मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह ५१:७सुमारे इ.स.पू. ७१२

    “हे, नीतिमत्ता जाणणार्‍या लोकांनो, माझ्या नियमांवर अंतःकरणापासून भाव ठेवणार्‍यांनो माझे ऐका: मर्त्य मानवाच्या उपहासाने भयभीत होऊ नका किंवा त्यांनी केलेल्या निंदेला घाबरू नका.

  2. यशायाह ५१:८सुमारे इ.स.पू. ७१२

    कारण कसर त्यांचाही वस्त्रांसारखा नाश करेल; कीड लोकरीसारखे त्यांनाही खाऊन टाकेल. परंतु माझी नीतिमत्ता सदासर्वकाळ टिकेल. व माझे तारण पिढ्यान् पिढ्या टिकून राहील.”

  3. यशायाह ५१:९सुमारे इ.स.पू. ७१२

    उठा, उठा, हे याहवेहच्या भुजा, सामर्थ्याचे वस्त्र परिधान करा. उठा, पूर्वी जसे जागे झाले होते, पुरातन पिढीत जसे उठले होते. नाईल नदीतील राहाब सर्पाचे तुकडे केले, ते तुम्हीच नाही का, त्या समुद्रातील राक्षसाचा छेद केला, ते तुम्हीच नाही का?

  4. यशायाह ५१:१०सुमारे इ.स.पू. ७१२

    ते तुम्हीच नाही का, ज्यांनी समुद्र आटवून कोरडा केला, त्या अति खोल पाण्याला आटविले, ज्यांनी समुद्राच्या खोलीत मार्ग तयार केला जेणेकरून तुमचे सोडविलेले लोक ते पार करतील?

  5. यशायाह ५१:११सुमारे इ.स.पू. ७१२

    ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील. ते हर्षगीते गात सीयोनात प्रवेश करतील; अनंतकाळचा उल्हास त्यांच्या मस्तकावर असेल. हर्ष व उल्हासाने ते भरून जातील, दुःख व शोक दूर पळून जातील.

  6. यशायाह ५१:१२सुमारे इ.स.पू. ७१२

    “मी, तो मीच आहे, जो तुमचे सांत्वन करेल. तुम्ही कोण आहात जे मर्त्य मानवांना भिता, मानवप्राणी, जे केवळ गवताप्रमाणे असतात,

  7. यशायाह ५१:१३सुमारे इ.स.पू. ७१२

    तुम्ही जे तुमच्या निर्माणकर्त्याला, याहवेहला विसरता, ज्यांनी आकाश ताणून पसरले आणि ज्यांनी पृथ्वीचा पाया घातला, तुम्ही सतत दहशतीखाली का जगता दिवसभर विरोधकांच्या क्रोधाच्या भीतीत का राहता? कारण त्यांनी तुमचा नाश करण्याचा निर्धार केला आहे? विरोधकांचा क्रोध कुठे आहे?

  8. यशायाह ५१:१४सुमारे इ.स.पू. ७१२

    भीतीने थिजलेल्या बंदिवानांची लवकरच सुटका होईल; ते त्यांच्या अंधारकोठडीत मरणार नाहीत, त्यांना भाकरीची उणीव भासणार नाही.

  9. यशायाह ५१:१५सुमारे इ.स.पू. ७१२

    कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे, जो लाटांनी गर्जना करावी म्हणून समुद्र ढवळतो— सर्वसमर्थ याहवेह हे त्याचे नाव आहे.

  10. यशायाह ५१:१६सुमारे इ.स.पू. ७१२

    मी माझी वचने तुमच्या मुखात घातली आहेत आणि तुम्हाला माझ्या हाताच्या सावलीत झाकून ठेवले आहे— मीच आहे, ज्याने आकाशाला स्थिर असे ठेवले, आणि सर्व पृथ्वीसाठी पाया घातला, आणि जो सीयोनला म्हणतो, ‘तुम्ही माझे आहात.’ ”

  11. यशायाह ५१:१७सुमारे इ.स.पू. ७१२

    ऊठ, ऊठ! अगे यरुशलेमे, जागी हो, तू, जिने क्रोधाचा प्याला याहवेहच्या हातून भरपूर प्याला आहे, दहशतीचा प्याला तू गाळासकट पिऊन टाकला आहेस, तो प्याला, जो लोकांना मद्यधुंद करून अडखळवितो.

  12. यशायाह ५१:१८सुमारे इ.स.पू. ७१२

    तिने जन्माला घातलेल्या लेकरांपैकी तिचे मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही नव्हते; तिने संगोपन केलेल्या लेकरांपैकी तिचा हात धरून चालविण्यासाठी कोणीही नव्हते.

  13. यशायाह ५१:१९सुमारे इ.स.पू. ७१२

    ओसाडी आणि विध्वंस, दुष्काळ आणि तलवार ही दुप्पट अरिष्टे तुझ्यावर आली आहेत— कोण तुझे सांत्वन करू शकेल? कोण तुझे दुःखपरिहार करू शकेल?

  14. यशायाह ५१:२०सुमारे इ.स.पू. ७१२

    कारण तुझी लेकरे ग्लानी येऊन, प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात पडली आहेत, हरिणाप्रमाणे ते जाळ्यात अडकलेले आहेत. याहवेहच्या क्रोधाने आणि तुमच्या परमेश्वराच्या धमकीने भरले आहेत.

  15. यशायाह ५१:२१सुमारे इ.स.पू. ७१२

    म्हणून गांजलेल्यांनो, हे ऐका! तुम्ही धुंद झालेले आहात, मद्याने नव्हे.

  16. यशायाह ५१:२२सुमारे इ.स.पू. ७१२

    तुमचे सार्वभौम याहवेह, तुमचे परमेश्वर, जे त्यांच्या लोकांना सुरक्षित ठेवतात, ते असे म्हणतात: “पाहा, जो प्याला तुम्हाला धुंद करून अडखळवितो तो मी तुमच्या हातातून काढून घेतला आहे; त्या प्याल्यातून, माझ्या क्रोधाच्या प्याल्यातून तुम्ही यापुढे कधीही पिणार नाही.

  17. यशायाह ५१:२३सुमारे इ.स.पू. ७१२

    तुमचा छळ करणाऱ्यांच्या हातात मी तो देईन, जे तुम्हाला म्हणाले, ‘भूमीवर पडा, म्हणजे आम्ही तुमच्यावरून चालत जाऊ.’ आणि तुम्ही तुमची पाठ जमिनीसारखी केली, जणू रस्ताच, ज्यावरून चालत जावे.”

  18. यशायाह ५२:१सुमारे इ.स.पू. ७१२

    ऊठ, ऊठ, हे सीयोना, सामर्थ्याचे वस्त्र परिधान कर! यरुशलेम, हे पवित्र नगरी, आपली वैभवशाली वस्त्रे परिधान कर. बेसुंती आणि भ्रष्ट यापुढे तुझ्या वेशीतून प्रवेश करणार नाहीत.

  19. यशायाह ५२:२सुमारे इ.स.पू. ७१२

    हे यरुशलेमे, तुझ्यावरील धूळ झटकून टाक, ऊठ व सिंहासनारुढ हो. बंदिवान सीयोनकन्ये, दास्यतेची बंधने आपल्या गळ्यांतून काढून मुक्त हो.

  20. यशायाह ५२:३सुमारे इ.स.पू. ७१२

    कारण याहवेह म्हणतात: “तुम्हाला विनामूल्य बंदिवासात विकले, आणि आता पैशावाचून तुम्हाला सोडविण्यात येईल.”

  21. यशायाह ५२:४सुमारे इ.स.पू. ७१२

    कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “प्रथम माझे लोक इजिप्त देशात राहवयास गेले; नंतर अश्शूरच्या लोकांनी त्यांचा छळ केला.”

  22. यशायाह ५२:५सुमारे इ.स.पू. ७१२

    याहवेह घोषणा करतात, “आणि आता माझ्याकडे काय राहिले आहे? माझ्या लोकांना विनामूल्य नेण्यात आले आहे, आणि जे त्यांच्यावर सत्ता गाजवितात ते त्यांचा उपहास करतात,” याहवेह घोषणा करतात, “संपूर्ण दिवसभर माझ्या नावाची सतत निंदा करण्यात येते.

  23. यशायाह ५२:६सुमारे इ.स.पू. ७१२

    माझे लोक माझे नाव जाणतील; म्हणून त्या दिवशी त्यांना समजेल कि ते भविष्यकथन करणारा तो मीच आहे. होय, तो मीच आहे.”

  24. यशायाह ५२:७सुमारे इ.स.पू. ७१२

    पर्वतावरून शुभवार्ता आणणार्‍याचे पाय किती मनोरम आहेत, जे आनंददायी वार्ता आणतात, जे शांतीची घोषणा करतात, जे शुभ संदेश आणतात, जे तारणाची घोषणा करतात, जे सीयोनास म्हणतात, “तुमचे परमेश्वर राज्य करतात!”

  25. यशायाह ५२:८सुमारे इ.स.पू. ७१२

    ऐका! तुमचे पहारेकरी त्यांचा आवाज उंचावतात; एकत्र मिळून ते आनंदाचा जयघोष करतात. जेव्हा याहवेह सीयोनास परत येतील, ते प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्याने पाहतील.