- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
- 1 राजे २१:२६सुमारे इ.स.पू. ८९९
याहवेहने इस्राएली लोकांच्या पुढून घालवून दिलेल्या अमोरी लोकांप्रमाणे त्याने मूर्तींच्या मागे लागून अमंगळ कृत्ये केली.)
- 1 राजे २१:२७सुमारे इ.स.पू. ८९९
अहाबाने जेव्हा हे शब्द ऐकले, त्याने आपली वस्त्रे फाडली व गोणपाट नेसून उपास केला. तो गोणपाटात राहून दीनपणे जगू लागला.
- 1 राजे २१:२८सुमारे इ.स.पू. ८९९
नंतर एलीयाह तिश्बीकडे याहवेहचे वचन आले:
- 1 राजे २१:२९सुमारे इ.स.पू. ८९९
“अहाब माझ्यासमोर कसा नम्र झाला आहे हे तुला दिसते का? कारण त्याने स्वतःला नम्र केले आहे, म्हणून हे अरिष्ट मी तो जिवंत असताना आणणार नाही, परंतु ते मी त्याच्या घराण्यावर त्याच्या पुत्राच्या काळात आणेन.”
- 1 राजे २२:१सुमारे इ.स.पू. ९००
पुढील तीन वर्षात अराम व इस्राएलमध्ये युद्ध झाले नाही.
- 1 राजे २२:२सुमारे इ.स.पू. ८९७
पण तिसर्या वर्षी यहूदीयाचा राजा यहोशाफाट इस्राएलच्या राजाला भेटण्यास गेला.
- 1 राजे २२:३सुमारे इ.स.पू. ८९७
इस्राएलचा राजा आपल्या अधिकार्यांना म्हणाला, “रामोथ गिलआद आपलेच आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय आणि तरीही अरामाच्या राजाकडून ते परत घेण्यास आपण काहीही का करत नाही?”
- 1 राजे २२:४सुमारे इ.स.पू. ८९७
तेव्हा त्याने यहोशाफाटला विचारले, “तुम्ही माझ्याबरोबर रामोथ गिलआदविरुद्ध युद्ध करण्यासाठी जाल का?” यहोशाफाटने इस्राएलच्या राजाला उत्तर दिले, “तुम्ही जसे आहात तसाच मी आहे आणि माझे लोक तुमचे लोक आहेत, जसे माझे घोडे तसेच ते तुमचेही घोडे आहेत.”
- 1 राजे २२:५सुमारे इ.स.पू. ८९७
परंतु यहोशाफाट इस्राएलच्या राजाला असे सुद्धा म्हणाला, “प्रथम याहवेहचा सल्ला घ्या.”
- 1 राजे २२:६सुमारे इ.स.पू. ८९७
तेव्हा इस्राएलच्या राजाने सुमारे चारशे संदेष्ट्यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “मी रामोथ-गिलआदच्या विरुद्ध युद्धास जावे की नाही?” ते म्हणाले, “जा, कारण प्रभू ते राजाच्या हाती देतील.”
- 1 राजे २२:७सुमारे इ.स.पू. ८९७
परंतु यहोशाफाटने विचारले, “आपण विचारावे असा याहवेहचा एकही संदेष्टा येथे नाही काय?”
- 1 राजे २२:८सुमारे इ.स.पू. ८९७
इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “ज्याच्याद्वारे आपण याहवेहचा सल्ला घेऊ शकतो असा एक संदेष्टा अजूनही आहे, परंतु तो माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही, नेहमीच वाईट संदेश देतो, म्हणून मला त्याचा तिरस्कार वाटतो. तो इम्लाहचा पुत्र मिखायाह आहे.” यहोशाफाटने उत्तर दिले, “राजाने असे बोलू नये.”
- 1 राजे २२:९सुमारे इ.स.पू. ८९७
तेव्हा इस्राएलच्या राजाने आपल्या एका अधिकार्याला बोलाविले व म्हटले, “लवकर जाऊन इम्लाहचा पुत्र मिखायाह याला घेऊन ये.”
- 1 राजे २२:१०सुमारे इ.स.पू. ८९७
इस्राएलचा राजा आणि यहूदीयाचा राजा यहोशाफाट आपली राजवस्त्रे परिधान करून शोमरोनाच्या प्रवेशद्वाराजवळील खळ्याजवळ त्यांच्या सिंहासनांवर बसले होते आणि संदेष्टे त्यांच्यासमोर संदेश देत होते.
- 1 राजे २२:११सुमारे इ.स.पू. ८९७
तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह याने लोखंडाची शिंगे तयार केली होती आणि त्याने जाहीर केले, “याहवेह असे म्हणतात: ‘या शिंगांनी तू अरामी लोकांवर असा वार करशील की त्यांचा नाश होईल.’ ”
- 1 राजे २२:१२सुमारे इ.स.पू. ८९७
इतर सर्व संदेष्टे सुद्धा तीच भविष्यवाणी करीत होते, ते म्हणाले, “रामोथ-गिलआदवर हल्ला करून विजयी हो, कारण याहवेह ते राजाच्या हाती देणार आहे.”
- 1 राजे २२:१३सुमारे इ.स.पू. ८९७
जो दूत मिखायाहला बोलविण्यास गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्टे राजाच्या यशासंबंधी भविष्य सांगत आहेत, तुझे शब्द सुद्धा त्यांच्याशी सहमत होऊ दे आणि राजाच्या बाजूने चांगले बोल.”
- 1 राजे २२:१४सुमारे इ.स.पू. ८९७
पण मिखायाह म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, याहवेह मला जे काही सांगतील तेच मी त्याला सांगेन.”
- 1 राजे २२:१५सुमारे इ.स.पू. ८९७
तो जेव्हा आला, तेव्हा राजाने त्याला विचारले, “मिखायाह, आम्ही रामोथ गिलआदविरुद्ध युद्धास जावे किंवा नाही?” त्याने उत्तर दिले, “हल्ला करून विजयी व्हा, कारण याहवेह ते राजाच्या हाती देईल.”
- 1 राजे २२:१६सुमारे इ.स.पू. ८९७
राजाने त्याला म्हटले, “मी तुला किती वेळा शपथ देऊन सांगावे की याहवेहच्या नावाने तू मला केवळ जे सत्य तेच सांगावे?”
- 1 राजे २२:१७सुमारे इ.स.पू. ८९७
तेव्हा मिखायाहने उत्तर दिले, “सर्व इस्राएल लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे पर्वतांवर पांगलेले आहेत असे मला दिसले आणि याहवेह म्हणाले, ‘या लोकांना धनी नाही. प्रत्येकाला शांतीने आपआपल्या घरी जाऊ दे.’ ”
- 1 राजे २२:१८सुमारे इ.स.पू. ८९७
इस्राएलच्या राजाने यहोशाफाटला म्हटले, “हा माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही तर वाईटच संदेश देतो असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
- 1 राजे २२:१९सुमारे इ.स.पू. ८९७
मिखायाह पुढे म्हणाला, “तर आता याहवेहचे वचन ऐका: याहवेह आपल्या सिंहासनावर बसलेले आणि स्वर्गातील सर्व समुदाय त्यांच्या सभोवती डावीकडे व उजवीकडे उभा असलेला मला दिसला.
- 1 राजे २२:२०सुमारे इ.स.पू. ८९७
आणि याहवेहने म्हटले, ‘अहाबाने जाऊन रामोथ-गिलआदावर हल्ला करून तिथे मरून पडावे म्हणून त्याला कोण मोह घालेल?’ “तेव्हा एकाने एक तर दुसर्याने दुसरी मसलत दिली.
- 1 राजे २२:२१सुमारे इ.स.पू. ८९७
तेव्हा एक आत्मा पुढे आला आणि याहवेहपुढे उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोहात पाडेन.’