातील लाटांप्रमाणे वाहिले असते,
- यशायाह ४८:१९सुमारे इ.स.पू. ७१२
तुमचे वंशज वाळूसारखे झाले असते. तुमची संतती धान्यकणासारखी अगणित असती; त्यांचे नाव कधीही मिटले नसते ना ते माझ्यासमोर कधी नष्ट झाले असते.”
- यशायाह ४८:२०सुमारे इ.स.पू. ७१२
बाबेलमधून निघा, खास्द्यांपासून पलायन करा! हे हर्षगर्जना करून जाहीर करा व घोषित करा, “याहवेहने आपला सेवक याकोबाचा उद्धार केला आहे.” अशी घोषणा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहचू द्या.
- यशायाह ४८:२१सुमारे इ.स.पू. ७१२
त्यांनी त्यांना वाळवंटातून नेले, तेव्हा ते तहानले नाहीत; त्यांनी त्यांच्याकरिता खडकातून पाणी वाहत बाहेर आणले. त्यांनी खडक दुभांगला आणि पाणी उफाळून बाहेर आले.
- यशायाह ४८:२२सुमारे इ.स.पू. ७१२
“दुष्टांना शांती नसते,” असे याहवेह म्हणतात.
- यशायाह ४९:१सुमारे इ.स.पू. ७१२
हे द्वीपांनो, माझे ऐका; हे दूरवरील देशांनो, माझ्या बोलण्याकडे कान द्या: माझा जन्म होण्यापूर्वीच याहवेहने मला बोलाविले; गर्भाशयात असतानाच त्यांनी माझे नाव उच्चारले.
- यशायाह ४९:२सुमारे इ.स.पू. ७१२
त्यांनी माझे मुख तलवारीसारखे धारदार केले आहेत, त्यांनी मला आपल्या हाताच्या छायेत लपवून ठेवले आहे; त्यांनी मला बाणाप्रमाणे तीक्ष्ण केले आहे त्यांनी मला त्यांच्या भात्यात झाकून ठेवले आहे.
- यशायाह ४९:३सुमारे इ.स.पू. ७१२
ते मला म्हणाले, “तू माझा सेवक आहेस; इस्राएला, तुझ्यामध्ये मी माझे गौरव प्रकट करेन.”
- यशायाह ४९:४सुमारे इ.स.पू. ७१२
मी उत्तर दिले, “मी व्यर्थच सर्व कष्ट केले. मी माझे सामर्थ्य निरुपयोगीच खर्ची घातले, तरीपण माझे प्रतिफळ म्हणजे याहवेहचा वरदहस्त आणि माझे बक्षीस माझ्या परमेश्वराकडे आहे.”
- यशायाह ४९:५सुमारे इ.स.पू. ७१२
आणि आता याहवेह म्हणतात— याकोबाला त्यांच्याकडे परत आणावे व इस्राएलला स्वतःसाठी एकत्र करावे, यासाठी त्यांचा सेवक व्हावा म्हणून ज्याची गर्भाशयातच घडण केली, आणि हे काम देऊन माझा बहुमान केला व माझे परमेश्वर माझे सामर्थ्य आहेत—
- यशायाह ४९:६सुमारे इ.स.पू. ७१२
ते म्हणतात, “याकोबाच्या कुळांना पुनर्स्थापित करणे आणि माझ्या अवशिष्ट इस्राएलच्या लोकांना परत आणणे, हे करण्यासाठी माझा सेवक होणे, हे काम फारच लहानसे आहे, तर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत माझे तारण पोचवावे यासाठी मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश व्हावा असेही करेन.”
- यशायाह ४९:७सुमारे इ.स.पू. ७१२
ज्याला राष्ट्रांनी तुच्छ व घृणास्पद मानलेले आहे, जो शासनकर्त्यांचा सेवक आहे, त्याला: उद्धारकर्ता आणि इस्राएलचे पवित्र परमेश्वर, याहवेह असे म्हणतात— “जेव्हा राजे तुला बघतील तेव्हा ते उठून उभे राहतील, अधिपती तुला लवून मुजरा करतील, कारण याहवेहने, जे विश्वसनीय आहेत, जे इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत, त्यांनी तुला निवडले आहे.”
- यशायाह ४९:८सुमारे इ.स.पू. ७१२
याहवेह असे म्हणतात: “माझ्या कृपेच्या समयी मी तुम्हाला उत्तर देईन, आणि तारणाच्या दिवशी, मी तुम्हाला साहाय्य करेन; मी तुमचे संगोपन करेन आणि तुम्हाला सर्व लोकांसाठी एक करार असे करेन, जेणेकरून, तुमची भूमी पुनर्स्थापित होईल, आणि ओसाड वतने पुन्हा तुमच्या स्वाधीन होतील,
- यशायाह ४९:९सुमारे इ.स.पू. ७१२
बंदिवानांना ‘बाहेर निघा,’ असे म्हणावे आणि जे अंधारात आहेत, त्यांना म्हणावे, ‘स्वतंत्र व्हा!’ “ते रस्त्याच्या काठावर चरतील आणि प्रत्येक नापीक टेकड्यांवर त्यांना गवत सापडेल.
- यशायाह ४९:१०सुमारे इ.स.पू. ७१२
ते तहानलेले किंवा भुकेले होणार नाहीत. वाळवंटातील किंवा सूर्याची उष्णता त्यांना इजा करणार नाही. ज्यांनी त्यांच्यावर करुणा केली आहे, ते त्याचे मार्गदर्शन करतील आणि त्यांना पाण्याच्या झर्यांजवळून चालवितील.
- यशायाह ४९:११सुमारे इ.स.पू. ७१२
मी माझ्या सर्व पर्वतांच्या सरळ वाटा करेन, आणि माझे महामार्ग उंचावले जातील.
- यशायाह ४९:१२सुमारे इ.स.पू. ७१२
पाहा, ते दूरच्या ठिकाणांहून येतील— काही उत्तरेकडून, काही पश्चिमेकडून, तर काही सीनीम प्रांतातून येतील.”
- यशायाह ४९:१३सुमारे इ.स.पू. ७१२
हे आकाशांनो, हर्षगर्जना करा; अगे पृथ्वी, आनंदित हो; अहो पर्वतांनो, गीते वर उचंबळून येऊ द्या! कारण याहवेहने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे व त्यांच्या पीडितांवर करुणा ते करतील.
- यशायाह ४९:१४सुमारे इ.स.पू. ७१२
परंतु सीयोन म्हणते, “आमच्या याहवेहने आम्हाला टाकले आहे; प्रभू आम्हाला विसरले आहेत.”
- यशायाह ४९:१५सुमारे इ.स.पू. ७१२
“आईला आपल्या दुधपित्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल का आपल्या जन्मदात्या मुलावरील तिची माया कधी आटेल का? ती कदाचित विसरेल, पण मी तुम्हाला विसरणार नाही.
- यशायाह ४९:१६सुमारे इ.स.पू. ७१२
पाहा, तुम्हाला मी माझ्या तळहातावर कोरले आहे व तुझे तट सदोदित माझ्यासमोर आहेत.
- यशायाह ४९:१७सुमारे इ.स.पू. ७१२
तुमची संतती घाईघाईने परत येईल, आणि तुम्हाला उजाड करणारे तुम्हाला सोडून निघून जातील.
- यशायाह ४९:१८सुमारे इ.स.पू. ७१२
तुमची नजर वर उचला आणि सभोवती पाहा; तुमची सर्व संतती एकत्र येऊन तुमच्याकडे परत येतील. मी जिवंत आहे,” याहवेह घोषणा करतात, “तुम्ही त्यांना आभूषणाप्रमाणे अंगावर धारण कराल, वधूप्रमाणे तुम्ही त्यांना परिधान कराल.