- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
- 1 राजे १८:११सुमारे इ.स.पू. ९०६
परंतु आता आपण मला सांगता त्याला जाऊन सांग, ‘एलीयाह येथे आहे.’
- 1 राजे १८:१२सुमारे इ.स.पू. ९०६
मी तुम्हाला सोडून गेल्यावर याहवेहचा आत्मा तुम्हाला कुठे घेऊन जाईल हे मला ठाऊक नाही. पण जर मी जाऊन अहाबाला सांगितले आणि त्याला तुम्ही सापडला नाही, तर तो मला मारून टाकील. मी तर आपला सेवक, माझ्या बालपणापासून याहवेहची उपासना करीत आलो आहे.
- 1 राजे १८:१३सुमारे इ.स.पू. ९०६
ईजबेल राणी प्रभूच्या संदेष्ट्यांना मारत होती तेव्हा मी काय केले हे तुम्ही ऐकले नाही काय? एका गुहेत पन्नास असे शंभर याहवेहच्या संदेष्ट्यांना मी दोन गुहांमध्ये लपविले आणि त्यांना अन्नपाणी पुरविले.
- 1 राजे १८:१४सुमारे इ.स.पू. ९०६
आणि आता तुम्ही मला म्हणता, जाऊन माझ्या धन्याला मी सांगावे, ‘एलीयाह येथे आहे,’ तो मला मारून टाकील!”
- 1 राजे १८:१५सुमारे इ.स.पू. ९०६
एलीयाह म्हणाला, “ज्या सर्वसमर्थ याहवेहची मी सेवा करतो त्या जिवंत परमेश्वराची शपथ, आज मी खचितच अहाबासमोर हजर होईन.”
- 1 राजे १८:१६सुमारे इ.स.पू. ९०६
तेव्हा ओबद्याह अहाबाला भेटायला गेला आणि त्याला सांगितले आणि अहाब एलीयाहला भेटायला गेला.
- 1 राजे १८:१७सुमारे इ.स.पू. ९०६
एलीयाहला पाहताच अहाब म्हणाला, “इस्राएलची छळणूक करणारा तो तूच आहेस काय?”
- 1 राजे १८:१८सुमारे इ.स.पू. ९०६
एलीयाहने उत्तर दिले, “इस्राएलला छळणारा मी नाही, तर तू व तुझ्या पित्याचे घराणे आहे. तुम्ही याहवेहच्या आज्ञा पाळण्याचे सोडून बआलाचे अनुसरण केले आहे.
- 1 राजे १८:१९सुमारे इ.स.पू. ९०६
आता सर्व इस्राएली लोकांना माझ्यासमोर कर्मेल डोंगरावर बोलावून घे. आणि जे ईजबेलच्या मेजावर भोजन करतात असे बआलाचे चारशे पन्नास संदेष्टे व अशेराचे चारशे संदेष्टे, त्यांनाही बोलावून घे.”
- 1 राजे १८:२०सुमारे इ.स.पू. ९०६
म्हणून अहाबाने सर्व इस्राएली लोकांना बोलाविणे पाठवले आणि संदेष्ट्यांना कर्मेल डोंगरावर जमविले.
- 1 राजे १८:२१सुमारे इ.स.पू. ९०६
एलीयाह लोकांच्या समोर जाऊन म्हणाला, “दोन मतांमध्ये तुम्ही कुठवर डगमगत राहणार? जर याहवेह हेच परमेश्वर आहे तर त्यांचे अनुसरण करा; परंतु जर बआल परमेश्वर आहे तर त्याला अनुसरा.” परंतु लोक काही बोलले नाही.
- 1 राजे १८:२२सुमारे इ.स.पू. ९०६
मग एलीयाह त्यांना म्हणाला, “याहवेहचा संदेष्टा म्हणून मी एकटाच उरलो आहे, परंतु बआलाचे तर चारशे पन्नास संदेष्टे आहेत.
- 1 राजे १८:२३सुमारे इ.स.पू. ९०६
आमच्यासाठी दोन बैल आणा. त्यातील एक बआलच्या संदेष्ट्यांनी त्यांच्यासाठी निवडावा आणि त्याचे तुकडे कापून ते लाकडांवर ठेवावे परंतु त्याला अग्नी लावू नये. मी दुसरा बैल तयार करेन आणि लाकडांवर ठेवेन आणि ते पेटविणार नाही.
- 1 राजे १८:२४सुमारे इ.स.पू. ९०६
मग तुम्ही तुमच्या देवाचा धावा करा, आणि मी माझ्या याहवेहचा धावा करेन. मग जो देव अग्नीद्वारे उत्तर देईल; तोच खरा परमेश्वर.” मग लोक म्हणाले, “तू जे बोलतो ते बरोबर आहे.”
- 1 राजे १८:२५सुमारे इ.स.पू. ९०६
एलीयाह बआलच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “प्रथम तुम्ही बैल निवडून घ्या आणि तो तयार करा, कारण तुम्ही संख्येने अधिक आहात. तुमच्या देवाचा धावा करा, परंतु अग्नी लावू नये.”
- 1 राजे १८:२६सुमारे इ.स.पू. ९०६
म्हणून त्यांना दिलेला बैल घेऊन त्यांनी तयार केला. मग त्यांनी सकाळपासून मध्यान्हापर्यंत बआलच्या नावाचा धावा केला. आणि ओरडत म्हणाले, “हे बआला, आम्हाला उत्तर दे!” परंतु काही प्रत्युत्तर आले नाही; कोणीही उत्तर दिले नाही. आणि जी वेदी त्यांनी केली होती त्याभोवती ते नाचत होते.
- 1 राजे १८:२७सुमारे इ.स.पू. ९०६
मध्यान्हाच्या वेळी एलीयाह त्यांची थट्टा करीत म्हणू लागला, “अधिक मोठ्याने ओरडा, खचित तो देव आहे! कदाचित तो विचारात गढून गेला असेल किंवा व्यस्त किंवा प्रवास करीत असेल किंवा झोपला असेल आणि त्याला जागे केले पाहिजे.”
- 1 राजे १८:२८सुमारे इ.स.पू. ९०६
म्हणून ते मोठ्याने ओरडू लागले आणि त्यांच्या प्रथेप्रमाणे तलवारी व भाल्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत स्वतःला घाव करू लागले.
- 1 राजे १८:२९सुमारे इ.स.पू. ९०६
दुपार सरून गेली आणि संध्याकाळच्या यज्ञाच्या वेळेपर्यंत ते अजूनही वेड्यासारखे भविष्यवाणी करीत होते. परंतु काहीही प्रत्युत्तर आले नाही, कोणी काही बोलले नाही, कोणी लक्ष दिले नाही.
- 1 राजे १८:३०सुमारे इ.स.पू. ९०६
तेव्हा एलीयाह सर्व लोकांना म्हणाला, “माझ्याजवळ या.” ते त्याच्याकडे आले आणि त्याने याहवेहची जी वेदी मोडून गेली होती ती दुरुस्त केली.
- 1 राजे १८:३१सुमारे इ.स.पू. ९०६
“तुझे नाव इस्राएल असणार” असे याहवेहने ज्या याकोबाला म्हटले होते त्याच्या वंशजांच्या बारा गोत्रांइतके एलीयाहने बारा धोंडे घेतले.
- 1 राजे १८:३२सुमारे इ.स.पू. ९०६
त्या धोंड्यांनी त्याने याहवेहच्या नावाने वेदी बांधली आणि वेदीभोवती दोन सिआह बीज मावेल इतकी मोठी खळगी खणली.
- 1 राजे १८:३३सुमारे इ.स.पू. ९०६
त्याने लाकडे रचली, बैल कापून त्याचे तुकडे केले आणि त्या लाकडांवर रचले. मग तो त्यांना म्हणाला, “चार मोठ्या घागरी पाण्याने भरा आणि ते यज्ञावर व लाकडांवर ओता.”
- 1 राजे १८:३४सुमारे इ.स.पू. ९०६
तो म्हणाला, “पुन्हा असेच करा.” आणि त्यांनी पुन्हा केले. त्याने आदेश दिला, “तिसर्यांदा असेच करा,” आणि त्यांनी तिसर्यांदाही होमार्पणावर पाणी टाकले.
- 1 राजे १८:३५सुमारे इ.स.पू. ९०६
पाणी वेदीवरून खाली वाहू लागले आणि खळगी सुद्धा पाण्याने भरली.