मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह ४९:१९सुमारे इ.स.पू. ७१२

    “जरी तुम्ही उद्ध्वस्त झाले व ओसाड करण्यात आले होते आणि जी तुमची भूमी उजाड झाली, ती तुमच्या लोकांना फारच कमी पडेल, आणि तुम्हाला गिळंकृत करणारे खूप दूर गेलेले असतील.

  2. यशायाह ४९:२०सुमारे इ.स.पू. ७१२

    विलापाच्या काळात जन्मलेल्या संततीला असे म्हणताना तुम्ही ऐकाल, ‘आम्हाला ही जागा फारच कमी पडते; आम्हाला राहण्यास आणखी जास्त जागा पाहिजे.’

  3. यशायाह ४९:२१सुमारे इ.स.पू. ७१२

    तेव्हा तू मनात म्हणशील, ‘यांना माझ्यासाठी कोणी जन्माला घातले? मी दुःखी व निर्वंश होते; मी बंदिवासात व नाकारलेली होते. माझ्यासाठी यांना कोणी वाढविले? मला एकटेच टाकण्यात आले होते, मग हे सर्व—कुठून आले?’ ”

  4. यशायाह ४९:२२सुमारे इ.स.पू. ७१२

    सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “पाहा, मी राष्ट्रांना इशारा करेन, मी माझा झेंडा लोकांपुढे उंचावेन; ते तुझ्या पुत्रांना खांद्यांवर उचलून आणतील व तुझ्या कन्यांना कडेवर घेऊन आणतील.

  5. यशायाह ४९:२३सुमारे इ.स.पू. ७१२

    राजे तुला उपपित्यासमान होतील, व त्यांच्या राण्या तुला उपमातेसमान होतील. ती तुझ्यासमोर भुईपर्यंत लवून मुजरा करतील; आणि तुझी पायधूळ चाटतील. तेव्हा मीच याहवेह आहे, हे तुला समजेल. माझ्यावर आशा ठेवणारा, कधीच निराश होणार नाही.”

  6. यशायाह ४९:२४सुमारे इ.स.पू. ७१२

    योद्ध्याच्या हातून लूट घेता येईल काय? किंवा अत्याचारीकडून नीतिमान बंदिवानांना सोडविता येईल काय?

  7. यशायाह ४९:२५सुमारे इ.स.पू. ७१२

    परंतु याहवेह हे असे म्हणतात: “होय, योद्ध्याच्या हातून बंदिवान सोडविले जातील, व अत्याचारीकडून लूट हिसकावून घेतली जाईल; तुमच्याशी झगडणाऱ्यांशी मी झगडेन, आणि मी तुमच्या मुलांना वाचवेन.

  8. यशायाह ४९:२६सुमारे इ.स.पू. ७१२

    तुम्हाला पिडणाऱ्यांना मी त्यांचेच मांस खाऊ घालेन; आणि त्यांच्याच रक्ताच्या नद्यांचे रक्त पिऊन ते मद्य पिल्यासारखे धुंद होतील. मग हे सर्व मानवजातीला समजेल कि मी, याहवेह, तुझा त्राता, तुझा उद्धारकर्ता व याकोबाचा सर्वसमर्थ परमेश्वर आहे.”

  9. यशायाह ५०:१सुमारे इ.स.पू. ७१२

    याहवेह असे म्हणतात: “मी तुमच्या आईला घटस्फोट दिला, जो दाखला देऊन मी तिला पाठविले, तो कुठे आहे? मी तुम्हाला माझ्या कोणत्या कर्जदारांना विकून टाकले? तुमच्या पापांमुळेच तुम्ही विकले गेले आहात; आणि तुमच्या अपराधांमुळे तुमच्या आईला पाठविण्यात आले.

  10. यशायाह ५०:२सुमारे इ.स.पू. ७१२

    मी जेव्हा आलो, तेव्हा तिथे कोणीही का नव्हते? मी जेव्हा हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर का दिले नाही? तुम्हाला सोडविण्यासाठी माझा हात फारच आखूड होता काय? तुमचे तारण करण्यास माझ्याकडे सामर्थ्य नाही काय? मी केवळ धमकाविले तरी समुद्र आटून जाईल! नद्यांचे मी वाळवंटात रूपांतर करतो; त्यातील मासे पाण्याच्या अभावी सडतात आणि तहानेने मरतात.

  11. यशायाह ५०:३सुमारे इ.स.पू. ७१२

    मी आकाशास अंधकार परिधान करवितो आणि गोणपाट त्याचे आच्छादन करतो.”

  12. यशायाह ५०:४सुमारे इ.स.पू. ७१२

    सार्वभौम याहवेहने माझ्या मुखात उपदेशात्मक जीभ दिली आहे, त्यावर थकलेल्या लोकांना पडू न देणारी वचने आहेत, ते मला रोज सकाळी जागे करतात, शिक्षण प्राप्त करणाऱ्यासाठी उघडावे, तसे ते माझे कान उघडतात.

  13. यशायाह ५०:५सुमारे इ.स.पू. ७१२

    सार्वभौम याहवेहनी माझे कान उघडले आहेत; मी बंडखोर नव्हतो, मी मागे फिरलो नाही.

  14. यशायाह ५०:६सुमारे इ.स.पू. ७१२

    जे मला चाबकाचे फटकारे मारतात, त्यांना मी आपली पाठ देऊ केली, जे माझी दाढी उपटतात, त्यांना मी आपले गाल देऊ केले; उपहास करणारे व थुंकणाऱ्यांपासून मी तोंड लपवित नाही.

  15. यशायाह ५०:७सुमारे इ.स.पू. ७१२

    मी लज्जित होणार नाही, कारण सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात. म्हणूनच मी माझा चेहरा गारगोटीसारखा कठीण केला आहे आणि मी लज्जित होणार नाही, हे मला माहीत आहे.

  16. यशायाह ५०:८सुमारे इ.स.पू. ७१२

    मला न्याय देणारे माझ्या निकट आहेत. मग माझ्याविरुद्ध कोण आरोप करेल? चला आपण एकमेकांचा सामना करू या! माझ्यावर आरोप करणारा कोण आहे? त्याने माझा सामना करावा!

  17. यशायाह ५०:९सुमारे इ.स.पू. ७१२

    सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात. मला कोण दोषी ठरविणार? माझ्यावर आरोप करणारे सर्व जुन्या कपड्याप्रमाणे विरून जातील; कसर त्यांना खाऊन टाकेल.

  18. यशायाह ५०:१०सुमारे इ.स.पू. ७१२

    तुमच्यामध्ये कोण आहे जो याहवेहचे भय बाळगतो आणि त्यांच्या सेवकाच्या आज्ञा पाळतो? जो अंधारात चालतो, ज्याच्याकडे प्रकाश नाही, त्याने याहवेहच्या नावावर विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्या परमेश्वरावर विसंबून राहावे.

  19. यशायाह ५०:११सुमारे इ.स.पू. ७१२

    परंतु आता, तुम्ही जे अग्नी प्रज्वलित करता आणि स्वतःला जळत्या मशालीचा पुरवठा करता, जा, तुम्ही स्वतः प्रज्वलित केलेल्या, आणि तुम्ही ज्वलंत केलेल्या मशालीच्या प्रकाशात चला, माझ्यापासून मात्र तुम्हाला हे प्राप्त होईल: तुम्ही यातनामध्ये पडून राहाल.

  20. यशायाह ५१:१सुमारे इ.स.पू. ७१२

    “तुम्ही, ज्यांनी नीतिमत्तेचा ध्यास घेतला आहे व जे याहवेहचा शोध घेता, ते सर्वजण, माझे ऐका: ज्या खडकातून तुम्हाला कापून काढले, आणि ज्या खाणीतून तुम्हाला खोदून काढले, त्याकडे बघा;

  21. यशायाह ५१:२सुमारे इ.स.पू. ७१२

    होय, तुमचा पिता अब्राहामाकडे, आणि साराहकडे, जिने तुम्हाला जन्म दिला, त्यांच्याकडे बघा. मी अब्राहामाला बोलाविले, तेव्हा तो एकटा होता, मी त्याला आशीर्वाद दिला, तेव्हा तो बहुगुणित झाला.

  22. यशायाह ५१:३सुमारे इ.स.पू. ७१२

    तर याहवेह सीयोनचे निश्चितच सांत्वन करतील आणि तिच्या सर्व ओसाड प्रदेशाकडे दयेने बघतील; ते तिचे वाळवंट एदेन बागेसारखे सुंदर करतील, तिची उजाड ठिकाणे याहवेहच्या बागेसारखी होतील. तिथे आनंद व उल्लास व्यक्त करण्यात येईल. उपकारस्मरण व गीतांचे स्वर तिथे ऐकू येतील.

  23. यशायाह ५१:४सुमारे इ.स.पू. ७१२

    “माझ्या लोकांनो, माझे ऐका; माझ्या देशा, माझ्याकडे लक्ष दे: माझाकडूनच तुम्हाला उपदेश प्राप्त होईल. माझा न्याय राष्ट्रांसाठी प्रकाश बनेल.

  24. यशायाह ५१:५सुमारे इ.स.पू. ७१२

    माझी नीतिमत्ता वेगाने जवळ येत आहे, माझे तारण येण्याच्या मार्गावर आहे. माझी भुजा राष्ट्रांना न्याय प्रदान करेल. द्वीप माझा शोध घेतील आणि माझ्या भुजेची आशेने वाट पाहतील.

  25. यशायाह ५१:६सुमारे इ.स.पू. ७१२

    तुमची दृष्टी वर आकाशाकडे करा, आणि खाली पृथ्वीकडे पाहा; आकाश धुरासारखे विरून नाहीसे होईल, पृथ्वी वस्‍त्रांप्रमाणे जीर्ण होईल आणि पृथ्वीवरील लोक चिलटांप्रमाणे मरतील. परंतु माझे तारण सदासर्वकाळ टिकेल. माझ्या नीतिमत्तेचा कधीही अंत होणार नाही.