मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह ५४:७सुमारे इ.स.पू. ७१२

    “केवळ काही क्षणासाठी मी तुझा त्याग केला होता, पण आता मोठ्या करुणेने मी तुला जवळ घेईन.

  2. यशायाह ५४:८सुमारे इ.स.पू. ७१२

    क्षणिक रागाच्या भरात मी थोडा वेळ माझे मुख तुझ्यापासून लपविले होते, परंतु आता सर्वकाळच्या प्रीतीने मी तुझ्यावर करुणा करेन,” असे याहवेह तुझे उद्धारकर्ता म्हणतात.

  3. यशायाह ५४:९सुमारे इ.स.पू. ७१२

    “हे माझ्याकरिता नोआहच्या दिवसासारखे आहे, मी पृथ्वी पुन्हा नोआहच्या जलाने आच्छादित करणार नाही, अशी मी शपथ वाहिली होती. आता ही शपथ वाहतो, यापुढे तुझ्यावर क्रोधित होणार नाही, तुला पुन्हा कधीही रागविणार नाही.

  4. यशायाह ५४:१०सुमारे इ.स.पू. ७१२

    कारण पर्वत हलतील व टेकड्या काढून टाकल्या जातील, परंतु तुझ्यावरील माझी अढळ प्रीती कधीही हलणार नाही वा माझा शांतीचा करार कधीही भंग होणार नाही,” असे याहवेह, तुझ्यावर करुणा करणारे म्हणतात.

  5. यशायाह ५४:११सुमारे इ.स.पू. ७१२

    “हे पीडित नगरी, वादळांनी फटकारलेल्या व सांत्वन न पावलेल्यांनो, पाचूरत्नांनी मी तुमची पुन्हा उभारणी करेन, व तुमचा पाया मौल्यवान नीलमणींवर करेन.

  6. यशायाह ५४:१२सुमारे इ.स.पू. ७१२

    अगे यरुशलेमे, मी तुझे बुरूज गोमेद रत्नांनी बांधीन आणि तुझ्या वेशी चकाकणार्‍या रत्नांच्या व तुझ्या सर्व भिंती मौल्यवान रत्नांच्या करेन.

  7. यशायाह ५४:१३सुमारे इ.स.पू. ७१२

    तुझ्या सर्व लेकरांना याहवेह शिकवतील, व त्यांना मोठी शांती प्राप्त होईल.

  8. यशायाह ५४:१४सुमारे इ.स.पू. ७१२

    तुम्ही नीतिमत्तेने प्रस्थापित व्हाल: जुलूमशाही तुमच्यापासून दूर राहील; तुम्हाला काहीही भयभीत करू शकणार नाही. दहशत तुमच्यापासून दूर करण्यात येईल; ती तुमच्याजवळ येणार नाही.

  9. यशायाह ५४:१५सुमारे इ.स.पू. ७१२

    जर कोणी तुमच्यावर हल्ला केला, तर ती माझी करणी नसेल; जे कोणी तुमच्यावर हल्ला करतील, ते तुम्हाला शरण जातील.

  10. यशायाह ५४:१६सुमारे इ.स.पू. ७१२

    “पाहा, भट्टीतले कोळसे फुलविणाऱ्या व कामास येणारी शस्त्रास्त्रे घडविणाऱ्या लोहाराला मीच उत्पन्न केले आहे. व आपत्ती करणाऱ्या विनाशकाची उत्पत्तीही मीच केली आहे;

  11. यशायाह ५४:१७सुमारे इ.स.पू. ७१२

    तुमच्याविरुद्ध घडविलेले कोणतेही शस्त्र कधीच सफल होणार नाही आणि तुमच्यावर आरोप करणारी प्रत्येक जीभ खोटी ठरविली जाईल. याहवेहच्या सेवकांचा हा वारसा आहे, हाच न्याय मी तुम्हाला दिला आहे,” अशी याहवेह घोषणा करतात.

  12. यशायाह ५५:१सुमारे इ.स.पू. ७१२

    “तुमच्यातील सर्व तान्हेल्यांनो, पाण्याजवळ या; आणि तुम्ही, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, या, घ्या व खा! या, द्राक्षारस अथवा दूध घ्या पैसे न देता, विनामूल्य घ्या.

  13. यशायाह ५५:२सुमारे इ.स.पू. ७१२

    जी भाकर नाही त्या अन्नपदार्थांवर व्यर्थ पैसे का खर्च करावे, आणि ज्याने समाधान होत नाही त्यासाठी कष्ट का करावे? ऐका, माझे ऐकून घ्या आणि जे चांगले आहे ते खा, आणि हे उत्तम अन्नपदार्थ खाऊन तुम्ही अत्यंत आनंदित व्हाल.

  14. यशायाह ५५:३सुमारे इ.स.पू. ७१२

    माझे ऐका आणि मजकडे या; लक्ष द्या, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल. मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करेन, माझ्या विश्वासू प्रीतीचे वचन मी दावीदाला दिलेले आहे.

  15. यशायाह ५५:४सुमारे इ.स.पू. ७१२

    पाहा, मी त्याला लोकांसमोर साक्षीदार, एक शासनकर्ता व लोकांचा अधिकारी बनविले.

  16. यशायाह ५५:५सुमारे इ.स.पू. ७१२

    निश्चितच ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा राष्ट्रांना बोलवाल, आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशी राष्ट्रे तुमच्याकडे पळत येतील, कारण याहवेह, तुमचे परमेश्वर, इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत, त्यांनी तुम्हाला गौरवाने संपन्न केले आहे.”

  17. यशायाह ५५:६सुमारे इ.स.पू. ७१२

    याहवेहच्या प्राप्तीचा काळ आहे, तेव्हा पर्यंतच त्यांचा शोध घ्या. ते समीप आहेत, तेव्हा पर्यंतच त्यांचा धावा करा.

  18. यशायाह ५५:७सुमारे इ.स.पू. ७१२

    दुष्टांनी आपले दुष्टमार्ग सोडून द्यावे अनीतिमानांनी त्यांचे विचार मनातून काढावे. त्यांनी याहवेहकडे वळावे, म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील, आपल्या परमेश्वराकडे धाव घ्यावी, म्हणजे ते त्यांना मुक्तपणे क्षमा करतील.

  19. यशायाह ५५:८सुमारे इ.स.पू. ७१२

    “जे माझे विचार आहेत, ते तुमचे विचार नाहीत, माझे मार्ग, ते तुमचे मार्ग नाहीत.” असे याहवेह म्हणतात.

  20. यशायाह ५५:९सुमारे इ.स.पू. ७१२

    “कारण आकाश पृथ्वीहून जसे उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून उच्च आहेत आणि माझे विचार तुमच्या विचाराहून उच्च आहेत.

  21. यशायाह ५५:१०सुमारे इ.स.पू. ७१२

    आकाशातून पाऊस व हिम ज्याप्रमाणे खाली पडतात आणि पृथ्वीला भिजवून टाकल्याशिवाय परत जात नाहीत आणि तिला अंकुरतात व बहरतात, जेणेकरून पेरणार्‍यासाठी बीज निपजते व खाणार्‍याला भाकर मिळते,

  22. यशायाह ५५:११सुमारे इ.स.पू. ७१२

    त्याप्रमाणे माझे वचन, जे माझ्या मुखातून बाहेर पडते: ते कार्य केल्याशिवाय माझ्याकडे परत येत नाही, पण ते माझ्या इच्छेप्रमाणे सर्व परिपूर्ण करते व ज्या कार्यासाठी पाठविण्यात आले, तो माझा हेतू साध्य करते.

  23. यशायाह ५५:१२सुमारे इ.स.पू. ७१२

    तुम्ही आनंदाने प्रस्थान कराल व शांतीने मार्गदर्शित व्हाल; पर्वते आणि टेकड्या, तुमच्यापुढे उचंबळून गीते गातील, आणि रानातील सर्व वृक्ष टाळ्या वाजवतील.

  24. यशायाह ५५:१३सुमारे इ.स.पू. ७१२

    काटेरी झुडपांच्या ऐवजी तिथे, सुरूचे वृक्ष वाढतील, आणि तिथे रिंगणीच्या जागी मेंदीची झाडे वाढतील. हे याहवेहच्या नामाच्या थोरवीकरिता असेल जे अनंतकाळपर्यंत टिकेल, असे ते सर्वकाळचे चिन्ह होईल.”

  25. यशायाह ५६:१सुमारे इ.स.पू. ७१२

    याहवेह असे म्हणतात: “न्यायीपणाने वागा, जे योग्य तेच करा, कारण माझे तारण अगदी हाताशी आलेले आहे आणि माझे नीतिमत्व लवकरच प्रगट होणार आहे.