मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 राजे १६:१९सुमारे इ.स.पू. ९२९

    कारण याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करून त्याने पाप केले आणि यरोबोअमचे अनुसरण करीत त्याने जी पापे केली, ती केली व इस्राएली लोकांना सुद्धा ती पापे करावयाला भाग पाडले.

  2. 1 राजे १६:२०सुमारे इ.स.पू. ९२९

    जिम्रीच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने केलेली बंडखोरी, इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत की नाही?

  3. 1 राजे १६:२१सुमारे इ.स.पू. ९२९

    आता इस्राएली लोक दोन भागात विभागले गेले; अर्ध्या लोकांनी गीनाथचा पुत्र तिबनी याला पाठिंबा दिला, तर अर्ध्यांनी ओमरीला राजा होण्यासाठी पाठिंबा दिला.

  4. 1 राजे १६:२२सुमारे इ.स.पू. ९२९

    परंतु गीनाथचा पुत्र तिबनी याच्या समर्थकांपेक्षा ओमरीचे समर्थक अधिक प्रबळ झाले; म्हणून तिबनी मेला व ओमरी राजा झाला.

  5. 1 राजे १६:२३सुमारे इ.स.पू. ९२५

    यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या एकतिसाव्या वर्षी ओमरी इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने बारा वर्षे राज्य केले, त्यापैकी सहा वर्षे तिरजाह येथे राज्य केले.

  6. 1 राजे १६:२४सुमारे इ.स.पू. ९२५

    त्याने शेमेर नावाच्या व्यक्तीकडून शोमरोन डोंगर चांदीचे दोन तालांत देऊन विकत घेतले आणि त्या डोंगरावर नगर बांधले व त्या डोंगराचा आधीचा मालक शेमेर याच्या नावानुसार शोमरोन असे नाव दिले.

  7. 1 राजे १६:२५सुमारे इ.स.पू. ९२५

    पण ओमरीने सुद्धा याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले आणि त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्यांपेक्षा अधिक पाप केले.

  8. 1 राजे १६:२६सुमारे इ.स.पू. ९२५

    त्याने पूर्णपणे नेबाटाचा पुत्र यरोबोअमचे अनुसरण केले होते, यरोबोअमने इस्राएली लोकांना जी पापे करावयाला भाग पाडले, ती त्याने केली आणि त्यांनी त्यांच्या व्यर्थ मूर्तींमुळे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला.

  9. 1 राजे १६:२७सुमारे इ.स.पू. ९२५

    ओमरीच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने केलेल्या गोष्टी व त्याची यशप्राप्ती इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत की नाही?

  10. 1 राजे १६:२८सुमारे इ.स.पू. ९२५

    ओमरी आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला शोमरोनात पुरले गेले. आणि त्याचा पुत्र अहाब त्याचा वारस म्हणून राजा झाला.

  11. 1 राजे १६:२९सुमारे इ.स.पू. ९१८

    यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या अडतिसाव्या वर्षी ओमरीचा पुत्र अहाब इस्राएलवर राज्य करू लागला. त्याने शोमरोन येथे इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले.

  12. 1 राजे १६:३०सुमारे इ.स.पू. ९१८

    ओमरीचा पुत्र अहाबाने त्याच्या आधी होऊन गेलेल्यांपेक्षा याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

  13. 1 राजे १६:३१सुमारे इ.स.पू. ९१८

    नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या पापांना क्षुल्लक समजून त्याचे अनुसरण केले; इतकेच नाही, तर त्याने सीदोनी राजा एथबालची कन्या ईजबेल हिच्याशी विवाह केला आणि बआलची सेवा व उपासना करू लागला.

  14. 1 राजे १६:३२सुमारे इ.स.पू. ९१८

    शोमरोनात त्याने बआलासाठी जे मंदिर बांधले होते त्यात बआलासाठी एक वेदी उभारली.

  15. 1 राजे १६:३३सुमारे इ.स.पू. ९१८

    अहाबाने अशेरा देवीचे स्तंभही उभारले आणि असे करून त्याच्या आधी होऊन गेलेल्या राजांपेक्षा याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या क्रोधाला अधिक भडकाविले.

  16. 1 राजे १६:३४सुमारे इ.स.पू. ९१८

    अहाबाच्या काळात, बेथेलचा हिएल याने यरीहोची पुनर्बांधणी केली. त्याने त्याचा पाया घातला, तेव्हा त्याचा प्रथमपुत्र अबीराम मरण पावला आणि जेव्हा त्याची फाटके उभारली तेव्हा त्याचा सर्वात धाकटा पुत्र सगूब मरण पावला; नूनाचा पुत्र यहोशुआच्या द्वारे याहवेहने सांगितलेल्या वचनानुसार हे सर्व घडले.

  17. 1 राजे १७:१सुमारे इ.स.पू. ९१०

    गिलआद येथील तिश्बे नगरातील उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीयाह तिश्बे अहाबाला म्हणाला, “याहवेह, इस्राएलचे जिवंत परमेश्वर ज्यांची मी सेवा करतो त्यांची शपथ, मी सांगितल्याशिवाय येणार्‍या काही वर्षांमध्ये दहिवर किंवा पाऊस पडणार नाही.”

  18. 1 राजे १७:२सुमारे इ.स.पू. ९१०

    तेव्हा याहवेहचे वचन एलीयाहकडे आले:

  19. 1 राजे १७:३सुमारे इ.स.पू. ९१०

    “येथून निघून पूर्वेकडे जा आणि यार्देनेच्या पूर्वेस केरीथ ओहळाकडे लपून राहा.

  20. 1 राजे १७:४सुमारे इ.स.पू. ९१०

    त्या ओहळाचे पाणी तू पी आणि तुला अन्न पुरवावे म्हणून मी कावळ्यांना आज्ञा दिली आहे.”

  21. 1 राजे १७:५सुमारे इ.स.पू. ९१०

    म्हणून याहवेहने त्याला जे सांगितले त्याप्रमाणे त्याने केले. तो पूर्वेला यार्देनेच्या केरीथ ओहळाकडे जाऊन तिथे राहिला.

  22. 1 राजे १७:६सुमारे इ.स.पू. ९१०

    सकाळी आणि संध्याकाळी कावळे त्याच्यासाठी भाकर आणि मांस आणून देत असत आणि तो त्या ओहळाचे पाणी पीत असे.

  23. 1 राजे १७:७सुमारे इ.स.पू. ९०९

    काही काळानंतर ओहोळ आटून गेला, कारण देशात पाऊस नव्हता.

  24. 1 राजे १७:८सुमारे इ.स.पू. ९०९

    मग याहवेहचे वचन एलीयाहकडे आले:

  25. 1 राजे १७:९सुमारे इ.स.पू. ९०९

    “सीदोनजवळच्या सारेफथ नगराकडे जा आणि तिथे राहा. तिथे मी एका विधवेला आज्ञा दिली आहे की तिने तुला अन्नपुरवठा करावा.”