circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यशायाह ५७:१५सुमारे इ.स.पू. ६९८
जे अनंतकाळ अस्तित्वात आहेत, ज्यांचे नाम पवित्र आहे जे सर्वोच्च व परमथोर आहेत, ते म्हणतात— “मी परमोच्च व पवित्रस्थानी राहतो, परंतु जे पश्चात्तापी व आत्म्याने लीन आहेत, अशांसोबतही राहतो, मी नम्र जणांच्या आत्म्यांना ताजेतवाने करतो व पश्चात्तापी अंतःकरणाच्या लोकांना नवा धीर देतो.
- यशायाह ५७:१६सुमारे इ.स.पू. ६९८
मी त्यांना कायमचे दोषी ठरविणार नाही, नेहमीच क्रोध प्रकट करणार नाही, नाहीतर मी प्रत्यक्ष माझ्या हातांनी घडवले लोक माझ्यामुळे मूर्छित होतील.
- यशायाह ५७:१७सुमारे इ.स.पू. ६९८
मी त्यांच्या पापमय लोभामुळे संतापलो; आणि त्यांना ताडण केले व माझे मुख रागाने लपविले, तरी त्यांनी स्वेच्छेने करण्याचे सोडले नाही.
- यशायाह ५७:१८सुमारे इ.स.पू. ६९८
त्यांची वर्तणूक मी पाहिली आहे, तरीही मी त्यांना निरोगी करेन; मी त्यांचे मार्गदर्शन करेन व इस्राएलच्या दुःखितांचे सांत्वन परत देईन,
- यशायाह ५७:१९सुमारे इ.स.पू. ६९८
त्यांच्या ओठांवर प्रशंसा निर्माण करेन. शांती, शांती, दूरच्या व जवळच्या सर्वांना शांतीचा लाभ होवो, आणि मी त्या सर्वांना बरे करेन.” असे याहवेह म्हणतात.
- यशायाह ५७:२०सुमारे इ.स.पू. ६९८
परंतु दुष्ट लोक खवळलेल्या सागरांसारखे आहेत, ज्याला विसावा नसतो, ज्याच्या लाटा उसळून चिखल व गाळ बाहेर टाकतात.
- यशायाह ५७:२१सुमारे इ.स.पू. ६९८
माझे परमेश्वर म्हणतात, “दुष्टांना शांती नसते.”
- यशायाह ५८:१सुमारे इ.स.पू. ६९८
“उंच स्वरात गर्जना करा, रोखून ठेऊ नका. रणशिंगाच्या निनादाप्रमाणे तुमचा आवाज उंच करा. माझ्या लोकांची बंडखोरी आणि याकोबाच्या वंशजांना त्यांची पापे जाहीर करा.
- यशायाह ५८:२सुमारे इ.स.पू. ६९८
दिवसेन् दिवस ते माझा शोध घेतात; माझे मार्ग जाणून घेण्याचा कसून प्रयत्न करीत असल्याचा दिखावा करतात, जणू काही ते राष्ट्र सर्वकाही यथायोग्य करते आणि त्यांच्या परमेश्वराच्या आज्ञा त्यांनी फेटाळल्या नाहीत. ते मला रास्त निर्णय मागतात आणि परमेश्वराने त्यांच्या निकट यावे म्हणून आतुर आहेत असे दर्शवितात.
- यशायाह ५८:३सुमारे इ.स.पू. ६९८
ते म्हणतात, ‘आम्ही उपास केला, पण तुम्ही बघितलेही नाही? आम्ही नम्र झालो, आणि तुम्ही त्याकडे लक्षही दिले नाही?’ “तरी तुमच्या उपासाच्या दिवशी, तुम्ही मनाला वाटेल तसे करता आणि तुमच्या कामगारांची पिळवणूक करता.
- यशायाह ५८:४सुमारे इ.स.पू. ६९८
तुमचे उपास कलह व भांडणाने आणि एकमेकांशी दुष्टपणे मारामारी करण्याने संपतात. तुम्ही जसा उपास करता, तसा आता करून तुमचा आवाज उच्चस्थानी ऐकला जाईल अशी अपेक्षा करता.
- यशायाह ५८:५सुमारे इ.स.पू. ६९८
असा उपास मी निवडला आहे काय, लोकांनी नम्र होण्याचा एक दिवस? केवळ वार्याने लवणार्या लव्हाळ्याप्रमाणे वाकण्याकरिता, आणि गोणपाट नेसून राख फासण्याकरिता? यालाच तुम्ही उपास म्हणता का, याहवेहला असा दिवस मान्य असेल काय?
- यशायाह ५८:६सुमारे इ.स.पू. ६९८
“मी निवडलेला उपास याप्रकारचा नाही का: अन्यायाची बंधने तुटली जावी आणि जोखडाचे बंद सोडावे, पीडितांना मुक्त करावे आणि प्रत्येक जोखड तोडून टाकला जावा?
- यशायाह ५८:७सुमारे इ.स.पू. ६९८
भुकेल्यांना तुमच्या अन्नात तुम्ही वाटेकरी करू नये काय व निराश्रितांना आश्रय द्यावा— जेव्हा तुम्ही निर्वस्त्राला बघाल, त्याला पांघरूण घाला, आणि आपल्या रक्त व मांसाच्या बाधवांना दूर लोटावे का?
- यशायाह ५८:८सुमारे इ.स.पू. ६९८
मग तुमचा प्रकाश सूर्योदयाप्रमाणे उजाडेल, आणि तुमचे आरोग्य लगेच तुम्हाला प्राप्त होईल; तुमची धार्मिकता तुमच्यापुढे चालेल, आणि याहवेहचे गौरव तुमची पाठराखण करेल.
- यशायाह ५८:९सुमारे इ.स.पू. ६९८
मग तुम्ही हाक माराल आणि याहवेह त्यास उत्तर देतील; तुम्ही मदतीसाठी धावा कराल व ते म्हणतील: हा मी येथे आहे. “जर तुम्ही पीडितांना जोखडातून मुक्त कराल, एखाद्याकडे बोट रोखून आरोप लादण्याचे आणि द्वेषयुक्त बोलणे थांबवाल,
- यशायाह ५८:१०सुमारे इ.स.पू. ६९८
भुकेल्यांना खाऊ घालण्यासाठी स्वतःचे जीवन खर्ची घालाल, पीडितांच्या गरजांचा पुरवठा कराल, तर तुमचा प्रकाश अंधारातून झळकेल आणि तुमची रात्र मध्यान्हासारखी उजळेल.
- यशायाह ५८:११सुमारे इ.स.पू. ६९८
याहवेह तुम्हाला सतत मार्गदर्शन करतील; सूर्याच्या उष्णतेने शुष्क भूमीत राहूनही ते तुमच्या गरजा भागवतील व तुमच्या हाडांना बळकट करतील. मग तुम्ही भरपूर पाणी पाजलेल्या बागेप्रमाणे, कधीही पाणी न आटणाऱ्या झर्याप्रमाणे व्हाल.
- यशायाह ५८:१२सुमारे इ.स.पू. ६९८
तुमचे लोक पुरातन भग्नावशेषांची पुनर्बांधणी करतील आणि प्राचीन पाये पुन्हा उभारतील; भग्न झालेली तटबंदी दुरुस्त करणारे, बांधकाम व रस्ते पूर्वस्थितीत आणणारे असे तुम्ही म्हणविले जाल.
- यशायाह ५८:१३सुमारे इ.स.पू. ६९८
“जर तुम्ही शब्बाथदिन अशुद्ध करण्यापासून तुमची पावले दूर ठेवाल आणि माझ्या पवित्र दिवशी आपलीच मनमानी करणे सोडून द्याल, जर तुम्ही शब्बाथदिनास आनंदाचा दिवस मानाल आणि तो याहवेहचा पवित्र दिवस आहे म्हणून त्याचा सन्मान कराल, आणि त्या दिवसाचा आदर करून स्वतःच्या इच्छा बाजूला साराल आणि मनमानेल असे न वागता व निरर्थक गोष्टींची चर्चा करणार नाही,
- यशायाह ५८:१४सुमारे इ.स.पू. ६९८
तर याहवेहमध्ये तुम्हाला आनंद प्राप्त होईल, आणि मी तुम्हाला या भूतलाच्या उच्चस्थानी विजयाने चालवेन आणि तुमचा पिता याकोबाच्या वतनातील उपजावर मेजवानी देईन.” ही याहवेहच्या मुखातील वचने आहेत.
- यशायाह ५९:१सुमारे इ.स.पू. ६९८
निश्चितच, याहवेहची भुजा तारण करू शकणार नाही इतकी आखूड नाही, वा ऐकू येणार नाही असे त्यांचे कान बहिरे नाहीत.
- यशायाह ५९:२सुमारे इ.स.पू. ६९८
परंतु तुमच्या पातकांनी तुम्हाला तुमच्या परमेश्वरापासून दूर केले आहे; तुमच्या पापांनी त्यांचे मुख तुमच्यापासून लपविले आहे, जेणेकरून त्यांना ऐकू येणार नाही.
- यशायाह ५९:३सुमारे इ.स.पू. ६९८
कारण तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत, तुमची बोटे दोषीपणाने बरबटलेली आहेत. तुमच्या ओठांनी असत्य बोललेले आहे, आणि तुमची जीभ दुष्टतेच्या गोष्टी पुटपुटते.
- यशायाह ५९:४सुमारे इ.स.पू. ६९८
कोणी न्यायाने वागत नाही; कोणीही सत्याने खटला लढत नाही. ते निरर्थक वाद घालतात आणि खोटे शब्द उच्चारतात; ते क्षुब्धतेची गर्भधारण करतात आणि दुष्टतेस जन्म देतात.