मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 राजे १५:२८सुमारे इ.स.पू. ९५४

    यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बाशाने नादाबला ठार केले व तो स्वतः त्याच्या जागी राजा झाला.

  2. 1 राजे १५:२९सुमारे इ.स.पू. ९५४

    त्याच्या राज्याच्या सुरुवातीलाच, त्याने यरोबोअमच्या संपूर्ण घराण्याला मारून टाकले, याहवेहचा सेवक शिलोनी अहीयाहच्या वचनानुसार त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही, सर्वांचा नाश केला.

  3. 1 राजे १५:३०सुमारे इ.स.पू. ९५४

    जी पापे यरोबोअमने केली आणि इस्राएली लोकांना देखील करावयाला लावली आणि त्याने याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा राग भडकाविला म्हणून हे सगळे घडले.

  4. 1 राजे १५:३१सुमारे इ.स.पू. ९५४

    नादाबच्या राज्याच्या इतर घटना, आणि जे सर्वकाही त्याने केले ते इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या गेल्या नाहीत काय?

  5. 1 राजे १५:३२सुमारे इ.स.पू. ९५३

    यहूदीयाचा राजा आसा व इस्राएलचा राजा बाशा यांच्यात त्यांच्या आयुष्यभर युद्ध होत राहिले.

  6. 1 राजे १५:३३सुमारे इ.स.पू. ९५३

    यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी अहीयाहचा पुत्र बाशा हा तिरजाह येथे इस्राएलचा राजा झाला. त्याने चोवीस वर्षे राज्य केले.

  7. 1 राजे १५:३४सुमारे इ.स.पू. ९५३

    याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. त्याने यरोबोअमच्या मार्गाचे अनुसरण करून जी पापे त्याने इस्राएलास करण्यास लावले, तीच पापे बाशानेही केली.

  8. 1 राजे १६:१सुमारे इ.स.पू. ९३१

    हनानीचा पुत्र येहूकडे बाशासंबंधी याहवेहचे जे वचन आले ते हे:

  9. 1 राजे १६:२सुमारे इ.स.पू. ९३१

    “मी तुला धुळीतून उचलून माझ्या इस्राएली लोकांवर अधिकारी नेमले, परंतु तू यरोबोअमचा मार्ग अनुसरला आहेस व माझ्या इस्राएली लोकांना पाप करावयाला भाग पाडले आणि त्यांच्या पापामुळे माझा क्रोध भडकविला आहे.

  10. 1 राजे १६:३सुमारे इ.स.पू. ९३१

    म्हणून मी बाशा व त्याच्या घराण्याला नाहीसे करेन आणि मी तुझ्या घराण्याला नेबाटाचा पुत्र यरोबोअम याच्या घराण्यासारखे करेन.

  11. 1 राजे १६:४सुमारे इ.स.पू. ९३१

    बाशाच्या मालकीचा जो कोणी शहरात मरेल त्यांना कुत्रे खातील आणि जे शहराच्या बाहेर मरतील त्यांना पक्षी खातील.”

  12. 1 राजे १६:५सुमारे इ.स.पू. ९५३

    बाशाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने केलेली कृत्ये व त्याची यशप्राप्ती, इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत की नाही?

  13. 1 राजे १६:६सुमारे इ.स.पू. ९३०

    बाशा त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला तिरजाह येथे पुरले गेले. त्याचा पुत्र एलाह त्याचा वारस म्हणून राजा झाला.

  14. 1 राजे १६:७सुमारे इ.स.पू. ९३०

    त्याचप्रमाणे, हनानीचा पुत्र येहू संदेष्ट्याच्या द्वारे याहवेहचे जे वचन बाशा व त्याच्या घराण्याकडे आले, कारण त्याने याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले व त्याने केलेल्या कृत्यांमुळे याहवेहचा क्रोध भडकविला, त्यामुळे यरोबोअमच्या घराण्यासारखे त्याचे झाले; आणि त्याचा नाश झाला.

  15. 1 राजे १६:८सुमारे इ.स.पू. ९२९

    यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या सव्विसाव्या वर्षी, बाशाचा पुत्र एलाह तिरजाह येथे इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने दोन वर्षे राज्य केले.

  16. 1 राजे १६:९सुमारे इ.स.पू. ९२९

    जिम्री, जो त्याच्या अधिकार्‍यांपैकी एक होता, जो त्याच्या निम्म्या रथांचा सेनापती होता, त्याने त्याच्याविरुद्ध कट रचला. एलाह त्यावेळी तिरजाह येथे, राजवाड्याचा अधिकारी अरजाच्या तिरजाह येथील घरी मद्यधुंद झाला होता.

  17. 1 राजे १६:१०सुमारे इ.स.पू. ९२९

    तेव्हा जिम्री आत आला व त्याच्यावर वार करून त्याला मारून टाकले आणि त्याचा उत्तराधिकारी म्हणून राजा झाला. यहूदीयाचा राजा आसाच्या सत्ताविसाव्या वर्षी असे झाले.

  18. 1 राजे १६:११सुमारे इ.स.पू. ९२९

    तो राजा झाला व राजासनावर बसताच, त्याने बाशाच्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकले. कोणीही पुरुष, नातेवाईक किंवा मित्र त्याने जिवंत सोडला नाही.

  19. 1 राजे १६:१२सुमारे इ.स.पू. ९२९

    याप्रकारे बाशाविरुद्ध याहवेहचे जे वचन येहू संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले गेले होते त्यानुसार, जिम्रीने बाशाच्या संपूर्ण घराण्याचा नाश केला;

  20. 1 राजे १६:१३सुमारे इ.स.पू. ९२९

    कारण बाशाने व त्याचा पुत्र एलाहनी जी पापे केली आणि इस्राएली लोकांना देखील ती पापे करावयाला भाग पाडले होते, म्हणून त्यांनी त्यांच्या व्यर्थ मूर्तींमुळे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला होता.

  21. 1 राजे १६:१४सुमारे इ.स.पू. ९२९

    एलाहच्या कारकिर्दीच्या इतर घटना आणि त्याने जे काही केले, ते इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या नाहीत काय?

  22. 1 राजे १६:१५सुमारे इ.स.पू. ९२९

    यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी जिम्रीने तिरजाह येथे इस्राएलवर सात दिवस राज्य केले. सैन्याने पलिष्ट्यांच्या हद्दीतील गिब्बथोन नगराजवळ छावणी दिली होती.

  23. 1 राजे १६:१६सुमारे इ.स.पू. ९२९

    जिम्रीने राजाविरुद्ध कट करून त्याला ठार मारले असे जेव्हा छावणीतील इस्राएली सैन्याने ऐकले, तेव्हा त्यांनी त्याच दिवशी सेनापती ओमरीला इस्राएलचा राजा म्हणून छावणीतच घोषित केले.

  24. 1 राजे १६:१७सुमारे इ.स.पू. ९२९

    तेव्हा ओमरी व त्याच्या बरोबरच्या इस्राएली लोकांनी गिब्बथोन सोडून तिरजाह नगराला वेढा दिला.

  25. 1 राजे १६:१८सुमारे इ.स.पू. ९२९

    शहर हस्तगत झाले आहे असे जेव्हा जिम्रीने पाहिले, तेव्हा तो राजवाड्याच्या किल्ल्यात गेला आणि त्यात स्वतःभोवती आग लावली आणि तो मेला.