मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 राजे २०:१९सुमारे इ.स.पू. ९०१

    तेव्हा राज्यपालांच्या हाताखाली असलेले कनिष्ठ सैनिक नगरातून बाहेर पडले आणि त्यांच्यामागे सैन्य निघाले.

  2. 1 राजे २०:२०सुमारे इ.स.पू. ९०१

    आणि त्या प्रत्येकाने आपआपल्या विरोधकांना मारून टाकले; आणि अरामी लोकांनी पळ काढला आणि इस्राएली लोकांनी त्यांचा पाठलाग केला. पण अरामचा राजा बेन-हदाद आपल्या काही घोडेस्वारांबरोबर घोड्यावर स्वार होऊन निसटून गेला.

  3. 1 राजे २०:२१सुमारे इ.स.पू. ९०१

    इस्राएलच्या राजाने जाऊन त्यांच्या घोड्यांना व रथांना गाठले आणि अराम्यांचे मोठे नुकसान केले.

  4. 1 राजे २०:२२सुमारे इ.स.पू. ९०१

    त्यानंतर, संदेष्ट्याने इस्राएलच्या राजाकडे येऊन म्हटले, “आपणास बळकट करा आणि काय करावे हे जपून पाहा, कारण पुढील वसंतऋतूमध्ये अरामचा राजा पुन्हा तुझ्यावर हल्ला करेल.”

  5. 1 राजे २०:२३सुमारे इ.स.पू. ९०१

    त्या दरम्यान, अरामाच्या राजाच्या अधिकाऱ्यांनी त्याला सल्ला दिला, “त्यांची दैवते, डोंगरावरील दैवते आहेत. म्हणून ते आपल्यासमोर अधिक प्रबळ ठरले. परंतु आपण त्यांच्याशी जर मैदानावर लढलो, तर आपण त्यांच्यावर प्रबळ ठरू.

  6. 1 राजे २०:२४सुमारे इ.स.पू. ९०१

    मात्र असे करा: की राजांना बाजूला काढा व त्यांच्या जागी इतर राज्यपालांची नेमणूक करा.

  7. 1 राजे २०:२५सुमारे इ.स.पू. ९०१

    तुमचे जे सैन्य नष्ट झाले, त्यासारखे दुसरे सैन्य; घोड्यासाठी घोडा व रथासाठी रथ तयार करा; म्हणजे आपण मैदानावर इस्राएलशी लढू शकू आणि खचितच आपण त्यांच्यापेक्षा अधिक प्रबळ होऊ.” त्यांच्याशी सहमत होऊन त्यानुसार त्याने केले.

  8. 1 राजे २०:२६सुमारे इ.स.पू. ९०१

    पुढील वसंतॠतूत बेन-हदादने अरामी लोकांना जमा केले आणि ते इस्राएलशी लढण्यास अफेक येथे गेले.

  9. 1 राजे २०:२७सुमारे इ.स.पू. ९०१

    जेव्हा इस्राएली लोकसुद्धा एकत्र होऊन आपला अन्नसामुग्रींचा पुरवठा करून त्यांचा सामना करण्यास निघाले. इस्राएली लोकांनी शेळ्यांच्या दोन लहान कळपांप्रमाणे त्यांच्यासमोर तळ दिला आणि अरामी लोकांनी सर्व प्रदेशाला व्यापून टाकले होते.

  10. 1 राजे २०:२८सुमारे इ.स.पू. ९०१

    परमेश्वराचा एक मनुष्य आला आणि त्याने इस्राएलच्या राजाला सांगितले, “याहवेह असे म्हणतात: ‘कारण अरामी लोकांना वाटते की याहवेह डोंगरावरील दैवत आहे, तळवटीचा नाही, म्हणून मी हे मोठे सैन्य तुझ्या हाती देईन आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”

  11. 1 राजे २०:२९सुमारे इ.स.पू. ९०१

    सात दिवसापर्यंत त्यांनी एकमेकांसमोर तळ दिला आणि सातव्या दिवशी लढाई सुरू झाली. इस्राएली लोकांनी एका दिवसात एक लाख अरामी पायदळी सैन्याला मारून टाकले.

  12. 1 राजे २०:३०सुमारे इ.स.पू. ९०१

    बाकीचे लोक अफेक शहरात पळून गेले, तिथे सत्तावीस हजार लोकांवर भिंत कोसळून पडली आणि बेन-हदाद शहरात पळून जाऊन एका आतील खोलीत लपून राहिला.

  13. 1 राजे २०:३१सुमारे इ.स.पू. ९०१

    त्याचे अधिकारी त्याला म्हणाले, “पाहा, आम्ही असे ऐकले आहे की इस्राएली राजे फार दयाळू असतात. तर आपण आपल्या कंबरेस गोणपाट नेसून आणि आपल्या डोक्याला दोरी बांधून इस्राएलच्या राजाकडे जाऊ, कदाचित तो तुझा जीव वाचवेल.”

  14. 1 राजे २०:३२सुमारे इ.स.पू. ९०१

    तेव्हा आपल्या कंबरेला गोणपाट नेसून व डोक्याला दोरी बांधून, ते इस्राएलच्या राजाकडे गेले व म्हणाले, “आपला सेवक बेन-हदाद म्हणतो: ‘कृपया मला जीवनदान द्यावे.’ ” राजाने म्हटले, “तो अजूनही जिवंत आहे काय? तो तर माझा भाऊ आहे.”

  15. 1 राजे २०:३३सुमारे इ.स.पू. ९०१

    त्या माणसांनी हे चांगले चिन्ह असे समजून अहाबाचा शब्द चटकन पकडून ते म्हणाले, “होय, आपला भाऊ बेन-हदाद!” राजाने म्हटले, “जा आणि त्याला घेऊन या,” जेव्हा बेन-हदाद बाहेर आला, अहाबाने त्याला आपल्या रथात घेतले.

  16. 1 राजे २०:३४सुमारे इ.स.पू. ९०१

    बेन-हदाद म्हणाला, “माझ्या पित्याने जी शहरे आपल्या पित्याकडून घेतली ती सर्व मी आपणास परत करेन. माझ्या पित्याने जशा शोमरोनात वसविल्या तशाच बाजारपेठा आपण दिमिष्कात वसवा.” अहाब म्हणाला, “या करारावर मी तुला मोकळे करतो.” म्हणून त्याने त्याच्याशी करार केला व त्याला सोडून दिले.

  17. 1 राजे २०:३५सुमारे इ.स.पू. ९०१

    याहवेहच्या शब्दानुसार संदेष्ट्यांच्या एका मंडळीतील एक संदेष्टा आपल्या साथीदाराला म्हणाला, “आपल्या शस्त्राने माझ्यावर वार कर,” परंतु त्याने नकार दिला.

  18. 1 राजे २०:३६सुमारे इ.स.पू. ९०१

    तेव्हा संदेष्टा म्हणाला, “कारण तू याहवेहचा शब्द मानला नाहीस, तू माझ्यापासून जाताच एक सिंह तुला मारून टाकील.” आणि तो मनुष्य जाताच सिंहाने त्याला गाठले व मारून टाकले.

  19. 1 राजे २०:३७सुमारे इ.स.पू. ९०१

    मग संदेष्ट्याने आणखी एका मनुष्याला म्हटले, “कृपया माझ्यावर वार कर.” तेव्हा त्या मनुष्याने त्याच्यावर वार करून त्याला जखमी केले.

  20. 1 राजे २०:३८सुमारे इ.स.पू. ९०१

    नंतर संदेष्टा जाऊन राजाची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभा राहिला. त्याने आपल्या पागोट्याने आपले डोळे झाकून घेऊन आपले रूप बदलले होते.

  21. 1 राजे २०:३९सुमारे इ.स.पू. ९०१

    राजा जवळून जात असता, संदेष्ट्याने त्याला हाक मारीत म्हटले, “आपला सेवक युद्धभूमीवर गेला असता, एक मनुष्य एका कैद्याला माझ्याकडे घेऊन आला व म्हणाला, ‘या माणसावर लक्ष ठेव, तो जर गायब झाला, तर त्याच्या जिवासाठी तुला आपला जीव द्यावा लागेल, नाहीतर त्याचा मोबदला म्हणून तुला चांदीचा एक तालांत भरावा लागेल.’

  22. 1 राजे २०:४०सुमारे इ.स.पू. ९०१

    आपला सेवक इकडे तिकडे व्यस्त असताना, तो मनुष्य गायब झाला.” “आपली शिक्षा हीच असणार,” इस्राएलचा राजा म्हणाला. “तू आपल्याच मुखाने ती सांगितली आहे.”

  23. 1 राजे २०:४१सुमारे इ.स.पू. ९०१

    तेव्हा संदेष्ट्याने चटकन आपल्या डोळ्यांवरील पागोटाची पट्टी काढली, आणि तो संदेष्ट्यांपैकी एक आहे असे इस्राएलच्या राजाने ओळखले.

  24. 1 राजे २०:४२सुमारे इ.स.पू. ९०१

    संदेष्टा राजाला म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘ज्या मनुष्याने मरावे असे मी योजले होते, त्याला तू मोकळे सोडले आहे. त्यामुळे त्याच्या जिवाबद्दल तुझा जीव, त्याच्या लोकांसाठी तुझे लोक जातील.’ ”

  25. 1 राजे २०:४३सुमारे इ.स.पू. ९०१

    तेव्हा इस्राएलचा राजा खिन्न व रागाने भरून शोमरोनातील आपल्या राजवाड्याकडे गेला.