मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 राजे १९:१५सुमारे इ.स.पू. ९०६

    याहवेहने त्याला म्हटले, “तू आलास त्या मार्गाने परत दिमिष्काच्या वाळवंटाकडे जा. आणि तिथे जाशील तेव्हा हजाएलचा अरामचा राजा म्हणून अभिषेक कर.

  2. 1 राजे १९:१६सुमारे इ.स.पू. ९०६

    आणि निमशीचा पुत्र येहूचा सुद्धा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक कर व आबेल-महोलाह येथील शाफाटचा पुत्र अलीशाचा तुझा वारस म्हणून संदेष्टा होण्यास अभिषेक कर.

  3. 1 राजे १९:१७सुमारे इ.स.पू. ९०६

    हजाएलच्या तलवारीपासून जो कोणी निसटेल त्याला येहू मारून टाकेल आणि जे येहूच्या तलवारीपासून निसटतील त्यांना अलीशा जिवे मारेल.

  4. 1 राजे १९:१८सुमारे इ.स.पू. ९०६

    तथापि बआलच्या पुढे गुडघे टेकले नाहीत किंवा आपल्या मुखाने त्याचे चुंबन घेतले नाही, असे सात हजार लोक मी इस्राएलात राखून ठेवले आहेत.”

  5. 1 राजे १९:१९सुमारे इ.स.पू. ९०६

    म्हणून एलीयाह तिथून निघाला आणि त्याला शाफाटचा पुत्र अलीशा दिसला. नांगराला बारा बैल जुंपून तो नांगरणी करीत होता आणि तो स्वतः बाराव्या बैलाच्या जोडीवर होता. एलीयाह त्याच्याकडे गेला व आपला झगा त्याच्यावर टाकला.

  6. 1 राजे १९:२०सुमारे इ.स.पू. ९०६

    तेव्हा अलीशाने आपले बैल सोडले आणि एलीयाहच्या मागे धावून गेला. तो म्हणाला, “मला माझ्या आईपित्याचे चुंबन घेऊ दे, मग मी आपल्याबरोबर येईन.” एलीयाहने उत्तर दिले, “परत जा, मी तुला काय केले?”

  7. 1 राजे १९:२१सुमारे इ.स.पू. ९०६

    तेव्हा अलीशा त्याच्यापासून निघून परतला. त्याने आपल्या बैलाची एक जोडी घेतली आणि ती कापली. त्याने नांगरणीची साधने पेटवून त्यावर मांस शिजविले आणि लोकांना दिले आणि त्यांनी ते खाल्ले. मग तो एलीयाहचा अनुयायी होण्यास निघाला आणि त्याचा सेवक झाला.

  8. 1 राजे २०:१सुमारे इ.स.पू. ९०१

    अरामचा राजा बेन-हदादाने आपले सैन्य एकत्र केले. त्याच्याबरोबर बत्तीस राजे आपआपले घोडे व रथ घेऊन त्यांनी शोमरोनला वेढा घालून त्यावर हल्ला केला.

  9. 1 राजे २०:२सुमारे इ.स.पू. ९०१

    त्याने इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे शहरात असे सांगत दूत पाठवले,

  10. 1 राजे २०:३सुमारे इ.स.पू. ९०१

    “बेन-हदाद असे म्हणतो: ‘तुझे चांदी व सोने माझे आहेत, तुझ्या उत्तम स्त्रिया आणि लेकरे ही सुद्धा माझी आहेत.’ ”

  11. 1 राजे २०:४सुमारे इ.स.पू. ९०१

    इस्राएलच्या राजाने उत्तर दिले, “माझ्या स्वामी, आपल्या म्हणण्याप्रमाणे मी व माझे जे काही आहे ते सर्व आपलेच आहे.”

  12. 1 राजे २०:५सुमारे इ.स.पू. ९०१

    दूत पुन्हा येऊन म्हणाले, “बेन-हदाद असे म्हणतो: ‘तुझी चांदी व सोने, तुझ्या स्त्रिया व लेकरे यांना माझ्या स्वाधीन करावे म्हणून सांगितले होते.

  13. 1 राजे २०:६सुमारे इ.स.पू. ९०१

    परंतु उद्या याच वेळी तुझ्या राजवाड्यात व तुझ्या अधिकार्‍यांच्या घरात शोध करावा म्हणून मी माझे अधिकारी पाठवेन. तुझे जे काही मौल्यवान आहे ते सर्व ते घेऊन जातील.’ ”

  14. 1 राजे २०:७सुमारे इ.स.पू. ९०१

    तेव्हा इस्राएलच्या राजाने देशातील वडील लोकांना बोलाविले व म्हटले, “पाहा हा मनुष्य कसा त्रास देऊ इच्छित आहे! त्याने जेव्हा माझ्या स्त्रिया आणि माझी लेकरे, माझी चांदी व सोने मागवून घेतली, मी त्याला नकार दिला नाही.”

  15. 1 राजे २०:८सुमारे इ.स.पू. ९०१

    वडील आणि सर्व लोकांनी उत्तर दिले, “आपण त्याचे ऐकू नये किंवा त्याच्या मागण्यांना सहमत होऊ नये.”

  16. 1 राजे २०:९सुमारे इ.स.पू. ९०१

    तेव्हा त्याने बेन-हदादच्या दूतांना उत्तर दिले, “माझ्या स्वामीला सांगा, ‘पहिल्याने आपण जी मागणी केली होती त्यानुसार आपला हा सेवक करेल, परंतु ही मागणी मी पूर्ण करू शकत नाही.’ ” त्यांनी परत जाऊन हा संदेश बेन-हदादकडे पोहोचविला.

  17. 1 राजे २०:१०सुमारे इ.स.पू. ९०१

    तेव्हा बेन-हदादने अहाबास आणखी एक संदेश पाठवला: “जर माझ्या माणसांसाठी शोमरोनात मूठभर माती जरी पुरेशी पडली तरी देव माझे तसे किंवा त्यापेक्षा अधिक वाईट करो.”

  18. 1 राजे २०:११सुमारे इ.स.पू. ९०१

    इस्राएलच्या राजाने उत्तर दिले, “त्याला सांगा: ‘युद्धासाठी शस्त्रधारण करणार्‍याने शस्त्र उतरविणार्‍याप्रमाणे फुशारकी मारू नये.’ ”

  19. 1 राजे २०:१२सुमारे इ.स.पू. ९०१

    बेन-हदाद आणि इतर राजे आपल्या तंबूंमध्ये मद्य पीत असताना त्याने ही बातमी ऐकली आणि त्याने त्याच्या माणसांना आज्ञा दिली: “हल्ल्यासाठी तयारी करा.” म्हणून शहरावर हल्ला करण्यास त्यांनी तयारी केली.

  20. 1 राजे २०:१३सुमारे इ.स.पू. ९०१

    त्या दरम्यान इस्राएलचा राजा अहाबकडे एक संदेष्टा आला व त्याने असे जाहीर केले, “याहवेह असे म्हणतात: ‘हे मोठे सैन्य तू पाहतोस काय? आज ते मी तुझ्या हाती देईन, मग तू जाणशील की मी याहवेह आहे.’ ”

  21. 1 राजे २०:१४सुमारे इ.स.पू. ९०१

    “परंतु हे कोण करेल?” अहाबाने विचारले. संदेष्ट्याने उत्तर दिले, “याहवेह असे म्हणतात: ‘राज्यपालांच्या हाताखाली काम करणारे कनिष्ठ सैनिक हे करतील.’ ” अहाबाने विचारले, “आणि युद्धाची सुरुवात कोण करणार?” संदेष्ट्याने म्हटले, “सुरुवात तू करणार.”

  22. 1 राजे २०:१५सुमारे इ.स.पू. ९०१

    तेव्हा अहाबाने राज्यपालांच्या हाताखाली असलेल्या दोनशे बत्तीस कनिष्ठ सैन्यांना बोलावून घेतले. मग त्याने सर्व इस्राएली लोकांना जमा केले, ते सर्व सात हजार होते.

  23. 1 राजे २०:१६सुमारे इ.स.पू. ९०१

    मध्यान्हाच्या वेळी, बेन-हदाद आणि त्याच्याबरोबर हात मिळविलेले बत्तीस राजे त्यांच्या तंबूंमध्ये मद्यधुंद झालेले होते.

  24. 1 राजे २०:१७सुमारे इ.स.पू. ९०१

    राज्यपालांच्या हाताखाली असलेले कनिष्ठ सैनिक प्रथम बाहेर पडले. आता बेन-हदादने टेहळणीसाठी पाठविलेल्या सैनिकांनी येऊन सांगितले, “शोमरोनातून माणसे निघाली आहेत.”

  25. 1 राजे २०:१८सुमारे इ.स.पू. ९०१

    तेव्हा तो म्हणाला, “जर ते शांतीने येत आहेत तर त्यांना जिवंत पकडा; जर ते युद्धासाठी येत आहेत तरीही त्यांना जिवंत पकडा.”