मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह ५२:९सुमारे इ.स.पू. ७१२

    यरुशलेमच्या उद्ध्वस्त स्थळांनो, सर्वांनी एकत्र उसळून हर्षगीतांनी जयघोष करा, कारण याहवेहने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्यांनी यरुशलेमास सोडविले आहे.

  2. यशायाह ५२:१०सुमारे इ.स.पू. ७१२

    याहवेह आपली पवित्र भुजा सर्व राष्ट्रांसमक्ष उघडणार आहेत, आणि पृथ्वीच्या सर्व दिगंतापर्यंत आमच्या परमेश्वराचे तारण दिसेल.

  3. यशायाह ५२:११सुमारे इ.स.पू. ७१२

    निघा, निघा, इथून बाहेर पडा! अपवित्र वस्तूला स्पर्श करू नका! तुम्ही जे याहवेहच्या मंदिरातील पात्रांची नेआण करता, इथून बाहेर पडा व स्वतःला शुद्ध करा.

  4. यशायाह ५२:१२सुमारे इ.स.पू. ७१२

    परंतु तुम्हाला इथून पलायन करावे लागणार नाही वा घाईने निघावे लागणार नाही; कारण याहवेह तुमच्यापुढे जातील, आणि इस्राएलचे परमेश्वर तुमचे पाठीराखे असतील.

  5. यशायाह ५२:१३सुमारे इ.स.पू. ७१२

    पाहा, माझा सेवक सुज्ञतेने वागेल; तो उच्च केला जाईल व उत्कर्ष पावेल आणि त्याचे मोठे गौरव होईल.

  6. यशायाह ५२:१४सुमारे इ.स.पू. ७१२

    जसे त्याला पाहताच अनेकजण विस्मित झाले होते— त्याचे स्वरूप मनुष्यप्राण्याच्या पलीकडे विद्रुप करण्यात आले होते आणि त्याचा आकार मानवसदृश्य राहिला नव्हता—

  7. यशायाह ५२:१५सुमारे इ.स.पू. ७१२

    यास्तव तो अनेक राष्ट्रांवर शिंपडेल, आणि त्याच्यामुळे राजे आपले मुख बंद करतील. कारण त्यांना पूर्वी कधी कोणी जे सांगितले नव्हते, ते आता बघतील, आणि ज्यांनी ऐकले नाही, त्यांना समजेल.

  8. यशायाह ५३:१सुमारे इ.स.पू. ७१२

    आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आणि याहवेहचा भुज कोणाला प्रकट झाला आहे?

  9. यशायाह ५३:२सुमारे इ.स.पू. ७१२

    त्यांच्यासमोर तो कोवळ्या अंकुरासारखा वाढला, शुष्क भूमीतून उगविलेल्या मुळासारखा होता. आम्हाला आकर्षित करेल असे कोणतेही सौंदर्य वा वैभव त्याच्यामध्ये नव्हते, तो आम्हाला हवासा वाटेल असे त्याच्या स्वरुपात काहीही नव्हते.

  10. यशायाह ५३:३सुमारे इ.स.पू. ७१२

    मनुष्यांनी त्याला तुच्छ लेखले आणि त्याला नाकारले, कारण क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असा तो पुरुष होता. जणू एखाद्याला पाहून लोकांनी आपली तोंडे लपवावी तसा तो तिरस्कृत व खालच्या दर्जात गणलेला होता.

  11. यशायाह ५३:४सुमारे इ.स.पू. ७१२

    तरी देखील त्याने आमचे दुःख स्वतःवर घेतले, आणि आमचे क्लेश वाहिले, आम्हाला मात्र वाटले की परमेश्वरानेच त्याला ही शिक्षा दिली, त्यांनीच दुःखी केले व ही पीडा दिली.

  12. यशायाह ५३:५सुमारे इ.स.पू. ७१२

    परंतु तो आमच्या अपराघांमुळे भोसकला गेला, तो आमच्या पापामुळे चिरडला गेला; आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याच्यावर आली, आणि त्याच्या जखमांद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झाले.

  13. यशायाह ५३:६सुमारे इ.स.पू. ७१२

    आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भटकून गेलो होतो, आम्हा प्रत्येकाने स्वतःचेच मार्ग धरले होते; आणि याहवेहने आम्हा सर्वांचा दोष त्याच्यावर लादला.

  14. यशायाह ५३:७सुमारे इ.स.पू. ७१२

    त्याला छळले व जाचले, तरीही त्याने आपले मुख उघडले नाही; वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले, आणि लोकर कातरणार्‍यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते, तसेच त्याने आपले मुख उघडले नाही.

  15. यशायाह ५३:८सुमारे इ.स.पू. ७१२

    अत्याचार करून, दोषी ठरविल्यावर ते त्याला जिवे मारण्यासाठी घेऊन गेले. तरी त्याच्या पिढीतून कोणी विरोध केला? कारण तो जिवंताच्या भूमीवरून काढून टाकण्यात आला; माझ्या लोकांच्या अपराधांसाठी त्याला शिक्षा देण्यात आली.

  16. यशायाह ५३:९सुमारे इ.स.पू. ७१२

    दुष्ट माणसांच्या सोबत त्याला कबर नेमून देण्यात आली, आणि श्रीमंताच्या कबरेमध्ये पुरण्यात आले, परंतु त्याने काहीही हिंसा केली नव्हती, आणि त्याच्या मुखात कोणतेही कपट नव्हते.

  17. यशायाह ५३:१०सुमारे इ.स.पू. ७१२

    परंतु त्याला चिरडून टाकावे व पीडित करावे अशीच याहवेहची इच्छा होती, आणि जरी त्याचे जीवन पापार्पण म्हणून अर्पण झाले, तरी तो त्याची संतती बघेल आणि त्याचा जीवनकाल लांबेल, आणि याहवेहची इच्छा त्याच्या हातून सिद्धीस जाईल.

  18. यशायाह ५३:११सुमारे इ.स.पू. ७१२

    वेदना सहन केल्यानंतर, तो जीवनाचा प्रकाश बघेल आणि समाधान पावेल; माझा नीतिमान सेवक त्याच्या सुज्ञतेमुळे अनेकांना निर्दोष ठरवेल, आणि त्यांची पापे स्वतःवर लादून घेईल.

  19. यशायाह ५३:१२सुमारे इ.स.पू. ७१२

    म्हणूनच महान लोकांसह मी त्याला वतन देईन, आणि अनेक सामर्थ्यशाली लोकांसह लूट वाटून घेईल. कारण त्याने आपले जीवन मरेपर्यंत ओतले, आणि अपराधी लोकांत त्याची गणना झाली. त्याने अनेकांचा पापाचा भार वाहिला, आणि पाप्यांसाठी मध्यस्थी केली.

  20. यशायाह ५४:१सुमारे इ.स.पू. ७१२

    “हे वांझ स्त्रिये, तू जी कधीही प्रसवली नाही; उचंबळून गीत गा, मोठ्याने जयघोष कर, कारण विवाहित स्त्रीपेक्षा, तू, जिला प्रसूती वेदना झाल्या नाही, त्या परित्यक्ता स्त्रीला अधिक लेकरे आहेत,” असे याहवेह म्हणतात.

  21. यशायाह ५४:२सुमारे इ.स.पू. ७१२

    “आपले तंबू प्रशस्त कर, तुझ्या तंबूच्या कनातीचा विस्तार वाढव, हात आवरू नको; दोरबंद लांब कर, खुंट्या मजबूत कर.

  22. यशायाह ५४:३सुमारे इ.स.पू. ७१२

    कारण तू उजवीकडे व डावीकडे पसरशील; तुझे वंशज इतर राष्ट्रांना हुसकावून लावतील आणि त्यांची उजाड झालेली नगरे पुन्हा वसवतील.

  23. यशायाह ५४:४सुमारे इ.स.पू. ७१२

    “भयभीत होऊ नको; तुला लज्जित व्हावे लागणार नाही. अप्रतिष्ठेला घाबरू नको; तुला अपमानित व्हावे लागणार नाही. तुझ्या तारुण्यातील लज्जा तू विसरून जाशील आणि वैधव्यातील दुःखांची तुला आठवणही राहणार नाही.

  24. यशायाह ५४:५सुमारे इ.स.पू. ७१२

    कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे— सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे— इस्राएलचे पवित्र परमेश्वर तुझे उद्धारकर्ता आहेत; त्यांना सर्व पृथ्वीचे परमेश्वर म्हणतात.

  25. यशायाह ५४:६सुमारे इ.स.पू. ७१२

    याहवेह तुला माघारी बोलावतील जणू काही तू त्याग केलेली व दुःखी आत्म्याची पत्नी होतीस— केवळ टाकून देण्याकरिता जी तारुण्यात विवाहित झाली होती,” असे तुझे परमेश्वर म्हणतात.