मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 राजे १८:३६सुमारे इ.स.पू. ९०६

    यज्ञाच्या वेळी, एलीयाह संदेष्टा पुढे आला आणि त्याने प्रार्थना केली: “हे याहवेह, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलच्या परमेश्वरा, आज हे जाहीर होवो की इस्राएलमध्ये केवळ तुम्हीच परमेश्वर आहात आणि मी तुमचा सेवक असून या सर्व गोष्टी मी आपल्या आज्ञेनुसार केल्या आहेत.

  2. 1 राजे १८:३७सुमारे इ.स.पू. ९०६

    मला उत्तर द्या, हे याहवेह, मला उत्तर द्या, म्हणजे या लोकांना समजेल, याहवेह, तुम्हीच परमेश्वर आहे आणि आपणच त्यांची मने परत वळवित आहात.”

  3. 1 राजे १८:३८सुमारे इ.स.पू. ९०६

    तेव्हा याहवेहचा अग्नी आला आणि होमार्पण, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि खळग्यातील पाणी चाटून टाकले.

  4. 1 राजे १८:३९सुमारे इ.स.पू. ९०६

    जेव्हा सर्व लोकांनी हे पाहिले, तेव्हा ते पालथे पडून रडू लागले, “याहवेह हेच परमेश्वर आहे! याहवेह हेच परमेश्वर आहे!”

  5. 1 राजे १८:४०सुमारे इ.स.पू. ९०६

    मग एलीयाहने त्यांना आज्ञा दिली, “बआलच्या संदेष्ट्यांना पकडा, कोणालाही जाऊ देऊ नका!” तेव्हा त्यांनी पकडले आणि एलीयाहने त्यांना खाली किशोन ओहळाकडे नेऊन त्यांचा वध केला.

  6. 1 राजे १८:४१सुमारे इ.स.पू. ९०६

    आणि एलीयाहने अहाबास म्हटले, “जा, खा व पी, कारण मला मुसळधार पावसाचा आवाज येत आहे.”

  7. 1 राजे १८:४२सुमारे इ.स.पू. ९०६

    म्हणून अहाब खाण्यापिण्यास गेला, परंतु एलीयाह कर्मेल डोंगराच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले.

  8. 1 राजे १८:४३सुमारे इ.स.पू. ९०६

    तो आपल्या सेवकास म्हणाला, “जा आणि समुद्राकडे दृष्टी लाव.” तेव्हा तो गेला आणि त्याने पाहिले. तो म्हणाला, “काही दिसत नाही.” सात वेळा एलीयाह म्हणाला, “परत जा.”

  9. 1 राजे १८:४४सुमारे इ.स.पू. ९०६

    सातव्या वेळेस सेवकाने सांगितले, “मनुष्याच्या हाताएवढा लहानसा ढग समुद्रातून वर येत आहे.” एलीयाह म्हणाला, “जा आणि अहाबाला सांग, ‘पावसाने तुला थांबविण्याआधी, रथ जुंपून खाली जा.’ ”

  10. 1 राजे १८:४५सुमारे इ.स.पू. ९०६

    थोड्याच वेळात, आकाश काळ्या ढगांनी भरले, वारा वाहू लागला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला आणि अहाब रथात बसून येज्रील येथे निघाला.

  11. 1 राजे १८:४६सुमारे इ.स.पू. ९०६

    याहवेहचे सामर्थ्य एलीयाहवर आले आणि तो आपली कंबर बांधून अहाबापुढे येज्रीलपर्यंत धावत गेला.

  12. 1 राजे १९:१सुमारे इ.स.पू. ९०६

    एलीयाहने जे काही केले आणि त्याने बआलाच्या सर्व संदेष्ट्यांना तलवारीने कसे मारून टाकले ते अहाबाने ईजबेलला सांगितले.

  13. 1 राजे १९:२सुमारे इ.स.पू. ९०६

    तेव्हा ईजबेलने एलीयाहकडे असे म्हणत एक दूत पाठवला, “उद्या या वेळेपर्यंत मी त्यांच्यातील एकाप्रमाणे तुझ्या जिवाचे केले नाही तर देव माझे त्याहूनही अधिक वाईट करो.”

  14. 1 राजे १९:३सुमारे इ.स.पू. ९०६

    एलीयाह घाबरून आपला जीव घेऊन पळून गेला. जेव्हा तो यहूदीया प्रांतातील बेअर-शेबा नगरात आला, त्याने आपल्या सेवकाला तिथे सोडले,

  15. 1 राजे १९:४सुमारे इ.स.पू. ९०६

    तो स्वतः एक दिवसाचा प्रवास करीत रानात गेला, तो रतामाच्या झुडूपाखाली आला आणि मरून जावे म्हणून तिथे बसून प्रार्थना केली. “हे याहवेह आता पुरे आहे, माझा प्राण घ्या, मी माझ्या पूर्वजांपेक्षा चांगला आहे असे नाही.”

  16. 1 राजे १९:५सुमारे इ.स.पू. ९०६

    नंतर तो त्या रतामाच्या झुडूपाखाली पडून झोपी गेला. अचानक परमेश्वराच्या दूताने येऊन त्याला स्पर्श करीत म्हटले, “ऊठ आणि खा.”

  17. 1 राजे १९:६सुमारे इ.स.पू. ९०६

    त्याने सभोवती पाहिले, आणि त्याच्या उशाशी निखार्‍यावर भाजलेल्या काही भाकरी आणि पाण्याचे एक भांडे ठेवलेले होते. तो भाकर खाऊन पाणी प्याला आणि पुन्हा झोपी गेला.

  18. 1 राजे १९:७सुमारे इ.स.पू. ९०६

    याहवेहचा दूत परत दुसर्‍यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हणाला, “ऊठ आणि खा, कारण तुला फार लांबचा प्रवास करावयाचा आहे.”

  19. 1 राजे १९:८सुमारे इ.स.पू. ९०६

    तेव्हा त्याने उठून अन्नपाणी घेतले. त्या अन्नाच्या शक्तीवर चाळीस दिवस व चाळीस रात्री प्रवास करीत होरेब, तो परमेश्वराच्या डोंगराकडे पोहोचला.

  20. 1 राजे १९:९सुमारे इ.स.पू. ९०६

    तिथे तो गुहेत जाऊन रात्रभर तिथेच राहिला. आणि याहवेहचे वचन त्याच्याकडे आले: “एलीयाह, तू येथे काय करीत आहेस?”

  21. 1 राजे १९:१०सुमारे इ.स.पू. ९०६

    एलीयाह म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह परमेश्वरासाठी मी फार ईर्ष्यावान आहे. इस्राएली लोकांनी आपला करार नाकारला आहे, आपल्या वेद्या फोडल्या आहेत आणि आपल्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकले आहे. मी एकटाच उरलो आहे आणि आता ते मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”

  22. 1 राजे १९:११सुमारे इ.स.पू. ९०६

    याहवेहने त्याला म्हटले, “बाहेर जा आणि याहवेहच्या उपस्थितीत डोंगरावर उभा राहा, कारण याहवेह तिथून जाणार आहेत.” तेव्हा मोठ्या व शक्तिशाली वार्‍याने डोंगर याहवेहसमोर दुभागले आणि खडक फोडले, परंतु याहवेह त्या वार्‍यात नव्हते. त्या वार्‍यानंतर भूमिकंप झाला, परंतु याहवेह त्या भूमिकंपात देखील नव्हते.

  23. 1 राजे १९:१२सुमारे इ.स.पू. ९०६

    भूमिकंपानंतर अग्नी आला, परंतु त्या अग्नीतही याहवेह नव्हते. आणि त्या अग्नीनंतर एक शांत वाणी झाली.

  24. 1 राजे १९:१३सुमारे इ.स.पू. ९०६

    जेव्हा एलीयाहने ही वाणी ऐकली, त्याने आपल्या झग्याने आपला चेहरा झाकून घेतला आणि बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी जाऊन उभा राहिला. मग ती वाणी त्याला म्हणाली, “एलीयाह, तू येथे काय करीत आहेस?”

  25. 1 राजे १९:१४सुमारे इ.स.पू. ९०६

    एलीयाह म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह परमेश्वरासाठी मी फार ईर्ष्यावान आहे. इस्राएली लोकांनी आपला करार नाकारला आहे, आपल्या वेद्या फोडल्या आहेत आणि आपल्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकले आहे. मी एकटाच उरलो आहे आणि आता ते मलाही मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”