- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1050–1010 BC
Samuel & King Saul
Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.
या कालखंडातील वचने
- 1 शमुवेल ९:२२सुमारे इ.स.पू. १०९५
नंतर शमुवेलने शौल आणि त्याच्या सेवकास भोजनगृहात आणले आणि जिथे आमंत्रित केलेले सुमारे तीस लोक होते तिथे प्रमुखस्थानी त्यांना बसविले.
- 1 शमुवेल ९:२३सुमारे इ.स.पू. १०९५
शमुवेल आचार्याला म्हणाला, “मांसाचा जो तुकडा तुला देऊन मी बाजूला ठेवायला सांगितला होता, तो घेऊन ये.”
- 1 शमुवेल ९:२४सुमारे इ.स.पू. १०९५
तेव्हा आचार्याने मांडीचा भाग आणि त्याच्याबरोबर जे होते ते उचलून शौलासमोर मांडले. शमुवेल म्हणाला, “हे तुझ्यासाठी राखून ठेवलेले आहे. हे खा, कारण मी जेव्हा म्हणालो, ‘मी पाहुण्यांना आमंत्रित केले आहे,’ तेव्हापासून हे तुझ्यासाठी या प्रसंगासाठी बाजूला राखून ठेवण्यात आले होते.” त्या दिवशी शौलाने शमुवेलबरोबर भोजन केले.
- 1 शमुवेल ९:२५सुमारे इ.स.पू. १०९५
उच्च स्थानावरून खाली नगराकडे आल्यानंतर, शमुवेल त्याच्या घराच्या धाब्यावर शौलाबरोबर बोलला.
- 1 शमुवेल ९:२६सुमारे इ.स.पू. १०९५
पहाटेच ते उठले आणि शमुवेलने शौलाला धाब्यावर बोलाविले, “तयार हो, म्हणजे मी तुला तुझ्या मार्गाने पाठवेन.” जेव्हा शौल तयार झाला, तो आणि शमुवेल एकत्र बाहेर पडले.
- 1 शमुवेल ९:२७सुमारे इ.स.पू. १०९५
नगराच्या कडेने चालत असताना, शमुवेल शौलास म्हणाला, “सेवकाला सांग, की त्याने आपल्यापुढे चालावे.” आणि सेवकाने त्याप्रमाणे केले; “परंतु तू थोडा वेळ येथेच राहा म्हणजे मी परमेश्वराचा संदेश तुला देईन.”
- 1 शमुवेल १०:१सुमारे इ.स.पू. १०९५
नंतर शमुवेलने जैतून तेलाची एक कुपी घेतली आणि शौलाच्या डोक्यावर ओतली, त्याचे चुंबन घेत म्हणाला, “याहवेहने तुला त्यांच्या वतनावर अधिकारी म्हणून अभिषेक केला नाही काय?
- 1 शमुवेल १०:२सुमारे इ.स.पू. १०९५
आज तू माझ्याकडून गेल्यावर, बिन्यामीन प्रदेशाच्या सीमेवर सेल्सेह येथे राहेलच्या कबरेजवळ तुला दोन माणसे भेटतील. ते तुला सांगतील, ‘ज्या गाढवांच्या शोधात तू बाहेर पडला होता ती सापडली आहेत आणि आता तुझ्या वडिलांनी त्यांच्याबद्दलचा विचार करण्याचे थांबविले आहे आणि तुझ्याबद्दल काळजी करीत आहेत. ते म्हणत आहेत मी, “माझ्या मुलाविषयी काय करावे?” ’
- 1 शमुवेल १०:३सुमारे इ.स.पू. १०९५
“नंतर तिथून पुढे जात तू ताबोराच्या मोठ्या एलावृक्षाजवळ पोहोचशील. तिथे तुला बेथेलकडे परमेश्वराची आराधना करण्यासाठी निघालेली तीन माणसे भेटतील. एकजण तीन लहान करडे, दुसरा तीन भाकरी आणि तिसरा द्राक्षारसाची एक बुधली घेऊन जात असेल.
- 1 शमुवेल १०:४सुमारे इ.स.पू. १०९५
ते तुला अभिवादन करतील आणि तुला दोन भाकरी देतील, त्या तू त्यांच्याकडून स्वीकारशील.
- 1 शमुवेल १०:५सुमारे इ.स.पू. १०९५
“त्यानंतर तू परमेश्वराच्या गिबियाकडे, जिथे पलिष्ट्यांची चौकी आहे तिथे जाशील. त्या नगरात जाताच, संदेष्ट्यांची एक मिरवणूक सतार, डफ, सनई आणि वीणा ही वाद्ये वाजवित उच्च स्थानावरून खाली उतरत असताना आणि भविष्यवाणी करत असताना तुला आढळतील.
- 1 शमुवेल १०:६सुमारे इ.स.पू. १०९५
याहवेहचा आत्मा सामर्थ्याने तुझ्यावर येईल आणि तू त्यांच्याबरोबर भविष्यवाणी करशील; आणि तुझ्यात बदल होऊन तू निराळा व्यक्ती होशील.
- 1 शमुवेल १०:७सुमारे इ.स.पू. १०९५
ही चिन्हे पूर्ण होतील तेव्हा जे काही तुझ्या हाती येईल ते तू कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.
- 1 शमुवेल १०:८सुमारे इ.स.पू. १०९५
“माझ्यापुढे तू गिलगाल येथे जा. होमार्पणे आणि शांत्यर्पणे करण्यासाठी मी खचित खाली तुझ्याकडे येईल, परंतु मी तुझ्याकडे येऊन तू काय करावे ते मी तुला सांगेपर्यंत सात दिवस तू माझी वाट पाहा.”
- 1 शमुवेल १०:९सुमारे इ.स.पू. १०९५
शमुवेलपासून निघून जाण्यासाठी शौल वळताच, परमेश्वराने शौलाचे हृदय बदलले आणि त्याच दिवशी ही सर्व चिन्हे पूर्ण झाली.
- 1 शमुवेल १०:१०सुमारे इ.स.पू. १०९५
जेव्हा शौल आणि त्याचा सेवक गिबियाहकडे आले तेव्हा संदेष्ट्यांची मिरवणूक त्याला भेटली; तेव्हा परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर उतरला आणि तो त्यांच्याबरोबर भविष्यवाणी करू लागला.
- 1 शमुवेल १०:११सुमारे इ.स.पू. १०९५
सर्व लोक जे शौलाला पूर्वीपासून ओळखीत होते, जेव्हा त्यांनी त्याला संदेष्ट्यांबरोबर भविष्यवाणी करताना पाहिले, तेव्हा ते आपसात म्हणू लागले, “कीशच्या मुलाला हे काय झाले आहे? शौलसुद्धा संदेष्ट्यांपैकी एक आहे काय?”
- 1 शमुवेल १०:१२सुमारे इ.स.पू. १०९५
तिथे राहत असलेल्या एका मनुष्याने उत्तर दिले, “त्यांचा पिता कोण आहे?” यावरून अशी म्हण पडली: “शौलसुद्धा संदेष्ट्यांपैकी आहे काय?”
- 1 शमुवेल १०:१३सुमारे इ.स.पू. १०९५
शौलाने भविष्यवाणी करण्याचे थांबविल्यानंतर तो उच्चस्थानी गेला.
- 1 शमुवेल १०:१४सुमारे इ.स.पू. १०९५
तेव्हा शौलाच्या काकाने त्याला आणि त्याच्या सेवकाला विचारले, “तुम्ही कुठे गेला होता?” तो म्हणाला, “गाढवांना शोधण्यासाठी गेलो होतो, परंतु ती आम्हाला सापडत नाहीत असे पाहून, आम्ही शमुवेलकडे गेलो.”
- 1 शमुवेल १०:१५सुमारे इ.स.पू. १०९५
शौलाचे काका म्हणाले, “शमुवेल तुला काय म्हणाले ते मला सांग.”
- 1 शमुवेल १०:१६सुमारे इ.स.पू. १०९५
शौलाने उत्तर दिले, “गाढवे सापडली आहेत याची त्यांनी आम्हाला खात्री दिली.” परंतु राजपदाबद्दल शमुवेलने जे सांगितले होते ते त्याने त्याच्या काकांना सांगितले नाही.
- 1 शमुवेल १०:१७सुमारे इ.स.पू. १०९५
शमुवेलने इस्राएली लोकांना याहवेहकडे मिस्पाह येथे बोलाविले
- 1 शमुवेल १०:१८सुमारे इ.स.पू. १०९५
आणि त्यांना म्हटले, “याहवेह, इस्राएलचे परमेश्वर, असे म्हणतात: ‘मी इस्राएलास इजिप्तमधून बाहेर आणले आणि तुम्हाला इजिप्तच्या सत्तेपासून आणि ज्या सर्व राष्ट्रांनी तुम्हाला अन्यायाने वागवले, त्यांच्यापासून मी तुम्हाला सोडविले.’
- 1 शमुवेल १०:१९सुमारे इ.स.पू. १०९५
परंतु तुम्ही आता तुमच्या परमेश्वराला नाकारले आहे, जे तुम्हाला तुमच्या सर्व अरिष्टांपासून आणि संकटांपासून वाचवितात. आणि तुम्ही म्हणाला, ‘नको, आता आमच्यावर एक राजा नेम.’ तर आता तुमच्या गोत्रानुसार व कुळांनुसार याहवेहसमोर हजर व्हा.”