- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
- 1 राजे २२:४७सुमारे इ.स.पू. ९१४
त्यानंतर एदोमात राजा नव्हता; प्रांताधिकारी तेथील कारभार चालवित होता.
- 1 राजे २२:४८सुमारे इ.स.पू. ९१४
ओफीर शहरातून सोने आणता यावे म्हणून यहोशाफाटने व्यापारी जहाजे बांधली होती. पण ती एजिओन-गेबेर येथे फुटली, त्यामुळे ती समुद्राची वाटचाल करू शकली नाहीत.
- 1 राजे २२:४९सुमारे इ.स.पू. ९१४
तेव्हा अहाबाचा पुत्र अहज्याह यहोशाफाटला म्हणाला, “माझ्या माणसांना आपल्या माणसांबरोबर जाऊ द्या.” पण यहोशाफाटने त्यास नकार दिला.
- 1 राजे २२:५०सुमारे इ.स.पू. ८८९
त्यानंतर यहोशाफाट आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याबरोबर त्याचा पिता दावीदाच्या शहरात पुरले. आणि त्याचा पुत्र यहोराम त्याचा वारस म्हणून राजा झाला.
- 1 राजे २२:५१सुमारे इ.स.पू. ८९७
यहूदीयाचा राजा यहोशाफाटच्या राज्याच्या सतराव्या वर्षी अहाबाचा पुत्र अहज्याह हा शोमरोनात इस्राएलचा राजा झाला आणि त्याने इस्राएलवर दोन वर्षे राज्य केले.
- 1 राजे २२:५२सुमारे इ.स.पू. ८९७
याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, कारण त्याने ज्यांनी इस्राएलास पाप करावयाला भाग पाडले असा आपला पिता, आई व नेबाटाचा पुत्र यरोबोअम त्यांचे अनुसरण केले.
- 1 राजे २२:५३सुमारे इ.स.पू. ८९७
त्याने बआलची सेवा व उपासना केली आणि आपल्या पित्याप्रमाणे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला.
- 2 राजे १:१सुमारे इ.स.पू. ८९६
अहाब राजा मरण पावल्यानंतर मोआबाने इस्राएलविरुद्ध बंड केले.
- 2 राजे १:२सुमारे इ.स.पू. ८९६
अहज्याह, शोमरोन येथील आपल्या राजवाड्याच्या गच्चीवरून खाली पडून जखमी झाला होता. तेव्हा त्याने आपल्या दूतांना हे सांगून पाठविले, “जा आणि एक्रोनचे दैवत बाल-जबूबला विचारा की मी या दुखण्यातून बरा होईन की नाही.”
- 2 राजे १:३सुमारे इ.स.पू. ८९६
परंतु याहवेहच्या दूताने तिश्बी एलीयाहला निरोप देऊन म्हटले, “वर जा आणि शोमरोनाच्या राजाच्या दूतांना भेट आणि त्यांना विचार, ‘इस्राएलमध्ये परमेश्वर नाही की काय, म्हणून तुम्ही एक्रोनचे दैवत बाल-जबूब याला विचारावयास निघाले आहात?’
- 2 राजे १:४सुमारे इ.स.पू. ८९६
म्हणून याहवेह हे म्हणतात की: ‘ज्या अंथरुणावर तू पडला आहेस, त्यावरून तू उठणार नाही. तू खात्रीने मरशील!’ ” मग एलीयाह निघून गेला.
- 2 राजे १:५सुमारे इ.स.पू. ८९६
जेव्हा दूत राजाकडे परत गेले, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का परत आलात?”
- 2 राजे १:६सुमारे इ.स.पू. ८९६
त्यांनी उत्तर दिले, “वाटेत आम्हाला एक मनुष्य भेटण्यास आला, तो म्हणाला, ‘ज्या राजाने तुम्हाला पाठविले आहे त्याच्याकडे परत जा आणि त्याला सांगा, “याहवेहचा हा संदेश आहे: इस्राएलात परमेश्वर नाही म्हणून, तू एक्रोनच्या बाल-जबूब दैवताला प्रश्न विचारतोस? म्हणून तू ज्या अंथरुणावर पडून आहेस, त्या अंथरुणावरून उठणार नाहीस. तू खात्रीने मरशील!” ’ ”
- 2 राजे १:७सुमारे इ.स.पू. ८९६
राजाने त्यांना विचारले, “कोणत्या प्रकारचा हा व्यक्ती होता जो तुम्हाला भेटण्यास आला आणि हे तुम्हाला सांगितले?”
- 2 राजे १:८सुमारे इ.स.पू. ८९६
त्यांनी उत्तर दिले, “त्या मनुष्याने केसाळ झगा घातला होता आणि चामड्याचा कंबरपट्टा बांधलेला होता.” राजाने म्हटले, “मग तो एलीयाह तिश्बीच असला पाहिजे.”
- 2 राजे १:९सुमारे इ.स.पू. ८९६
नंतर राजाने आपल्या एका सेनाधिकार्याला पन्नास शिपायांसह एलीयाहकडे पाठविले. सेनाधिकारी एलीयाहकडे गेला जो एका डोंगराच्या शिखरांवर बसलेला होता आणि त्याला म्हणाला, “हे परमेश्वराच्या मनुष्या, राजाने आदेश दिला आहे, ‘खाली या!’ ”
- 2 राजे १:१०सुमारे इ.स.पू. ८९६
एलीयाहने सेनाधिकार्याला म्हटले, “जर मी खराच परमेश्वराचा मनुष्य असेन, तर स्वर्गातून अग्नी उतरो आणि तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो!” तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला आणि सेनाधिकार्यास व त्याच्या सर्व शिपायांना भस्म केले.
- 2 राजे १:११सुमारे इ.स.पू. ८९६
तेव्हा राजाने आणखी दुसर्या एका सेनाधिकार्यास पन्नास शिपायांसह एलीयाहकडे पाठविले. सेनाधिकारी त्याला म्हणाला, “हे परमेश्वराच्या मनुष्या, राजाने आदेश दिला आहे, ‘लवकर खाली उतरून या!’ ”
- 2 राजे १:१२सुमारे इ.स.पू. ८९६
एलीयाहने उत्तर दिले, “मी परमेश्वराचा मनुष्य असेन, तर स्वर्गातून अग्नी उतरो आणि तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो.” मग परमेश्वराचा अग्नी स्वर्गातून उतरला आणि त्याला व त्याच्या पन्नास माणसांना भस्म केले.
- 2 राजे १:१३सुमारे इ.स.पू. ८९६
यानंतर राजाने तिसर्या सेनाधिकार्यास त्याच्या पन्नास लोकांसोबत पाठविले. हा सेनाधिकारी वर गेला आणि एलीयाहपुढे गुडघे टेकून त्याला विनंती केली. “हे परमेश्वराच्या मनुष्या, तुमच्या दृष्टीत माझा जीव आणि या पन्नास माणसांचा, जे तुमचे सेवक आहेत त्यांचा जीव मोलवान असो!
- 2 राजे १:१४सुमारे इ.स.पू. ८९६
पाहा, स्वर्गातून अग्नी येऊन पहिल्या दोन्ही सेनाधिकार्यांना आणि त्यांच्या सर्व माणसांना भस्म केले. परंतु आता तुमच्या दृष्टीत माझा जीव मोलवान असो!”
- 2 राजे १:१५सुमारे इ.स.पू. ८९६
याहवेहच्या दूताने एलीयाहला म्हटले, “त्याला भिऊ नकोस, त्याच्यासोबत खाली जा.” तेव्हा एलीयाह उठला आणि त्याच्यासोबत राजाकडे गेला.
- 2 राजे १:१६सुमारे इ.स.पू. ८९६
एलीयाहने राजाला सांगितले, याहवेह हे म्हणतात: “इस्राएलात परमेश्वर नाही म्हणून, तू एक्रोनच्या बाल-जबूब दैवताला प्रश्न विचारण्यास दूत पाठविले होते काय? हे कृत्य केल्यामुळे तू या दुखण्यातून उठणार नाहीस; यातच तुला खात्रीने मरण येईल.”
- 2 राजे १:१७सुमारे इ.स.पू. ८९६
एलीयाहद्वारे याहवेहने भविष्य केल्याप्रमाणे अहज्याह मरण पावला. अहज्याहला पुत्र नव्हता म्हणून त्याचा भाऊ योराम राजा झाला. ही घटना यहूदीयाचा राजा यहोशाफाटचा पुत्र यहोरामच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी घडली.
- 2 राजे १:१८सुमारे इ.स.पू. ८९६
अहज्याहच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि जे काही त्याने केले ते इस्राएलांच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहून ठेवलेले नाही का?