मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह ४७:६सुमारे इ.स.पू. ७१२

    मी माझ्या लोकांवर संतापलो होतो आणि माझ्या वारसांना भ्रष्ट केले; त्यांना तुझ्या हाती दिले, पण तू त्यांना थोडीसुध्दा दया दाखविली नाहीस. वयस्कर लोकांवरही तू अवघड ओझे लादलेस.

  2. यशायाह ४७:७सुमारे इ.स.पू. ७१२

    तू म्हटले, ‘मी सदैव अस्तित्वात आहे— सर्वकाळाची राणी आहे!’ परंतु तू या गोष्टींचा विचार केला नाहीस किंवा परिणामी काय होऊ शकेल याकडे लक्ष दिले नाही.

  3. यशायाह ४७:८सुमारे इ.स.पू. ७१२

    “अगे चैनबाजीचे वेड असणारी, सुरक्षितपणे विलासणारी, आणि स्वतःला म्हणणारी, ‘मीच आहे, माझ्यासारखे कोणीही नाही. मी कधीही विधवा होणार नाही माझी लेकरे मी कधी गमावणार नाही.’

  4. यशायाह ४७:९सुमारे इ.स.पू. ७१२

    पण आता या दोन्ही आपत्ती तुझ्यावर त्याच क्षणी, एकाच दिवशी, पूर्णपणे गुदरतील: तू विधवा होशील आणि तुझी मुलेही गमावशील. येथे तुझे अनेक चेटके आणि तुझा सर्व जादूटोणा असूनही हे सर्व पूर्ण मापाने भरून तुझ्यावर पडेल.

  5. यशायाह ४७:१०सुमारे इ.स.पू. ७१२

    तू तुझ्या दुष्टाईवर भरवसा ठेवला ‘मला कोणी पाहत नाही,’ असे तू म्हणालीस. तुझ्या ज्ञानाने व शहाणपणाने तुला पथभ्रष्ट केले जेव्हा तू स्वतःला म्हणालीस, ‘मीच आहे आणि माझ्यासारखी दुसरी कोणी नाही.’

  6. यशायाह ४७:११सुमारे इ.स.पू. ७१२

    तुझ्यावर आपत्ती कोसळेल आणि ती हातचलाखी करून कशी उलटावी हे तुला कळणार नाही. तुझ्यावर संकट कोसळेल खंडणी भरूनही त्याचे निवारण करता येणार नाही; जी येईल असे वाटले नाही अशी एक घोर विपत्ती अकस्मात तुझ्यावर येईल.

  7. यशायाह ४७:१२सुमारे इ.स.पू. ७१२

    “मग तुझा जादूटोणा व मंत्रतंत्र, ज्याचा अनेक वर्षापासून परिश्रम करून तू अभ्यास केला, ते चालू दे. कदाचित तुला यश मिळेल, कदाचित दहशत निर्माण करशील.

  8. यशायाह ४७:१३सुमारे इ.स.पू. ७१२

    तुला मिळालेल्या सर्व सल्ल्यांनी तू थकली आहेस! तुझे ज्योतिषी पुढे येवोत, नक्षत्र पाहून महिन्याच्या महिने भविष्यकथन करणारे, तुझ्यावर पुढे येणाऱ्या संकटापासून तुझे रक्षण करो.

  9. यशायाह ४७:१४सुमारे इ.स.पू. ७१२

    ते निश्चितच भुसकटासारखे आहेत; अग्नी त्यांना भस्म करेल. ते अग्नीच्या सामर्थ्यापासून स्वतःचेही संरक्षण करू शकत नाहीत. हे ऊब देणारे निखारे नाहीत; ही जवळ बसविणारी शेकोटी नव्हे.

  10. यशायाह ४७:१५सुमारे इ.स.पू. ७१२

    ते तुझ्यासाठी एवढेच करतील की— ज्यांच्याशी तू आयुष्यभर व्यवहार केलास, आणि बालपणापासून ज्यांच्यासह कष्ट केलेस, ते सर्व त्यांच्या चुका कायम करीतच राहतील; आणि तुझा बचाव करण्यासाठी कोणीही राहणार नाही.

  11. यशायाह ४८:१सुमारे इ.स.पू. ७१२

    “याकोबाच्या वंशजांनो, हे ऐका तुम्ही जे इस्राएल या नावाने ओळखले जाता, आणि यहूदाह वंशावळीतून येता, तुम्ही जे याहवेहच्या नावाने शपथ घेता आणि इस्राएलाच्या परमेश्वराचा धावा करता— परंतु सत्यतेत किंवा नीतिमत्तेत नव्हे—

  12. यशायाह ४८:२सुमारे इ.स.पू. ७१२

    पवित्र नगरीचे रहिवासी असल्याचा दावा करता आणि इस्राएलाच्या परमेश्वरावर अवलंबून असल्याची फुशारकी मारता— ज्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे:

  13. यशायाह ४८:३सुमारे इ.स.पू. ७१२

    भावी काळात काय घडणार याबद्दल भविष्यवाणी मी फार पूर्वी केलेली आहे मी माझ्या मुखाने ते घोषित करून जाहीर केले; मग अकस्मात मी ते प्रत्यक्ष केले व तसे घडले.

  14. यशायाह ४८:४सुमारे इ.स.पू. ७१२

    तुम्ही किती हेकेखोर आहात हे मला माहीत होते; तुमच्या मानेचे स्नायू लोखंडाचे आणि तुमचे कपाळ कास्याचे आहेत.

  15. यशायाह ४८:५सुमारे इ.स.पू. ७१२

    याकारणास्तव या गोष्टी फार पूर्वीच सांगितल्या; प्रत्यक्ष वेळ येण्यापूर्वीच त्या मी तुम्हाला जाहीर केल्या, जेणेकरून तुम्ही असे म्हणू शकणार नाही, ‘आमच्या कोरीव मूर्तीने हे घडवून आणले; आमच्या लाकडी मूर्तीने व धातूच्या दैवतांनी ती आज्ञा दिली होती.’

  16. यशायाह ४८:६सुमारे इ.स.पू. ७१२

    ही भविष्ये तुम्ही ऐकलेली आहेत; त्या सर्वांकडे बघा. ती तुम्ही स्वीकारीत नाही का? “यापुढे मी तुमच्यापासून लपवून ठेवलेल्या नव्या गोष्टी सांगतो.

  17. यशायाह ४८:७सुमारे इ.स.पू. ७१२

    त्या आताच घडविण्यात आल्या आहेत, फार पूर्वी नव्हे; आजच्या आधी त्या तुम्ही ऐकलेल्या नाहीत. तुम्ही असे म्हणू शकणार नाही, ‘होय, त्या आम्हाला माहीत होत्या.’

  18. यशायाह ४८:८सुमारे इ.स.पू. ७१२

    तुम्ही त्या ऐकलेल्या नाहीत किंवा तुम्हाला उमगल्या नाहीत; पूर्वीपासूनच तुमचे कान उघडलेले नाहीत. कारण मला चांगले माहीत आहे कि तुम्ही किती विश्वासघातकी आहात; जन्मापासूनच तुम्ही बंडखोर म्हटले गेले.

  19. यशायाह ४८:९सुमारे इ.स.पू. ७१२

    तरी माझ्या नावाकरिता मी माझ्या प्रकोपास विलंब करेन, आणि माझ्या प्रशंसेकरिता तुमच्यावरून आवरून धरेन आणि तुमचा सर्वस्वी नाश करणार नाही.

  20. यशायाह ४८:१०सुमारे इ.स.पू. ७१२

    पाहा, मी तुम्हाला शुद्ध केले आहे, पण चांदीइतके नव्हे; पीडेच्या भट्टीत मी तुमची परीक्षा घेतली.

  21. यशायाह ४८:११सुमारे इ.स.पू. ७१२

    तरीही माझ्या प्रीत्यर्थ, होय, माझ्याच प्रीत्यर्थ मी हे करेन. मी स्वतःची अपकीर्ती कशी होऊ देईन? माझे गौरव मी इतरांना घेऊ देणार नाही.

  22. यशायाह ४८:१२सुमारे इ.स.पू. ७१२

    “याकोबा, मी ज्यांना बोलाविले, त्या इस्राएला, माझे ऐक, मीच परमेश्वर आहे; मीच आदि आणि मीच अंत आहे.

  23. यशायाह ४८:१३सुमारे इ.स.पू. ७१२

    मी माझ्या स्वतःच्या हाताने पृथ्वीचा पाया घातला, आणि माझ्या उजव्या हाताने आकाश आच्छादले; मी जेव्हा त्यांना हजर होण्याची आज्ञा देतो, ते सर्व एकत्र उभे राहतात.

  24. यशायाह ४८:१४सुमारे इ.स.पू. ७१२

    “एकत्र या, तुम्ही सर्वजण आणि ऐका: तुमच्या कोणत्या मूर्तीने तुम्हाला हे भविष्य सांगितले होते? याहवेहचा निवडलेला मित्र बाबेलच्या विरुद्ध त्यांचे हेतू साध्य करेल; बाबेलवर ते त्यांचा हात उगारतील.

  25. यशायाह ४८:१५सुमारे इ.स.पू. ७१२

    मी, जरी मी हे बोललो; होय, मीच त्याला बोलाविले आहे. मी त्याला आणेन. आणि या कामगिरीत तो यशस्वी होईल.