मुख्य मजकुरावर जा

circa 1050–1010 BC

Samuel & King Saul

Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.

810 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. 1 शमुवेल १०:२०सुमारे इ.स.पू. १०९५

    जेव्हा शमुवेलने सर्व इस्राएलला त्यांच्या गोत्राप्रमाणे पुढे आणले, बिन्यामीन गोत्राची चिठ्ठी निघाली.

  2. 1 शमुवेल १०:२१सुमारे इ.स.पू. १०९५

    नंतर त्याने बिन्यामीन गोत्राला कुळानुसार पुढे आणले आणि मात्रीच्या कुळाची चिठ्ठी निघाली. शेवटी कीशाचा पुत्र शौल याची निवड झाली. परंतु जेव्हा त्यांनी त्याचा शोध केला, तेव्हा तो कुठेच सापडला नाही.

  3. 1 शमुवेल १०:२२सुमारे इ.स.पू. १०९५

    तेव्हा त्यांनी याहवेहला विचारले, “तो मनुष्य येथे आला आहे काय?” आणि याहवेह म्हणाले, “होय, त्याने स्वतःला सामानामध्ये लपविले आहे.”

  4. 1 शमुवेल १०:२३सुमारे इ.स.पू. १०९५

    तेव्हा त्यांनी पळत जाऊन त्याला बाहेर आणले आणि तो लोकांमध्ये उभा राहिला, तेव्हा सर्व लोक त्याच्या खांद्यापर्यंतच होते.

  5. 1 शमुवेल १०:२४सुमारे इ.स.पू. १०९५

    शमुवेल सर्व लोकांस म्हणाला, “याहवेहने निवडलेल्या या मनुष्याला तुम्ही पाहत आहात काय? सर्व लोकांमध्ये त्याच्यासारखा कोणीही नाही.” तेव्हा लोकांनी मोठ्याने घोषणा दिली, “राजा चिरायू होवो!”

  6. 1 शमुवेल १०:२५सुमारे इ.स.पू. १०९५

    शमुवेलने राजपदाचे हक्क आणि कर्तव्ये लोकांना समजावून सांगितली. त्याने ती एका चर्मपत्राच्या गुंडाळीवर लिहून ठेवली आणि ती याहवेहसमोर ठेवली. नंतर शमुवेलने लोकांना आपआपल्या घरी पाठवून दिले.

  7. 1 शमुवेल १०:२६सुमारे इ.स.पू. १०९५

    शौलसुद्धा ज्यांच्या हृदयास परमेश्वराने स्पर्श केला होता अशा शूर पुरुषांबरोबर गिबियाह येथे आपल्या घरी गेला.

  8. 1 शमुवेल १०:२७सुमारे इ.स.पू. १०९५

    परंतु काही अधर्मी लोक म्हणाले, “हा मनुष्य आमचा काय उद्धार करणार?” त्यांनी त्याला तुच्छ मानले आणि त्याच्यासाठी भेटी आणल्या नाहीत. परंतु शौल शांत राहिला.

  9. 1 शमुवेल ११:१सुमारे इ.स.पू. १०९५

    अम्मोनी नाहाशने जाऊन याबेश-गिलआदला वेढा घातला. याबेशचे सर्व पुरुष त्याला म्हणाले, “आमच्यासह एक करार कर, म्हणजे आम्ही प्रजा होऊन तुमची सेवा करू.”

  10. 1 शमुवेल ११:२सुमारे इ.स.पू. १०९५

    परंतु अम्मोनी नाहाश म्हणाला, “मी एकाच अटीवर तुमच्याशी करार करेन की मी तुम्हा प्रत्येकाचा उजवा डोळा फोडून संपूर्ण इस्राएलवर अप्रतिष्ठा आणेन.”

  11. 1 शमुवेल ११:३सुमारे इ.स.पू. १०९५

    याबेशचे वडीलजन त्याला म्हणाले, “आम्हाला सात दिवसांचा अवकाश दे म्हणजे आम्ही संपूर्ण इस्राएलमध्ये निरोप पाठवू; जर आमची सुटका करण्यासाठी कोणी आला नाही तर आम्ही तुला स्वाधीन होऊ.”

  12. 1 शमुवेल ११:४सुमारे इ.स.पू. १०९५

    जेव्हा निरोप्यांनी शौलाच्या गिबियाह येथे जाऊन तेथील लोकांस हे वर्तमान दिले, तेव्हा त्या सर्वांनी मोठ्याने आकांत केला.

  13. 1 शमुवेल ११:५सुमारे इ.स.पू. १०९५

    त्याचवेळेस शौल त्याच्या बैलांमागून शेतातून परत येत होता, त्याने विचारले, “प्रत्येकाला काय झाले आहे? ते का रडत आहेत?” तेव्हा याबेशाच्या लोकांनी जे काही सांगितले होते ते त्यांनी त्याला सांगितले.

  14. 1 शमुवेल ११:६सुमारे इ.स.पू. १०९५

    जेव्हा शौलाने त्यांचे शब्द ऐकले, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने आला आणि तो क्रोधाने पेटला.

  15. 1 शमुवेल ११:७सुमारे इ.स.पू. १०९५

    त्याने बैलाची एक जोडी कापून त्यांचे तुकडे केले आणि निरोप्यांच्या हाती ते तुकडे सर्व इस्राएलमध्ये पाठविले आणि जाहीर केले, “जे कोणी शौल आणि शमुवेल यांचे अनुसरण करणार नाही, त्यांच्या बैलांचे असेच केले जाईल.” तेव्हा लोकांना याहवेहचे भय वाटू लागले आणि ते एकजूट होऊन बाहेर आले.

  16. 1 शमुवेल ११:८सुमारे इ.स.पू. १०९५

    बेजेक येथे शौलाने त्यांची मोजणी केली, तेव्हा ते तीन लाख इस्राएली पुरुष होते आणि यहूदाहचे तीस हजार पुरुष होते.

  17. 1 शमुवेल ११:९सुमारे इ.स.पू. १०९५

    जे निरोप घेऊन आले होते त्यांना त्यांनी सांगितले, “याबेश-गिलआदच्या पुरुषांना सांगा, ‘उद्या सूर्य तापलेला असेल, त्या वेळेपर्यंत तुमची सुटका केली जाईल.’ ” जेव्हा निरोप्यांनी जाऊन हे वर्तमान याबेशच्या लोकांना सांगितले तेव्हा ते आनंदित झाले.

  18. 1 शमुवेल ११:१०सुमारे इ.स.पू. १०९५

    याबेशवासी अम्मोनी लोकांना म्हणाले, “उद्या आम्ही स्वतःला तुमच्या स्वाधीन करू आणि तुम्हाला आवडेल तसे तुम्ही आमचे करा.”

  19. 1 शमुवेल ११:११सुमारे इ.स.पू. १०९५

    दुसर्‍या दिवशी शौलाने आपल्या लोकांना तीन भागांमध्ये विभागले; रात्रीच्या शेवटच्या प्रहरी ते अम्मोन्यांच्या छावणीत घुसले आणि सूर्य तापेपर्यंत त्यांना मारून टाकले. जे वाचले त्यातील दोन व्यक्तीही एकत्र येणार नाही असे विखरून गेले.

  20. 1 शमुवेल ११:१२सुमारे इ.स.पू. १०९५

    तेव्हा लोक शमुवेलास म्हणाले, “ते कोण होते ज्यांनी विचारले होते, ‘शौल आमच्यावर राज्य करेल काय?’ त्या माणसांना आमच्याकडे आणा, म्हणजे आम्ही त्यांना जिवे मारू.”

  21. 1 शमुवेल ११:१३सुमारे इ.स.पू. १०९५

    परंतु शौल म्हणाला, “आज कोणालाही जिवे मारले जाणार नाही, कारण आज याहवेहने इस्राएलची सुटका केली आहे.”

  22. 1 शमुवेल ११:१४सुमारे इ.स.पू. १०९५

    नंतर शमुवेल लोकांना म्हणाला, “चला आपण गिलगालास जाऊ आणि तिथे राजपदाची पुनर्स्थापना करू.”

  23. 1 शमुवेल ११:१५सुमारे इ.स.पू. १०९५

    तेव्हा सर्व लोक गिलगालास गेले आणि त्यांनी याहवेहच्या उपस्थितीत शौलाला राजा केले. तिथे त्यांनी याहवेहसमोर शांत्यर्पणाचे यज्ञ केले आणि शौलाने आणि सर्व इस्राएली लोकांनी मोठा उत्सव साजरा केला.

  24. 1 शमुवेल १२:१सुमारे इ.स.पू. १०९५

    शमुवेल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, “तुम्ही मला जे काही सांगितले ते ऐकून मी तुमच्यावर राजा नेमून दिला आहे.

  25. 1 शमुवेल १२:२सुमारे इ.स.पू. १०९५

    आता तुमचा पुढारी म्हणून तुमच्याकडे राजा आहे. मी तर उतार वयाचा होऊन माझे केस पांढरे झाले आहेत, आणि माझी मुले येथे तुमच्याबरोबर आहेत. माझ्या तरुणपणाच्या दिवसापासून आजपर्यंत मी तुमचा पुढारी आहे.