मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह ५६:२सुमारे इ.स.पू. ७१२

    जो शब्बाथाच्या दिवसास अपवित्र न करता त्याचे पालन करतो, अयोग्य गोष्ट करण्यापासून स्वतःला आवरतो, या सर्व गोष्टींवर अढळ राहतो, जो असे वागतो, तो मनुष्य धन्य होय.”

  2. यशायाह ५६:३सुमारे इ.स.पू. ७१२

    जो विदेशी मनुष्य याहवेहशी एकनिष्ठ राहतो, त्याने असे म्हणू नये, “याहवेह निश्चितच मला त्यांच्या लोकांमघून वगळतील.” आणि कोणत्याही षंढाने अशी तक्रार करू नये, “मी तर केवळ एक शुष्क वृक्ष आहे.”

  3. यशायाह ५६:४सुमारे इ.स.पू. ७१२

    तर याहवेह असे म्हणतात: “जे षंढ माझे शब्बाथ पवित्रपणे पाळतात, जे मला आवडणार्‍या गोष्टीच निवडतात, आणि माझा करार दृढ धरून राहतात—

  4. यशायाह ५६:५सुमारे इ.स.पू. ७१२

    त्यांना मी माझ्या मंदिरामध्ये व त्याच्या भिंतीच्या आत पुत्र व कन्यापेक्षाही चांगले असे संस्मरणीय बनवेन व एक नाव देईन. त्यांना मी सर्वकाळ टिकणारे नाव देईन, जे नाव कधीही नाहीसे होणार नाही.

  5. यशायाह ५६:६सुमारे इ.स.पू. ७१२

    आणि जे विदेशी याहवेहशी एकनिष्ठ राहतात, जे त्यांची सेवा करतात, त्यांच्या नावावर प्रीती करतात, आणि त्यांचे सेवक झाले आहेत, जे सर्व त्यांच्या शब्बाथास अपवित्र न करता त्याचे पालन करतात, आणि माझा करार दृढ धरून राहतात—

  6. यशायाह ५६:७सुमारे इ.स.पू. ७१२

    अशांना मी माझ्या पवित्र पर्वतावर आणेन आणि माझ्या प्रार्थना मंदिरामध्ये त्यांना आनंदित करेन. त्यांच्या होमार्पणे व अर्पणांचा माझ्या वेदीवर स्वीकार केला जाईल; कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनेचे घर असे म्हणतील.”

  7. यशायाह ५६:८सुमारे इ.स.पू. ७१२

    जे इस्राएलच्या निर्वासित झालेल्यांना एकत्र करतात, ते सार्वभौम याहवेह अशी घोषणा करतात— “ज्यांना पूर्वी एकत्र करण्यात आले आहे, त्या लोकांशिवाय इतर लोकांनाही मी त्यांच्यात गोळा करेन.”

  8. यशायाह ५६:९सुमारे इ.स.पू. ७१२

    या, कुरणातील सर्व पशूंनो, या, रानातील सर्व हिंस्र श्वापदांनो, येऊन आधाशीपणे खा!

  9. यशायाह ५६:१०सुमारे इ.स.पू. ७१२

    इस्राएलचे पहारेकरी आंधळे आहेत, ते सर्व ज्ञानशून्य आहेत; ते सर्व मुके कुत्रे आहेत, त्यांना भुंकता येत नाही; ते पडून राहतात व स्वप्ने पाहतत, त्यांना झोपायला फार आवडते.

  10. यशायाह ५६:११सुमारे इ.स.पू. ७१२

    ते कुत्र्याप्रमाणे खूप खादाड आहेत; त्यांची तृप्ती कधीही होत नाही. ते असमंजस मेंढपाळ आहेत; ते सर्व आपल्याच मर्जीने चालतात, केवळ स्वतःच्या स्वार्थाची काळजी घेतात.

  11. यशायाह ५६:१२सुमारे इ.स.पू. ७१२

    प्रत्येकजण म्हणतो, “या, मला मद्य आणू द्या! चला, मद्य पिऊन आपण धुंद होऊ या! आणि उद्याचा दिवसही आजसारखाच असेल, किंबहुना याहून जास्त चैनीचा असेल.”

  12. यशायाह ५७:१सुमारे इ.स.पू. ६९८

    नीतिमान नष्ट होतात, आणि ते कोणीही मनावर घेत नाही; दयाळू माणसे उचलून घेतली जातात, आणि कोणालाही हे उमगत नाही कि भावी काळातील अनर्थापासून राखण्यासाठीच त्यांना नेण्यात येते.

  13. यशायाह ५७:२सुमारे इ.स.पू. ६९८

    जे नीतिमार्गाने चालतात ते शांती पावतात; त्यांच्या मरणोत्तर त्यांना विसावा प्राप्त होतो.

  14. यशायाह ५७:३सुमारे इ.स.पू. ६९८

    “पण तुम्ही—अहो चेटकिणीच्या पुत्रांनो, जारकर्मींच्या व वेश्यांच्या संतानांनो, तुम्ही इकडे या!

  15. यशायाह ५७:४सुमारे इ.स.पू. ६९८

    तुम्ही कोणाची चेष्टा करता? कोणाकडे पाहून नाके मुरडता व आपल्या जिभा दाखविता? तुम्ही बंडखोरांची पिल्ले व लबाडांची संतती नाही काय?

  16. यशायाह ५७:५सुमारे इ.स.पू. ६९८

    एला वृक्षाच्या झाडीत आणि प्रत्येक घनदाट वृक्षाच्या सावलीत तुम्ही कामांध होता; खोल दर्‍यात, खडकांच्या कड्याखाली नरबळी म्हणून आपल्या लेकरांचे बळी देता.

  17. यशायाह ५७:६सुमारे इ.स.पू. ६९८

    खडकांच्या कड्याखालील गुळगुळीत दगडाच्या मूर्ती ही तुझी दैवते आहेत; खरोखर, हाच तुझा भाग आहे. होय, त्यांनाच तू पेयार्पणे करते आणि अन्नार्पणे करते. हे सर्व बघून, मला पाझर फुटेल का?

  18. यशायाह ५७:७सुमारे इ.स.पू. ६९८

    डोंगरमाथ्यांवर व अत्यंत उच्चस्थानी तू आपला बिछाना बनविला आहेस; तिथे वर जाऊन तू तुझी अर्पणे वाहिली.

  19. यशायाह ५७:८सुमारे इ.स.पू. ६९८

    बंद दरवाज्यामागे व उंबरठ्यावर तू तुझ्या अन्य दैवतांची चिन्हे लावली आहेस. माझा नकार करून, तू तुझा बिछाना उघडा केला आहेस, त्यावर तू झोपून तो आणखी जास्त उघडला आहेस; ज्यांचा बिछाना तुला प्रिय वाटतो, त्यांच्याशी तू समेट केला आहे, आणि त्यांच्या नग्न शरीराकडे तू कामातुर नजरेने बघते.

  20. यशायाह ५७:९सुमारे इ.स.पू. ६९८

    मोलखाला तू जैतुनाचे तेल वाहिले व तुझी सुगंधी अत्तरे वाढवून अर्पण केलीस. तू तुझ्या दूतांना दूरवर पाठविले; अगदी प्रत्यक्ष मृतलोकांच्या राज्यापर्यंत गेलीस.

  21. यशायाह ५७:१०सुमारे इ.स.पू. ६९८

    हे सर्व करून तू स्वतःला थकवून टाकले, पण तू असे म्हटले नाही, ‘हे किती निराशाजनक आहे.’ स्वतःला नव्या बलाने संचारित केले, म्हणून तू मूर्छित झाली नाही.

  22. यशायाह ५७:११सुमारे इ.स.पू. ६९८

    “इतकी दहशत व भीती तुला कोणाची वाटते कि तू माझ्याशी असत्याने वागते, तू माझे स्मरण केले नाही कि हे मनावरही घेतले नाही? मी बराच काळ निःशब्द राहिलो आहे म्हणून का तुला माझा धाक वाटत नाही?

  23. यशायाह ५७:१२सुमारे इ.स.पू. ६९८

    मी तुझे नीतिमत्व आणि तुझी कर्मे उघडकीस आणेन, आणि ती तुला लाभदायक होणार नाही.

  24. यशायाह ५७:१३सुमारे इ.स.पू. ६९८

    जेव्हा तू मदतीसाठी धावा करशील, तुझ्या संग्रहातील मूर्तींना तुझा बचाव करू दे! वारा त्या सर्वांना उडवून नेईल, श्वासाच्या एका फुंकराने त्या उडून जातील. परंतु जो कोणी माझा आधार घेतो तो या भूमीचा ताबा घेईल व माझ्या पवित्र पर्वताचा स्वामी होईल.”

  25. यशायाह ५७:१४सुमारे इ.स.पू. ६९८

    आणि असे म्हणण्यात येईल: “बांधा, बांधा, महामार्ग बांधा! माझ्या लोकांच्या वाटेतील सर्व अडथळे बाजूला करा.”