मुख्य मजकुरावर जा

circa 1050–1010 BC

Samuel & King Saul

Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.

810 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. 1 शमुवेल ८:१९सुमारे इ.स.पू. १११२

    परंतु लोकांनी शमुवेलाचे ऐकण्यास नकार दिला. “नाही!” ते म्हणाले, “आम्हाला आमच्यावर राजा पाहिजेच.

  2. 1 शमुवेल ८:२०सुमारे इ.स.पू. १११२

    म्हणजे आम्ही इतर सर्व राष्ट्रांसारखे होऊ, आमचा राजा आमचे नेतृत्व करेल आणि आमच्यासाठी युद्ध करण्यास आमच्यापुढे जाईल.”

  3. 1 शमुवेल ८:२१सुमारे इ.स.पू. १११२

    लोक जे म्हणाले ते सर्व शमुवेलाने ऐकले व तेच त्याने याहवेहला सांगितले.

  4. 1 शमुवेल ८:२२सुमारे इ.स.पू. १११२

    याहवेहने उत्तर दिले, “त्यांचे ऐकून घे आणि त्यांना एक राजा नेमून दे.” नंतर शमुवेल इस्राएल लोकांना म्हणाले, “तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या नगराकडे परत जा.”

  5. 1 शमुवेल ९:१सुमारे इ.स.पू. १०९५

    बिन्यामीन वंशातील एक मनुष्य होता, त्याचे नाव कीश होते, तो अबीएलचा पुत्र होता, तो सरोराचा पुत्र, तो बेकोराथचा पुत्र, तो अफियाचा पुत्र होता. तो बिन्यामीन घराण्यातील असून सन्माननीय मनुष्य होता.

  6. 1 शमुवेल ९:२सुमारे इ.स.पू. १०९५

    कीशला शौल नावाचा एक पुत्र होता, त्याच्यासारखा देखणा तरुण पुरुष इस्राएलमध्ये कोणीही नव्हता आणि तो सर्वांपेक्षा उंच होता.

  7. 1 शमुवेल ९:३सुमारे इ.स.पू. १०९५

    शौलाचा पिता कीशची गाढवे हरवली होती आणि कीश त्याचा पुत्र शौलास म्हणाला, “सेवकांपैकी एकाला तुझ्याबरोबर घेऊन जा आणि गाढवांचा शोध कर.”

  8. 1 शमुवेल ९:४सुमारे इ.स.पू. १०९५

    तेव्हा तो एफ्राईमच्या संपूर्ण डोंगराळ प्रदेशात आणि शलीशाह भागाच्या सभोवती फिरला, परंतु त्यांना ते सापडले नाहीत. ते तसेच पुढे शालीम प्रांतात गेले, परंतु गाढवे तिथेही नव्हती. नंतर तो बिन्यामीनच्या हद्दीतून फिरला परंतु त्यांना ते सापडले नाहीत.

  9. 1 शमुवेल ९:५सुमारे इ.स.पू. १०९५

    जेव्हा ते सूफ प्रांतात पोहोचले, तेव्हा शौल त्याच्याबरोबर असलेल्या सेवकाला म्हणाला, “चल, आपण परत जाऊ या, नाहीतर माझा पिता गाढवांचा विचार करण्याचे सोडून आपलीच काळजी करू लागेल.”

  10. 1 शमुवेल ९:६सुमारे इ.स.पू. १०९५

    परंतु सेवक म्हणाला, “पाहा, या शहरात परमेश्वराचा एक मनुष्य आहे; तो फार सन्माननीय आहे आणि जे काही तो सांगतो ते खरे होते. तर चल, आपण तिकडे जाऊ. कदाचित आपण कोणत्या मार्गाने जावे ते तो आपल्याला सांगेल.”

  11. 1 शमुवेल ९:७सुमारे इ.स.पू. १०९५

    शौल त्याच्या सेवकाला म्हणाला, “जर आपण जात आहोत, तर आपण त्याला काय द्यावे? आपल्या पिशवीतील खाद्य तर संपले आहे. परमेश्वराच्या मनुष्याला देण्यासाठी आपल्याकडे काही बक्षीस नाही. आपल्याकडे काय आहे?”

  12. 1 शमुवेल ९:८सुमारे इ.स.पू. १०९५

    तो सेवक पुन्हा शौलाला म्हणाला, “पाहा, माझ्याजवळ पाव शेकेल चांदी आहे. मी ते परमेश्वराच्या मनुष्याला देईन म्हणजे आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपल्याला सांगेल.”

  13. 1 शमुवेल ९:९सुमारे इ.स.पू. १०९५

    त्याकाळी इस्राएलमध्ये जर कोणी परमेश्वराविषयी चौकशी करण्यास गेला तर ते म्हणत असत, “चला, आपण पाहणार्‍याकडे जाऊ,” कारण आज ज्याला संदेष्टा म्हणतात त्याला पाहणारा असे संबोधले जाई.

  14. 1 शमुवेल ९:१०सुमारे इ.स.पू. १०९५

    “ठीक आहे,” शौल त्याच्या सेवकाला म्हणाला, “चल, जाऊ या.” असे म्हणत ज्या नगरात परमेश्वराचा मनुष्य राहत होता त्याकडे ते निघाले.

  15. 1 शमुवेल ९:११सुमारे इ.स.पू. १०९५

    जसे ते डोंगर चढून त्या गावाकडे जात होते, त्यांना काही तरुणी भेटल्या ज्या पाणी काढण्यासाठी बाहेर पडल्या होत्या आणि त्यांनी त्यांना विचारले, “येथे कोणी संदेष्टा आहे काय?”

  16. 1 शमुवेल ९:१२सुमारे इ.स.पू. १०९५

    “होय तो आहे,” त्यांनी उत्तर दिले. “तो तुमच्यापुढेच जात आहे. आता घाई करा; तो आजच आमच्या गावात आला आहे, कारण लोक उच्च स्थानावर यज्ञ करणार आहेत.

  17. 1 शमुवेल ९:१३सुमारे इ.स.पू. १०९५

    तुम्ही शहरामध्ये प्रवेश करताच उंच टेकड्यावर भोजन करण्यास जाण्याआधी तो तुम्हाला सापडेल. तो येईपर्यंत लोक भोजन करीत नाहीत, कारण त्याने यज्ञाला आशीर्वाद दिल्यानंतरच, ज्यांना आमंत्रित केले आहे ते भोजन करतील. आता वर जा; आताच तो तुम्हाला सापडेल.”

  18. 1 शमुवेल ९:१४सुमारे इ.स.पू. १०९५

    ते वर नगरापर्यंत गेले आणि जसे ते त्यात प्रवेश करीत होते, तिथे शमुवेल होता, तो उंच टेकड्यावर जात असताना ते शौलाच्या दिशेने येत होते.

  19. 1 शमुवेल ९:१५सुमारे इ.स.पू. १०९५

    शौल येण्याच्या एक दिवस आधी याहवेहने शमुवेलला हे प्रकट केले होते:

  20. 1 शमुवेल ९:१६सुमारे इ.स.पू. १०९५

    “याच वेळेस उद्या मी तुझ्याकडे बिन्यामीनच्या प्रदेशातील एक मनुष्य पाठवेन. माझ्या इस्राएली लोकांवर शासनकर्ता म्हणून त्याचा अभिषेक कर; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवेल. मी माझ्या लोकांकडे पाहिले आहे, कारण त्यांचा आकांत माझ्यापर्यंत पोहोचला आहे.”

  21. 1 शमुवेल ९:१७सुमारे इ.स.पू. १०९५

    जेव्हा शौल शमुवेलाच्या दृष्टीस पडला, याहवेह त्याला म्हणाले, “हाच मनुष्य आहे, ज्याच्या विषयी मी तुला सांगितले होते; तो माझ्या लोकांवर शासन करेल.”

  22. 1 शमुवेल ९:१८सुमारे इ.स.पू. १०९५

    शौलाने नगराच्या प्रवेशद्वारातच शमुवेलकडे जाऊन विचारले, “संदेष्ट्याचे घर कुठे आहे हे मला कृपा करून सांगाल काय?”

  23. 1 शमुवेल ९:१९सुमारे इ.स.पू. १०९५

    “मीच पाहाणारा आहे,” शमुवेलने शौलास उत्तर दिले. “माझ्यापुढे वर उंचस्थानी जा, कारण आज तुला माझ्याबरोबर भोजन करावयाचे आहे आणि सकाळी मी तुला तुझ्या मार्गाने पाठवून देईन आणि जे तुझ्या अंतःकरणात आहे ते मी तुला सांगेन.

  24. 1 शमुवेल ९:२०सुमारे इ.स.पू. १०९५

    आणि तुझी जी गाढवे तीन दिवसांपूर्वी हरवली होती, त्यांची काळजी करू नकोस; ती सापडली आहेत. इस्राएलची सर्व इच्छा कोणाकडे वळली आहे, तुझ्याकडे व तुझ्या संपूर्ण कुटुंबाकडे ती वळली नाही काय?”

  25. 1 शमुवेल ९:२१सुमारे इ.स.पू. १०९५

    शौलाने उत्तर दिले, “परंतु मी बिन्यामीन गोत्र जे इस्राएलचे सर्वात लहान, त्यातील नाही काय आणि माझे कूळ बिन्यामीनच्या गोत्रातील सर्वात लहान कूळ नाही काय? तर मग तुम्ही मला असे का बोलत आहात?”